Thursday, July 9, 2026
Home Blog Page 182

काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला चोप देणाऱ्या चालकाविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला चोप देणाऱ्या चालकाविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण ( साहस Times) :कामाच्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडत असलेल्या पेट्रोल पंप कामगाराला केवळ सूचना दिल्यामुळे एका चालकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना फलटण शहरात उघडकीस आली आहे. ही घटना फलटण येथील एसटी स्टँड जवळील पेट्रोल पंपावर घडली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित चालक स्वतःच्या वाहनात डिझेल भरत असताना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने त्यास विनम्रपणे रोखण्याचा प्रयत्न केला. कारण मालकाच्या सूचनेनुसार कामगारांशिवाय इंधन भरण्यास मनाई होती. मात्र, चालकाने या सूचनेची थट्टा करत, कामगारास शिवीगाळ केली व त्याला कानाखाली आणि छातीवर अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत कामगाराच्या कानातून रक्तस्राव झाला.

या घटनेनंतर कामगारांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला असून, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (SC/ST Atrocities Act) कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच हा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे (SDPO) सोपवावा, अशी विनंतीही अर्जात नमूद करण्यात आली आहे.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षेची आणि प्रतिष्ठेची गरज असल्याचे स्पष्ट करत कामगारांनी प्रशासनाकडे तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संजय दत्तने शस्त्रांविषयी सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट झाले नसते : उज्ज्वल निकम

0
संजय दत्तने शस्त्रांविषयी सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट झाले नसते : उज्ज्वल निकम


राज्यसभेत जाण्याच्या तयारीत असलेले प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी मुंबई बॉम्बस्फोटांबाबत मोठा दावा केला आहे. अभिनेता संजय दत्तने शस्त्रांनी भरलेल्या गाडीची माहिती दिली असती तर मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट टाळता आले असते. १९९३ मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात २६७ जण ठार झाले होते.



Source link

प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध; पुण्यात संतप्त जाहीर सभा, मास्टरमाईंडवर कारवाईची मागणी”

0
प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध; पुण्यात संतप्त जाहीर सभा, मास्टरमाईंडवर कारवाईची मागणी”

पुणे : ‘शिवविचार आणि बहुजन उत्थानाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच हल्ले होत असतील, तर ही सत्तेची मस्ती असून, त्याचा समाचार घेतलाच जाईल’, असा स्पष्ट इशारा सोमवारी पुण्यात भरलेल्या जाहीर सभेत देण्यात आला. ही सभा संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.

शिवाजी व्यायाम मंदिरासमोर आयोजित सभेत संभाजी ब्रिगेडसह विविध समविचारी संघटनांनी एकत्र येत हल्ल्याचा तीव्र निषेध केला. “आमच्याच पोरांना हाताशी धरून आमच्याच कार्यकर्त्यांवर हल्ले करणाऱ्यांची मास्टरमाईंड मंडळी शोधा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा या सभेतून देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनपासून सुरू झालेले हे प्रकार आता सत्तेच्या पाठबळाने वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रविण गायकवाड हे अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेडचे नेतृत्व करत असून, त्यांनी जात-पात न मानता बहुजन युवकांना उद्योग, शिक्षण, उद्योजकता यासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच हे हल्ले होत असल्याचा सूर यावेळी उमटला.

हल्लेखोर वेगळे असले, तरी त्यांना भडकावणाऱ्यांचा हेतू समाजात तेढ निर्माण करण्याचा असल्याचे वक्त्यांनी सांगितले. “विचारांची लढाई विचारांनीच व्हायला हवी,” असे मतही यावेळी व्यक्त झाले.

या सभेला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप, शिवसंग्रामचे तुषार काकडे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, पुरुषोत्तम खेडेकर, सत्यशोधक समाजाच्या प्रतिमा परदेशी, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे, हर्षवर्धन मगदूम, शिवसेनेचे संजय मोरे, यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व विचारवंत कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभागरचना जाहीर; हरकती-शिफारसींसाठी अंतिम मुदत २१ जुलै

0
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभागरचना जाहीर; हरकती-शिफारसींसाठी अंतिम मुदत २१ जुलै

फलटण (साहस Times) प्रातिनिधी उमेश काकडे  – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा-२ दिनांक १२ जून २०२५ नुसार प्रभागांच्या भौगोलिक सीमांचे प्रारुप निश्चित करण्यात आले आहे.

सदर आदेशानुसार आज, १४ जुलै २०२५ रोजी सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समित्यांची प्रारुप प्रभागरचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी एकूण ८ गटपंचायत समितीसाठी १६ गण निश्चित करण्यात आले आहेत.

