Thursday, July 9, 2026
Home Blog Page 181

पुतळ्याचं_स्वप्न_कधी_साकारणार?  फलटणमध्ये चर्चा

0
पुतळ्याचं_स्वप्न_कधी_साकारणार?  फलटणमध्ये चर्चा

फलटण | साहस Times प्रतिनिधी :- “आम्ही पोटासाठी जगतो, आणि तुम्ही आमच्या पोटावर लाथ मारता!” अशा ज्वलंत शब्दांनी शोषित, वंचितांच्या व्यथा मांडणारे, लेखणीने क्रांती करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आजतागायत फलटणमध्ये उभारला गेलेला नाही, ही सामाजिक दुर्दैवाची गोष्ट ठरत आहे.

अनेक वर्षांपासून स्थानिक समाजबांधव आणि विविध सामाजिक संघटना अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी आग्रह धरत आहेत. मात्र आश्वासनांची भरमसाठ पखरण करूनही अद्याप पुतळा उभारणीसाठी कोणतीच ठोस कृती झाली नसल्याने समाजात नाराजीचा सूर चढू लागला आहे.

फलटण नगरपरिषदेने पाचबत्ती चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले असले तरी, ती जागा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली आहे. परिणामी हा प्रस्ताव केवळ कागदावरच राहिला आहे.

दरवर्षी 1 ऑगस्टला अण्णाभाऊंची जयंती साजरी केली जाते. त्या दिवशी अनेक राजकीय नेते अभिवादनासाठी फुलं अर्पण करतात, भाषणं देतात. मात्र, ‘पुतळ्याबाबत दिलेलं आश्वासन काय झालं?’ असा थेट प्रश्न आता त्यांनाच समाज विचारू लागला आहे.

राजकीय नेत्यांच्या निवडणुकीआधीच्या आश्वासनांचा केवळ घोषवाक्यापुरता उपयोग न होता, प्रत्यक्ष कृती होणे अपेक्षित आहे. अन्यथा अण्णाभाऊंच्या विचारांचा अपमान होतोय, असा रोष सर्वसामान्य जनतेत व्यक्त होतो आहे.


“आहे साहित्त्याची खान… अण्णाभाऊचं लिखान…!”

0
“आहे साहित्त्याची खान… अण्णाभाऊचं लिखान…!”

फलटण : छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या चौकाचौकामध्ये गाणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानून त्यांचे विचार आणि कार्य संपूर्ण देशभर लोकशाहीरीच्या माध्यमातून पोहोचवणारे, भारतरत्न तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या ५६व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

कम्युनिस्ट विचारसरणीचे असलेले अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होते. लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कामगार, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडल्या.

त्यांची लोकचळवळीवर आधारित प्रसिद्ध लावणी “माझी मैना गावाकडे राहिली” आजही जनमानसात तितकीच प्रिय आहे. दुसऱ्या महायुद्धातील रशियाच्या अस्तित्वासाठी चाललेल्या लढाईवर त्यांनी लिहिलेला “स्टालिनग्राडचा पोवाडा” इतका प्रभावी ठरला की रशियातील लोक त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले आणि रशियात त्यांच्या स्मरणार्थ पुतळाही उभारण्यात आला.

साहित्य, गीत, पोवाडा, कथा-कादंबरी यांतून त्यांनी सर्वसामान्यांच्या दुःखांना आवाज दिला. अण्णाभाऊंच्या लेखणीने वंचितांचे दुःख शब्दरूप घेऊन समाज परिवर्तनाची मशाल पेटवली.

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवूया आणि समतेच्या, संघर्षाच्या आणि न्यायाच्या वाटेवर चालण्याचा निर्धार करूया.

3 डाळिंबाच्या किंमतीत येतील 12 वडापाव… डाळिंबाच्या दरवाढीची कारणं वाचून बसेल धक्का

0
3 डाळिंबाच्या किंमतीत येतील 12 वडापाव… डाळिंबाच्या दरवाढीची कारणं वाचून बसेल धक्का


Dalimb Rates Today: डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र अचानक या लाल फळाचे दर वाढण्यामागे नेमकी काय कारणं आहेत याबद्दल ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. रक्ताच्या वाढीसाठी लाल रंगाची फळं आणि भाज्या उत्तम असतात असं आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगतात. मात्र आता डाळिंबाचे दर अचानक वाढले असून एका डाळिंबाच्या किंमतीत सहा ते सात वडापाव येतील एवढी या फळाची किंमत वाढली आहे. मोठ्या डाळिंबं एक किलो घेतली तर त्यामध्ये जवळपास एक डझन वडापाव घेता येईतील, एवढे दर वाढल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या दरवाढीमागील कारणं काय आहेत ते समजून घेऊयात…

Add Zee News as a Preferred Source

डाळिंबाची किंमत का वाढली?