तरी प्रभागरचनेच्या या मसुद्याबाबत कोणताही हरकती अथवा सूचना असल्यास, नागरिकांनी त्या कारणासकट लेखी स्वरूपात तहसीलदार कार्यालयाकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शुभांशु शुक्ला पृथ्वीवर कधी परतणार? स्पेस स्टेशनवरून यावेळी निघणार, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

0
शुभांशु शुक्ला पृथ्वीवर कधी परतणार? स्पेस स्टेशनवरून यावेळी निघणार, जाणून घ्या संपूर्ण अपडेट


भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या पृथ्वीवर परतण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सोमवारी शुभांशू पृथ्वीच्या प्रवासाला निघणार आहे. शुभांशू गेल्या १८ दिवसांपासून आपल्या इतर तीन सहकाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) उपस्थित आहे. हे सर्व जण ‘अॅक्सिओम-४’ मोहिमेअंतर्गत तेथे गेले आहेत. राकेश शर्मा यांच्या १९८४ च्या प्रवासानंतर अंतराळात जाणारे शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत. ते आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता ड्रॅगन अंतराळयानात बसतील आणि दोन तासांनंतर परतीच्या प्रवासासाठी रवाना होतील.



Source link

दोन वेळा बदलण्यात आले होते ते ‘स्विच’ ज्यामुळे क्रॅश झाले एअर इंडियाचे विमान

0
दोन वेळा बदलण्यात आले होते ते ‘स्विच’ ज्यामुळे क्रॅश झाले एअर इंडियाचे विमान


अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरमधील फ्लूएल कंट्रोल स्विच दोनदा बदलण्यात आला होता आणि १२ जून रोजी त्याच्या बिघाडामुळे २६० लोकांचा मृत्यू झाला. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, २०१९ मध्ये बोईंगच्या निर्देशानंतर विमानात इंधन नियंत्रण स्विच असलेल्या कॉकपिट मॉड्यूलमध्ये दोनदा बदल करण्यात आला होता.



Source link

बौध्द धम्मातील ‘वर्षावास’ हा धम्माचे चिंतन, मनन, आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ – बाबासाहेब जगताप

0
बौध्द धम्मातील ‘वर्षावास’ हा धम्माचे चिंतन, मनन, आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ – बाबासाहेब जगताप

फलटण : बौध्द धम्मातील वर्षावासाकडे नुसता धार्मिक विधी म्हणून पाहू नका. हा कालावधी बौद्ध धम्मगुरु, बौध्द भिक्षुच्यासाठी धम्माचे चिंतन,मनन,आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी समतानगर (विडणी)येथे वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, वर्षावास ही संकल्पना बौध्द धम्मात का सुरु झाली?हे आपण समजून घेतले पाहिजे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधी पावसाळा ऋतू असल्याने भिक्षुंना चरिका करण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागतत होता. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत होता.त्याकाळातील भौगोलिक स्थिती विचारात घेऊन वर्षावास सुरु झाला.त्यात प्रामुख्याने बौध्द भिक्षु विहारात मुक्काम करुन लोकांना धम्माचा उपदेश करीत.ते स्वतः धम्माचे विचार आत्मसात करुन मनन, चिंतन आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करत होते. तथागतांनी पहिला वर्षवास सारनाथ येथील मृगदावनामध्ये केला.तिथे त्यांनी त्यांचे पूर्वीचे सहकारी पंचवर्गीय भिक्षु कौंडीण्य, वप्प, भद्दीय, महानाम व अश्वजित यांना केला.तथागत भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यात ४६ वर्षावास केले.तालुक्याचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहून वर्षावासाचे महत्व सांगितले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे समता नगर (विडणी) या ठिकाणी वर्षावास मालिकेतील दुसरे पुष्प गुंफण्यात आले.भगवान गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन या विषयावर भारतीय बौध्द महासभेचे प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी यावर विस्तृतपणे मांडणी केली.त्यांनी यामध्ये भगवंतानी सांगितलेली चार आर्य सत्य व आर्य अष्टांग मार्ग याबद्दल माहिती सांगितली.ते म्हणाले. चार आर्य सत्य व आर्य अष्टांग मार्ग हे बौध्द धम्माचे सार आहे.चार आर्य सत्य म्हणजे१) दु:ख २) दु:ख समुदय ३)दु:ख निरोध आणि ४)दु:ख निरोध गामिनी–यातच अष्टांग मार्ग येतो.अष्टांग मार्गात प्रज्ञा, शील आणि समाधी याचा समावेश होतो.प्रज्ञेमध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प,शीलात सम्यक वाचा,सम्यक कर्म,सम्यक आजीविका, तर समाधि यामध्ये सम्यक,व्यायाम,सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश होतो.तेव्हा सर्वांनी या तत्वाचा अंगीकार करून तथागतांचा धम्म जनसामन्यापर्यंत पोहचवावा.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव आणि प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे उपस्थित समता नगर मधील सर्व बौद्ध बांधव व बौद्ध उपासिका व उपासिका,पंचशील मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा पद्धतीने वर्षभर प्रवचन मालिका फलटण तालुक्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी होत आहे.

ऑनलाइन तिकीट सुविधा शुल्कावरील बंदी उठवली

0
ऑनलाइन तिकीट सुविधा शुल्कावरील बंदी उठवली



तुम्हालाही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहायला आवडतात का? तसेच, तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी ऑनलाइन तिकिटे बुक करता. तुम्हाला ऑनलाइन तिकिटे बुक करणे अधिक सोयीस्कर वाटते, परंतु त्यासाठी तुम्हाला सुविधा शुल्क भरावे लागते.