मागणी आणि पुरवठा तत्वावर फळांची आणि भाज्यांची किंमत ठरते. सध्या डाळिंबाला चांगली मागणी असली तरी तितकासा पुरवठा होत नाहीये. उन्हाळा आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे यंदा डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याची आवक घटल्याने किमतीत वाढ झाली आहे. जुलै उजाडला तरी मुंबईत सलग पाऊस झालेला नाही. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. परिणामी, डाळिंबासारख्या फळांची मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा नसल्याने त्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.

केवळ खाण्यासाठी नाही तर…

डाळिंबाच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दुसरीकडे डाळिंब आरोग्यदायी असल्याने ग्राहक ते जादा पैसे मोजून विकत घेताना दिसत आहेत. सलाड, टॉपिंग्स, ज्यूससाठीही मोठ्या प्रमाणात डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाचे दाणे काढून खाण्यासह विविध सलाड तसेच टॉपिंग्स म्हणून त्याचा वापर केला जातो. डाळिंबाचा रस पिण्याकडेही अनेकांचा कल असतो. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करा; या लोकांना डाळिंब खाऊ नये

डाळिंब आरोग्यदायी असलं तरी नियमितपणे त्याचं सेवन करण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला घेण्याचं सुचवलं जातं. मूत्रपिंडाचा आजार किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या पोटॅशियम आणि साखरेच्या प्रमाणामुळे डाळिंब कमी प्रमाणात सेवन करणं फायद्याचं ठरतं. तसेच रक्त पातळ होणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डाळिंबाचं सेवन डॉक्टरांना विचारून करावे, असे तज्ज्ञ सांगतात.

डाळिंबाचे सध्याचे दर किती?

डाळिंबाची सध्याची किंमत किती- साधारण आकाराची डाळिंबं 80 ते 120 रुपये किलो दराने मिळतात. गावठी डाळिंबांसाठी प्रति किलो 150 ते 200 रुपये मोजावे लागतात. तर मोठ्या आकाराच्या डाळिंबांसाठी 180 ते 200 रुपये प्रति किलो असा दर आहे. म्हणजेच 15 रुपयाचा एक वडापाव या दराने हिशेब लावल्यास मोठ्या आकाराची 3 डाळिंबं घेण्यासाठी जितके पैसे द्यावे लागतात तेवढ्यात 1 डझन वडापाव घेता येतील. 

डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे

पचनशक्ती सुधारते: डाळिंबातील फायबरचे प्रमाण पचनास फायदेशीर ठरते. त्यामुळे बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते.

मेंदूचे आरोग्य : डाळिंब मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून स्मृती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारू शकते.

हृदयरोगापासून संरक्षण : प्युनिकॅलाजिन्स आणि अँथोसायनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स डाळिंबामध्ये विपुल प्रमाणात आहेत. यामुळे शरीरामधील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. रक्तदाब कमी करून हृदयरोगापासून संरक्षण करण्यास हे घटक मदत करू शकतात.

अँटीऑक्सिडंट पॉवर : डाळिंबामध्ये पॉलिफेनॉलसह उच्च पातळीचे अँटीऑक्सिडंट्स असून, ते मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. परिणामी, दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो.

कर्करोग प्रतिबंध : डाळिंबातील अँटीऑक्सिडंट व दाहक-विरोधी संयुगे प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध उत्तमरित्या काम करतात.





Source link

युरिक ऍसिड वाढल्यामुळे शरीरात काय काय बदल होतात? जाणून हैराण व्हाल

0
युरिक ऍसिड वाढल्यामुळे शरीरात काय काय बदल होतात? जाणून हैराण व्हाल


कधीकधी आपले शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त यूरिक अ‍ॅसिड तयार करू लागते. यामुळे मुतखड्याचा त्रास निर्माण होतो.. अशा परिस्थितीत, आपल्या रक्तात यूरिक अ‍ॅसिड जमा होऊ लागते. अशावेळी शरीरात काय बदल होतात?