परंतु, महाराष्ट्र सरकारने तिकीट बुकिंगवरील या सुविधा शुल्काबाबत कारवाई केली होती आणि त्यावर बंदी घातली होती.

तथापि, आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, बुक माय शो आणि पीव्हीआरला मोठा दिलासा मिळाला आहे. सुविधा शुल्कावर लादलेली बंदी न्यायालयाने रद्द केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारचा एक दशक जुना आदेश रद्द केला, ज्यामध्ये थिएटरना ऑनलाइन तिकीट बुकिंगवर सुविधा शुल्क आकारण्यास मनाई करण्यात आली होती. तथापि, आता न्यायालयाने म्हटले आहे की, हे पाऊल व्यवसाय करण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायमूर्ती महेश सोनक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, महसूल आयुक्तांच्या 4 एप्रिल 2013च्या आदेशाला आणि त्यानंतर १८ मार्च २०१४ च्या आदेशाला कायदेशीर आधार नाही आणि तो संविधानाच्या कलम 19(1)(ग) चे उल्लंघन करतो. जो नागरिकांना कोणताही व्यवसाय करण्याचे किंवा कोणताही व्यापार किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हमी देतो.

सरकारी आदेशाने कलम 19(1)(ग) अंतर्गत याचिकाकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करून थिएटर मालक आणि इतरांना त्यांच्या ग्राहकांकडून सुविधा शुल्क आकारण्यास मनाई केली आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. खंडपीठाने पुढे म्हटले की, “जर व्यवसाय मालकांना त्यांच्या व्यवसायाचे विविध पैलू (कायद्याप्रमाणे) ठरवण्याची परवानगी दिली गेली नाही, तर आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प होतील.

सरकारचा आदेश

2013 आणि 2014 चे आदेश जवळजवळ एक दशकासाठी स्थगित होते, कारण उच्च न्यायालयाने 9 जुलै 2014 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाद्वारे त्यांच्या कामकाजाला स्थगिती दिली होती. यामुळे, प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना थिएटर मालकांनी सुविधा शुल्क आकारणे सुरू ठेवले.

याचिकाकर्त्यांनी काय युक्तिवाद केला?

पीव्हीआर लिमिटेड, बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (बुकमायशो) आणि फिक्की-मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी राज्याच्या सूचनांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांना उत्तर देताना हा निर्णय देण्यात आला.

याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, ऑनलाइन बुकिंग ही एक पर्यायी सुविधा आहे ज्यामध्ये तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, जर ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरायचे नसेल, तर ते बॉक्स ऑफिसवर तिकिटे खरेदी करण्यास मोकळे आहेत. ते थिएटरमध्ये येऊन तेथून थेट तिकिटे खरेदी करू शकतात. न्यायालयाने यावर सहमती दर्शवत म्हटले की ते ग्राहकाच्या हातात, मग त्याला तिकिटे ऑनलाइन खरेदी करायची असतील किंवा थिएटरमध्ये जाऊन.


हेही वाचा

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शहराबाहेर स्थलांतरित होणार



Source link

फलटण : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान वेळी नगरसेवकांसह मान्यवरांचा सहभाग

0
फलटण : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान वेळी नगरसेवकांसह मान्यवरांचा सहभाग

फलटण (प्रतिनिधी) – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण मुक्कामावरून पहाटे ३ वाजता पुढील मार्गस्थ झाली. यावेळी पालखीला खांदा देण्याचा मान नगरसेवक अशोकराव जाधव, श्री रामभाऊ भोसले, श्री वसीमभाई मणेर यांच्यासह संस्थानचे प्रतिनिधींना लाभला.

प्रस्थानवेळी वारकरी भक्तांनी “ज्ञानोबा माऊली  च्या जयघोषात आसमंत दुमदुमून गेला होता. टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि अभंग गायनाच्या भक्तीमय वातावरणात संपूर्ण परिसर भारावलेला होता.

स्थानिक नगरसेवक व प्रतिष्ठित व्यक्तींनी पालखी सेवेत सामील होत आपल्या भक्तीभावाचे दर्शन घडवले. फलटणकर नागरिकांनी रात्री उशिरा पर्यंत पालखीचे दर्शन घेऊन आपली श्रद्धा व्यक्त केली.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू! प्रारूप प्रभागरचना १४ जुलैपासून जनतेसाठी उपलब्ध

0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू! प्रारूप प्रभागरचना १४ जुलैपासून जनतेसाठी उपलब्ध

सातारा : राज्य शासनाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा-२ दिनांक १२ जून २०२५ अन्वये प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या आदेशानुसार, सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे ती सर्वसामान्य नागरिकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर प्रारूप प्रभागरचनेविषयी नागरिकांना काही हरकत, सूचना किंवा सुधारणा करावयाची असल्यास संबंधित तहसीलदार कार्यालयात दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत सकारण लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. त्या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती वा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.