Add Zee News as a Preferred Source

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि आपल्या बिघडलेल्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरात अनेक आजार निर्माण होत आहेत. यापैकी एक म्हणजे यूरिक अ‍ॅसिडची समस्या, जी थेट आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींशी संबंधित आहे. जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढते तेव्हा ते अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकते. यूरिक अ‍ॅसिड हे आपल्या शरीरात तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे. 

पण शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास ते आपल्या रक्तात जमा होऊ लागते, ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरयुरिसेमिया म्हणतात. जेव्हा हे जास्त यूरिक अ‍ॅसिड रक्तात जमा होते तेव्हा ते लहान, तीक्ष्ण क्रिस्टल्समध्ये बदलते. ते काचेच्या लहान तुकड्यांसारखे समजा! हे क्रिस्टल्स नंतर आपल्या सांध्यामध्ये आणि शरीराच्या इतर भागांमध्ये जमा होऊ लागतात आणि येथूनच अनेक वेदनादायक आणि गंभीर समस्या सुरू होतात.

शरीरात काय बदल होतात? 

गाउट किंवा असह्य सांधेदुखी: वाढलेल्या युरिक ऍसिडचा हा सर्वात सामान्य आणि वेदनादायक परिणाम आहे. जेव्हा हे युरिक ऍसिड क्रिस्टल्स आपल्या सांध्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा अचानक वेदना इतक्या तीव्र होतात की तुम्हाला हालचाल करता येत नाही. ही वेदना अनेकदा पायाची बोटे, घोटे, गुडघे आणि बोटांमध्ये होते. ज्या सांध्यामध्ये ती होते ती सुजलेली, लाल होते आणि स्पर्शाला खूप गरम वाटते.

मूतखडा: वाढलेले युरिक ऍसिड केवळ सांध्यापुरते मर्यादित नाही तर ते आपल्या मूत्रपिंडातही क्रिस्टल्स तयार करू शकते. हे क्रिस्टल्स हळूहळू वाढतात आणि दगडांमध्ये बदलतात. जर हे खडे मोठे झाले तर ते मूत्रमार्गात अडथळा आणू शकतात. यामुळे तुम्हाला खालच्या पाठीत किंवा ओटीपोटात जीवघेणा वेदना, लघवीत रक्त येणे, वारंवार लघवी होणे, उलट्या होणे आणि मळमळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मूतखडा नुकसान: आपल्या मूत्रपिंडांचे काम रक्तातील अशुद्धता फिल्टर करणे आहे, ज्यामध्ये युरिक ऍसिड देखील समाविष्ट आहे. जेव्हा युरिक ऍसिड सतत वाढले जाते तेव्हा आपल्या मूत्रपिंडांवर खूप भार पडतो. हे क्रिस्टल्स हळूहळू मूत्रपिंडाच्या आतील भागांना नुकसान पोहोचवू लागतात, ज्यामुळे दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.

उच्च रक्तदाब: संशोधनातून असे दिसून आले आहे की वाढलेले यूरिक ऍसिड आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकते आणि त्या कडक करू शकते. यामुळे रक्त योग्यरित्या वाहू शकत नाही आणि तुमचा रक्तदाब वाढतो.

चयापचय सिंड्रोम: मेटाबॉलिक सिंड्रोम हे अनेक आरोग्य समस्यांचे एक समूह आहे, ज्यामध्ये पोटाभोवती लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च रक्तातील साखर, उच्च ट्रायग्लिसराइड्स यांचा समावेश आहे. अनेक अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की यूरिक ऍसिड इन्सुलिन प्रतिरोध वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, जे मेटाबॉलिक सिंड्रोमचे एक प्रमुख कारण आहे.

हृदयरोगाचा धोका: जेव्हा यूरिक ऍसिडची पातळी जास्त असते, तेव्हा ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ आणि ताण निर्माण करू शकते. यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराचे नुकसान होते आणि त्या कडक आणि कमी लवचिक होतात. कालांतराने, ते उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि अचानक हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

धुमाळवाडी धबधब्याजवळ पर्यटकांवर दहशत! लुटमार करणारी टोळी अटकेत, ७ आरोपी फरार

0
धुमाळवाडी धबधब्याजवळ पर्यटकांवर दहशत! लुटमार करणारी टोळी अटकेत, ७ आरोपी फरार

फलटण :- फलटण तालुक्यातील प्रसिद्ध धुमाळवाडी धबधबा हे ठिकाण पर्यटनासाठी ओळखले जाते. मात्र, ८ जुलै रोजी संध्याकाळी येथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर घातपात घडवून लुटमार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या गुन्ह्यात १० जणांच्या टोळीने महिलांना लक्ष्य करून शस्त्राचा धाक दाखवून ५४,५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने जलद कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित सात जण फरार आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक धबधब्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असताना वारुगड टेकडीवरुन टेहाळणी करणाऱ्या टोळीने अचानक हल्ला चढवून, लाकडी दांडके व लोखंडी सुरे दाखवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचांदीचे दागिने आणि पुरुषांकडील घड्याळ व रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पिडितांच्या अपूर्ण वर्णनावरून पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून खालील आरोपींना अटक केली:

  1. दिपक नामदेव मसुगडे (वय ३०, नवलेवाडी, माण, सातारा)
  2. विलास उर्फ बाबु दत्तात्रय गुजले (वय २१, खांडज, बारामती, पुणे)
  3. चेतन शंकर लांडगे (वय २५, सोनगाव बंगला, फलटण)

तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू व बजाज पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

या गुन्ह्यात सहभागी असलेले उर्वरित आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:

  • रणजित कैलास भंडलकर
  • तानाजी नाथाबा लोखंडे (खामगाव, फलटण)
  • अक्षय महादेव चव्हाण (शिरवली, बारामती)
  • वैभव सतिश जाधव
  • रामा शंकर जाधव
  • सुरज कैलास जाधव (मलवडी, माण)
  • एक अल्पवयीन मुलगा

हे सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून यांच्यावर पूर्वीही दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, मारामारी, व विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.

ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये दहिवडी पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि इतर पोलीस कर्मचारी—वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, हणमंत दडस, तुषार नलवडे, कल्पेश काशिद, नितीन धुमाळ, निलेश कुदळे, अक्षय खाडे—यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक करत आहेत.

मंगळवेढा क्राईम स्टोरी: विवाहित प्रेयसीसाठी वेडसर महिलेला जाळलं; ‘दृश्यम’लाही लाजवेल अशी भयानक कथा

0
मंगळवेढा क्राईम स्टोरी: विवाहित प्रेयसीसाठी वेडसर महिलेला जाळलं; ‘दृश्यम’लाही लाजवेल अशी भयानक कथा

मंगळवेढा, पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात ‘दृश्यम’ चित्रपटालाही मागे टाकणारी एक अघोरी आणि अकल्पनीय गुन्ह्याची घटना समोर आली आहे. दीर-भावजयीच्या अनैतिक नात्यातून सुटका मिळवण्यासाठी विवाहित प्रेयसी किरण सावंत आणि तिचा दीर निशांत सावंत यांनी एक भयंकर कट रचून एका वेडसर महिलेला जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे.

किरण आणि निशांतला एकत्र नवा संसार मांडायचा होता. यासाठी त्यांनी किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा डाव आखला. निशांतने पंढरपूरमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या, मुलाच्या शोधात असलेल्या एका बेवारस वेडसर महिलेला फसवून आणले. दोघांनी तिला ठार मारले आणि तिचा मृतदेह सावंत कुटुंबाच्या घराशेजारील गवताच्या गंजीत ठेवून ती गंजी मध्यरात्री पेटवून दिली.

संपूर्ण गाव आणि कुटुंबाला वाटावे की किरणने आत्महत्या केली आहे, यासाठी तिचा मोबाईल मृतदेहाजवळ ठेवण्यात आला. मात्र, पोलिसांनी या मोबाईलचा सीडीआर रेकॉर्ड  तपासल्यानंतर सत्य उघडकीस आले. निशांतच्या नंबरचे तपशील समोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला निशांतने काहीही कबूल केलं नाही, पण पोलिसी खाक्याने त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याच मोबाईलवरून किरणला व्हिडीओ कॉल लावला. कॉलवर ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कराड येथून तिला ताब्यात घेतले.

पती नागेश सावंत यांचा संतप्त सूर

किरणचा पती नागेश सावंत म्हणाले, “किरणने हे सर्व करताना आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही विचार केला नाही. आमचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. अशा गुन्ह्याला क्षमा नसावी. आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”

पोलिसांचं कौतुकास्पद तपासकाम

जर मोबाईल सीडीआर तपासला नसता, तर हा बनाव यशस्वी ठरला असता. पण पोलिसांनी सखोल तपास करत ही क्राईम स्टोरी उघडकीस आणली. ही घटना समाजाला हादरवणारी असून गुन्हेगारांची मानसिकता किती विकृत असू शकते, याचे उदाहरण आहे.

निमिषावर पुन्हा मृत्यूदंडाची टांगती तलवार, तलालचा भाऊ म्हणाला – हत्येचा सौदा होणार नाही

0
निमिषावर पुन्हा मृत्यूदंडाची टांगती तलवार, तलालचा भाऊ म्हणाला – हत्येचा सौदा होणार नाही



तलाल यांचे बंधू अब्देलफतह मेहदी म्हणाले, आमच्या कुटुंबाने तडजोडीचे सर्व प्रस्ताव नाकारले आहेत. भावाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. माफीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, यात क्षमा होऊ शकत नाही. या प्रकरणात आम्ही ‘दीयत’ म्हणजे ब्लड मनी स्वीकारणार नाही.



Source link

Best By? Use By? Best Before… या Expiry Dates मधला फरक काय? अन्न कधी खराब होतं?

0
Best By? Use By? Best Before… या Expiry Dates मधला फरक काय? अन्न कधी खराब होतं?


Difference Between Best By And Use By Expiry Dates on Food: अनेकदा तुम्ही ताक, दही, चीज यासारख्या नाशवंत आणि दुग्धजन्य पदार्थांवर ‘बेस्ट बाय’ची तारीख असते. अनेकदा ही तारीख उलटून गेल्याचं लक्षात आल्यानंतर ती गोष्ट खावी की नाही याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. ही गोष्ट खाल्ली तर घातक तर ठरणार नाही ना? असा प्रश्न आपल्याला पडतो. 

Add Zee News as a Preferred Source

या तारखा सांगतात काय?

आता खरं सांगायचं झालं तर या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, अन्नाच्या पाकीटांवरील तारखा या प्रत्यक्षात अन्न खाण्यासाठी धोकादायक आहे की नाही याबद्दलची फारशी माहिती देत नाहीत तर पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल ते सांगत असतात. एखादी तारीख उलटून गेली असेल तर ती वस्तू वापरताना लोकांच्या मनात भीती निर्माण होते. त्यामुळे ते अन्न वाया जातं. नेमक्या या तारखा काय सूचित करतात ‘बेस्ट बाय’, ‘युज्ड बाय’ आणि ‘बेस्ट बिफोर’मध्ये काय फरक असतो? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

अन्नाच्या पाकिटांवरील लेबल्सचा प्रत्यक्षात अर्थ काय आहे?

तज्ज्ञांच्या मते, अन्नपदार्थांच्या उत्पादनांवरील तारखा उत्पादकाने लिहिलेल्या असतात. या तारखांचा सरकारशी काहीही संबंध नसतो. अशा तारखा लिहिणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहेत. या पाकिटांवरील तारखा ग्राहकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना आतील अन्नपदार्थांच्या सुरक्षततेचे मूल्यांकन करण्यासाठी छापल्या जात नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात. उत्पादनाची उच्च गुणवत्ता किंवा ताजेपणा दर्शविण्यासाठी या तारखा नमूद केलेल्या असतात.

उत्पादक सहसा विविध वैज्ञानिक चाचण्यांचा वापर करतात. ज्या पदार्थांची गुणवत्ता निश्चित करण्यात मदत करतात. काही सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वाक्यांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे:

Best By or Best if Used By/Before

ग्राहकांना उत्पादनाची सर्वोत्तम चव आणि गुणवत्ता कधीपर्यंत टिकून असेल हे समजण्यासाठी ‘Best By or Best if Used By/Before’ अशा शब्दांचा वापर केला जातो.

Use By

या शब्दाचा अर्थ असा आहे की, आतील पदार्थ या तारखेपर्यंत वापरल्यास उत्पादनाची सर्वोच्च गुणवत्ता सुनिश्चित करता येईल. त्या तारखेनंतर उत्पादनाची गुणवत्ता खालावत जाते असा अर्थ घेता येईल. ही तारीख उत्पादनांची सुरक्षितता तारीख नसते हे लक्षात घेतलं पाहिजे.

Sell By

विक्रीद्वारे हे इन्व्हेंटरी व्यवस्थापनाच्या उद्देशाने छापले जाते. किरकोळ विक्रेत्याने उत्पादन किती काळ डिस्प्लेवर ठेवावे याची तारीख दर्शवते.

अन्न खाण्यास सुरक्षित आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल?

तज्ज्ञांच्या मते, दूध, मांस किंवा अगदी सहजपणे खराब होणारे अन्नपदार्थ, तुम्ही कोणत्याही सुरक्षिततेच्या चिंतांशिवाय एक आठवडा किंवा दहा दिवसांनी Use By तारखेनंतर सुरक्षितपणे खाऊ शकता.

फ्रीजरमध्ये ठेवलेले अन्न अनिश्चित काळासाठी टिकू शकते; तथापि, काही महिन्यांनंतर तुम्हाला त्या पदार्थांच्या दर्जामध्ये फरक पडल्याचा आणि चव कमी झाल्यासारखं वाटू शकतं.

कॅनमध्ये पॅक केलेले अन्न आणि इतर अन्न ज्यामध्ये धान्य, पास्ता आणि कुकीज यांचे पॅकेजिंग खराब झालेले नसेल तर बहुतेकदा ते वर्षानुवर्षे खाण्यास सुरक्षित असतात. मात्र कालांतराने अशा पदार्थांची गुणवत्ता कमी होऊ शकते.

डॉक्टर असेही म्हणतात की जरी बहुतेक लोक आजारी न पडता खराब झालेले अन्न पचवू शकतात, तरीही जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर अशा लोकांना मळमळ आणि अतिसारसारखी लक्षणे दिसण्याची धोका असतो.

अन्न सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी अन्न तपासताना खालील गोष्टींचा विचार करा

बुरशी
दुर्गंधी
पदार्थांचा रंग बदलणे
पदार्थाला पाणी सुटणे

अन्न खराब न होता जास्त काळ कसे टिकवायचे?

ताजे मांस आणि कोंबडी फ्रिजमधील इतर पदार्थांपासून दूर ठेवा.

रेफ्रिजरेटरच्या दारात अंडी आणि दूध साठवू नका.

पॅन्ट्रीच्या वस्तू थंड, कोरड्या जागी ठेवा जिथे भरपूर हवा असते.

नाशवंत वस्तू डीप फ्रीजमध्ये ठेवा.

केळी कधीही इतर पदार्थांसोबत ठेवू नका, कारण ती लवकर पिकतात.

अगदी रेफ्रिजरेटरमध्येही फळे भाज्यांपासून वेगळी ठेवा.

केवळ नमूद केलेल्या तारखांवर अवलंबून राहू नका.

(Disclaimer – येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)





Source link

शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

0
शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

सातारा – महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठसा उमटवणारे अनुभवी नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या १५जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या अधिकृत बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य संचारल्याचे चित्र असून, सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावी ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

शशिकांत शिंदे हे कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार असून सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी राज्यात जलसंपत्ती मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. माथाडी कामगार, कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचे योगदान विशेष मानले जाते. पक्षाशी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

पक्षात संघटनात्मक मजबुती, तरुण नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि जनतेशी प्रत्यक्ष संवाद वाढवण्यासाठी शिंदे यांचे नेतृत्व निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

साताऱ्यात जिवंत सापडली ‘मृत’ पत्नी; सोलापुरात पती अटकेत, पण जळालेला मृतदेह कोणाचा?

0
साताऱ्यात जिवंत सापडली ‘मृत’ पत्नी; सोलापुरात पती अटकेत, पण जळालेला मृतदेह कोणाचा?

मंगळवेढा, सोलापूर : पत्नीला जाळून ठार मारल्याच्या आरोपाखाली पतीला अटक झाली, आणि सर्व प्रकरण बंद झाल्यासारखे वाटत असतानाच या कथेला नवे वळण मिळाले आहे. जी महिला मृत असल्याचे सांगितले जात होते, तीच किरण नावाची महिला साताऱ्यामध्ये तिच्या प्रियकरासोबत जिवंत आढळल्याने संपूर्ण घटनेला वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांपुढे ‘मग जळालेला मृतदेह नेमका कोणाचा?’ हा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे १४ जुलै रोजी गवताच्या गंजीत एका महिलेचा जळालेला मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर पंढरपूर येथील दशरथ दांडगे यांना फोनवरून सांगण्यात आले की, त्यांची मुलगी किरण हिने स्वतःला पेटवून घेतले. तिचा पती नागेश सावंत यानेही हेच कथन केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती.

मात्र तपास सुरू असतानाच मोठा धक्का बसला, कारण किरण साताऱ्यामध्ये एका व्यक्तीसोबत जिवंत सापडली. ती व्यक्ती किरणचा प्रियकर असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे आता या कथित ‘किरण’च्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

पोलीस प्रशासनाने जळालेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल आणि शवविच्छेदनाचा रिपोर्ट मागवला असून, त्या अहवालानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे.