Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 180

लहान मुलांचे केस ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात पांढरे, पालकांची ‘ही’ चूक पडते महागात

0
लहान मुलांचे केस ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात पांढरे, पालकांची ‘ही’ चूक पडते महागात


आजकाल लहान वयातच मुलांचे केस पांढरे होत आहेत, पण जेव्हा ६ वर्षांच्या मुलाचे केस पांढरे असल्याचे आढळून येते तेव्हा पालकांना धक्का बसतो. केस पांढरे झाले म्हणजे ती व्यक्ती वृद्धत्वाकडे झुकू लागली असं वाटतं. त्यामुळे लहान वयात केस पांढरे झाल्यावर पालक चिंतेत येतात. अशा परिस्थितीत, जर तुमच्या मुलाचे केस देखील पांढरे होत असतील, तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्ही आता लक्ष दिले तर भविष्यात ते रोखणे किंवा पांढऱ्या केसांची समस्या नियंत्रित करणे अशक्य होऊ शकते. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात ते जाणून घ्या?

Add Zee News as a Preferred Source

का होतात पांढरे केस?

व्हिटॅमिन डी आणि बी१२ ची कमतरता – जर मुलाच्या शरीरात व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असेल तर ते पांढऱ्या केसांची समस्या निर्माण करू शकते. म्हणून, मुलांना व्हिटॅमिन डी आणि बी१२ समृद्ध आहार द्या. हे पोषक घटक शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

खनिजांमध्ये लोह आणि तांब्याची कमतरता – शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे मुलांचे केस लवकर पांढरे होऊ शकतात. याशिवाय तांबे, व्हिटॅमिन-बी आणि सोडियमच्या कमतरतेमुळे देखील केस अकाली पांढरे होतात. तुमच्या आहारात या पोषक तत्वांचा समावेश करा.

अँटीऑक्सिडंट्सचा अभाव – ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे मेलेनिन कमी होऊ शकते आणि केस अकाली पांढरे होऊ शकतात. यासाठी मुलांच्या आहारात शक्य तितक्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा. अन्नात अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा.

फॉलिक ऍसिडची कमतरता – मुलांच्या आहारात फॉलिक अॅसिडची कमतरता देखील केस पांढरे होऊ शकते. राखाडी केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी, आहारात वाटाणे, बीन्स, काजू आणि अंडी समाविष्ट करा. यामुळे फॉलिक अॅसिडची कमतरता पूर्ण होऊ शकते.

उपाय काय?

आहारात शक्य तितके निरोगी पदार्थ समाविष्ट करा. मुलांना आवळा खायला द्या. आवळा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. ते नैसर्गिकरित्या केस काळे ठेवण्यास मदत करते. आहारात आयोडीनयुक्त पदार्थ समाविष्ट करा. गाजर आणि केळी शक्य तितके खायला द्या. रासायनिक शाम्पूपासून मुलांना वाचवा. केसांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी मालिश करा. चांगल्या तेलाने टाळूची मालिश करा. यामुळे केसांना मेलेनिन पुरवणाऱ्या ग्रंथी सक्रिय होतील. केस पांढरे होण्याची समस्या देखील कमी होईल.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  

 





Source link

अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडमध्ये वाढता विरोध कशासाठी?

0
अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडमध्ये वाढता विरोध कशासाठी?



why mulund residents oppose dharavi rehabilitation project for ineligible residents विश्लेषण : अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडमध्ये वाढता विरोध कशासाठी?





Source link

फलटणमध्ये महा रक्तदान शिबिर… खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून लोकहितासाठी मोठा उपक्रम

0
फलटणमध्ये महा रक्तदान शिबिर… खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून लोकहितासाठी मोठा उपक्रम

फलटण, दि. 20 जुलै 2025 (साहस Times)
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात महा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून एक भव्य महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर भारतीय जनता पक्ष व महायुती फलटण तालुका, शहर यांच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या शिबिराबाबत आवाहन करताना सांगितले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अनेक वेळा गरजूंना वेळेवर रक्त मिळत नाही, त्यामुळे जनतेच्या सहकार्याने अशा उपक्रमांमधून रक्ताचा साठा वाढवणे हे आपले कर्तव्य आहे.”

या उपक्रमात फलटण तालुक्यातील सर्व नागरिक, भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजक:
महायुती, फलटण तालुका
भारतीय जनता पक्ष, फलटण शहर व तालुका

,

गटारी साजरी करणार आहात? एका दिवसात किती चिकन खाणं आरोग्यासाठी योग्य?

0
गटारी साजरी करणार आहात? एका दिवसात किती चिकन खाणं आरोग्यासाठी योग्य?


Gatari 2025 : महाराष्ट्रात आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्याला अतिशय महत्त्व आहे. आषाढी अमावस्यानंतर सुरु होतो तो श्रावण महिना, जो धर्मात शुभ मानला जातो. श्रावणात एक महिना नॉनव्हेज आणि मद्यपान केलं जातं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एक अजून परंपरा आहे, आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. या गटारी अमावस्याला नॉनव्हेज प्रेमी मनसोक्त मासांहार आणि मद्यपान करतात. कारण पुढील महिनाभर त्यांना नॉनव्हेज खायला मिळणार नाही. यंदा आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या 24 जुलै 2025 ला साजरी करण्यात येणार आहे. दीप अमावस्या ही 24 जुलै म्हणजे गुरुवारी असणार आहे. गुरुवारी महाराष्ट्रीय लोक नॉनव्हेज खात नाहीत. त्यामुळे बुधवार 23 जुलै 2025 गटारी अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. तुम्ही पण गटारी साजरी करण्याचा विचारात असाल तर एकदा दिवसात किती चिकन खाणं आरोग्यासाठी योग्य आहे जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

आरोग्य तज्ञ्जानुसार एका सर्वसामान्य सृढय व्यक्तीला साधारण 25 ते 40 टक्के कॅलरी फॅटची गरज असते. जी व्यक्ती खूप मेहनत करतात, त्यांना जास्त कॅलरीची गरज असते. पण जे जास्त शारीरिक मेहनत घेत नाहीत, त्यांना जास्त कॅलरीची गरज नसते. दररोज भाजीपाला प्रथिनांच्या जागी मांस नियमितपणे खाल्ले जाऊ शकतं; ते फक्त तुम्ही ते कसे खाता यावर अवलंबून आहे. विशेषतः चिकन हे रोजच्या वापरासाठी विचारात घेण्यासारखे सर्वोत्तम मांस आहे. तुम्हाला फक्त काही प्रकारचे मांस टाळावे लागेल: क्रिमी चिकन डिशेस, मसालेदार जड पदार्थ, तळलेले पदार्थ इ. कमीत कमी मसाल्यांसह ग्रील्ड किंवा रोस्टेड चिकन खाण्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्याकडे एक चांगला दैनंदिन आहार असेल. 

चिकनमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात ज्यामुळे ते एक उल्लेखनीय डिश बनते. 100 ग्रॅम चिकनमध्ये 124 किलोकॅलरी, 3 ग्रॅम फॅट आणि 20 ग्रॅम प्रथिने असतात. तर चिकनमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, सोडियम आणि व्हिटॅमिन डी यासारखे काही चांगले जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. चिकन हे प्रथिनांच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहे. हे महत्वाचे आहे कारण प्रथिने तुमच्या शरीराच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ते पेशीय उत्पादन आणि पुनरुत्पादनासाठी जबाबदार आहे.

पण चिकन हा असा पदार्थ आहे जो तुम्ही दररोज खाऊ शकता आणि फक्त तो योग्य पद्धतीने शिजवून खाणे महत्त्वाचे आहे. जास्त शारीरिक श्रम न करणाऱ्या व्यक्ती जास्त दूध, दही, तूपाचे पदार्थ किंवा मासांहार करतात तेव्हा त्यांना स्थूलपणाला सामोरे जावे लागते. तसंच त्या व्यक्ती विविध आजारांना बळी पडतात. ज्या व्यक्तींना मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाव, ट्रायग्लिसराइड, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाचा आजार असेल त्यांना साधारण 10 ते 15 टक्के कॅलरी एवढेच सेवन योग्य कराल. 

ओमेगा 3 सारखे काही गरजेचे फॅटी एसिड्स फॅट्स आहेत, जे केवळ अन्नातून मिळतात, ते आपल्या शरीरासाठी अनिवार्य आहेत. इतर फॅटी अॅसिडमुळे आपले शरीर कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन स्वत:निर्माण करते. तुम्ही सर्वसाधारण आयुष्य जगताय. म्हणजे अॅथलिट, बॉडीबिल्डर, वेटलिफ्टर, स्ट्रॉंगमॅन अशा व्यवसायात नसाल तर हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. कारण अशावेळी तुम्ही साधारण 30 ग्रॅम प्रोटीन शरिराला आवश्यक आहे.

आता चिकनच्या हिशोबात 30 ग्रॅम प्रोटीन पाहायला गेलं तर 100 ग्रॅम चिकनमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे एकावेळेस तुम्ही 100 ग्रॅम चिकन खाऊ शकता. पण 100 ग्रॅम चिकनसोबत शरीराला उपयोगी असणारे कार्ब, विटामिन, फायबर असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणेदेखील आवश्यक मानले गेले आहे.  





Source link

Kidney Health Tips : कॉफी प्यायल्याने किडनी खराब होते का? Fact Check एका दिवसांत किती कप कॉफी पिणे योग्य?

0
Kidney Health Tips : कॉफी प्यायल्याने किडनी खराब होते का? Fact Check एका दिवसांत किती कप कॉफी पिणे योग्य?


How much Coffee is Right to Drink Daily: सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिणे अनेकांना आवडते. ते दिवसभरात ३-४ कप कॉफी देखील पितात. पण कॉफी पिणे आपल्या यकृतासाठी चांगले आहे की वाईट असा प्रश्न आपल्या मनात येतो. अलिकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु जेव्हा ती योग्य पद्धतीने तयार केली जाते आणि सेवन केली जाते. यासोबतच, ती एका मर्यादेत प्यावी. दररोज किती कप कॉफी पिणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे. यापेक्षा जास्त कॉफी पिणे विषारी ठरू शकते, जे तुमच्या यकृताला नुकसान पोहोचवू शकते.

कॉफी पिण्याचे फायदे

कॉफी फॅटी लिव्हरचे आरोग्य योग्य पद्धतीने राखण्यास मदत करू शकते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये यकृतामध्ये जास्त चरबी आणि कोलेजन जमा होते. हे बहुतेकदा जास्त वजन असलेल्या, मधुमेह असलेल्या किंवा असामान्य लिपिड प्रोफाइल असलेल्या लोकांना प्रभावित करते. जर उपचार न केले तर ते यकृताचे सिरोसिस, यकृत कर्करोग किंवा अगदी यकृत निकामी होण्यासारख्या गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

क्युरियसमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, दिवसातून ३-४ कप कॉफी पिल्याने इन्सुलिन प्रतिरोधकता आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारून NAFLD (ज्याला मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) देखील म्हणतात) होण्याचा धोका कमी होतो. ते फायब्रोसिस, सिरोसिस आणि हिपॅटायटीस बी आणि सी सारख्या संसर्गासारख्या यकृताच्या समस्यांची प्रगती देखील कमी करू शकते.

कॉफी पिल्याने यकृताचे नुकसान होते का?

आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुम्ही मर्यादित प्रमाणात (दिवसाला सुमारे ३-४ कप) कॉफी प्यायली तर ते यकृतासाठी चांगले असू शकते. यापेक्षा जास्त कॉफी पिल्याने हृदयाचे ठोके, चिंता वाढू शकते आणि पोटात आम्लाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे, तुम्ही डिहायड्रेशन आणि अॅसिड रिफ्लक्सचे बळी देखील होऊ शकता.

कोणी पिऊ नये?

ज्यांना सिरोसिस आहे त्यांनी कॉफी पिणे टाळावे. असे लोक कॅफिन योग्यरित्या पचवू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना समस्या निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, ज्या महिला अलिकडेच रजोनिवृत्तीतून गेल्या आहेत त्या अधिक हार्मोनल बदलांना बळी पडू शकतात. ज्यांचे हृदय गती वाढते किंवा कमी होते किंवा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी देखील जास्त कॉफी पिणे टाळावे. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना चिंता, थरथरणे, उच्च रक्तदाब आणि निद्रानाश यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

योग्य पद्धत?

जर तुम्हाला यकृताची तंदुरुस्ती राखून कॉफीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी सर्वात आरोग्यदायी पर्याय म्हणजे साखर, क्रीम किंवा जास्त चरबीयुक्त दुधाशिवाय बनवलेली ब्लॅक कॉफी. फॅटी लिव्हर किंवा चयापचय समस्या असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर मानले जाते. पेपर फिल्टर (ड्रिप किंवा ओव्हर-ओव्हर कॉफीमध्ये) वापरणे चांगले आहे कारण ते कॅफेस्टोल आणि काहवेओल सारखे काही संयुगे काढून टाकते जे खराब कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात.

कोल्ड कॉफी किती फायदेशीर?

आरोग्य तज्ञांच्या मते, कोल्ड कॉफी हा यकृताच्या तंदुरुस्तीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो, तो अधिक मऊ आणि कमी आम्लयुक्त असतो, ज्याचा पोटावर जास्त परिणाम होत नाही. तुम्ही दिवसातून २-३ कप साधा किंवा फिल्टर केलेला कॉफी पिऊ शकता. यापेक्षा जास्त कॉफी पिणे हानिकारक असू शकते. इन्स्टंट कॉफी किंवा फ्रॅप्स सारखे गोड पेये टाळावीत कारण ते यकृतासाठी फार कमी फायदेशीर असतात. तसेच तुमची कॉफी स्वच्छ पाण्याने बनवलेली आहे आणि प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने बनवली आहे याची खात्री करा.





Source link

ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी अहवाल अद्यापही प्रलंबित, आंदोलनाचा इशारा

0
ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी अहवाल अद्यापही प्रलंबित, आंदोलनाचा इशारा

अकलूज ( साहस Times प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील मौजे तांबवे ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व लिपिकाने संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला असून याविरोधात दिव्यांग क्रांती लोकसेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन २२ मे २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात आले होते.

संघटनेने केलेल्या आरोपांनुसार, ग्रामसेवक एस.एस. जाधव भाऊसाहेब आणि लिपिक एस.एम. ढोबळे यांनी १४ वा व १५ वा वित्त आयोग, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, दलित वस्ती सुधार योजना, जलजीवन मिशन, शाळा खोली व अंगणवाडी बांधकाम आदी विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासन व जनतेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांनी शासन निधीचा अपहार करून स्वतःच्या नावावर अवैध स्थावर-जंगम मालमत्ता कमावल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे.

या भ्रष्टाचारविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेत माळशिरस पंचायत समितीने १५ दिवसांत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज पंधरा दिवस उलटूनही गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केलेली नाही, त्यामुळे संघटना नाराजी व्यक्त करत आहे.

संस्थापक अध्यक्ष सत्यवान भोसले यांनी सांगितले की, “प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जर लवकरात लवकर सखोल चौकशी न होऊन कारवाई झाली नाही, तर संघटनेच्यावतीने अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येईल.”

संघटनेने पाठवलेल्या निवेदनात पुढील मागण्या ठेवण्यात आल्या आहेत :

  • संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय जातेनिहाय सखोल चौकशी करण्यात यावी.
  • ईडी, भ्रष्टाचारविरोधी दक्षता पथकाद्वारे मनी लॉन्ड्रिंग व अपहार प्रकरणी तपास करण्यात यावा.
  • चौकशी पूर्ण होईपर्यंत ग्रामसेवक जाधव यांची अन्य ग्रामपंचायतीत बदली करू नये.
  • लिपिक ढोबळे यांना कोणतीही पदोन्नती, इन्क्रिमेंट अथवा वेतनवाढ देऊ नये.

न्यायाची अपेक्षा ठेऊन आंदोलन थांबवण्यात आले होते, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संघटना पुन्हा आक्रमक पावले उचलणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

साहस Times

सावधान! नायलॉन मांजाचा वापर धोकादायक – फलटणमध्ये पोलीसांची कारवाई सुरू

0
सावधान! नायलॉन मांजाचा वापर धोकादायक – फलटणमध्ये पोलीसांची कारवाई सुरू

फलटण, साहस Times प्रतिनिधी :- नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पतंग उड्डाणाचा उत्साह चांगलाच वाढला असताना, फलटण शहरात नायलॉन / चायना मांजाचा वापर करणे अनेकांसाठी जखमांचे कारण ठरू लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुले आणि युवक मोठ्या संख्येने पतंग उडवीत आहेत. मात्र काहीजण चुकीच्या प्रकारच्या मांजाचा वापर करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत.

फलटण शहर पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये अशाच प्रकारच्या मांजाच्या वापरामुळे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते –

  • ९ ऑगस्ट २०२४: उंब्रेश्वर चौक येथे रेवणसिद्ध यादवतेजस कांबळे यांच्याकडून नायलॉन मांजा मिळाल्याने गु.नं. ३९९/२०२४, कलम २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल.
  • ९ ऑगस्ट २०२४: मेटकरी गल्ली येथे शाहरुख काझी यांच्या विरोधात गु.नं. ३९६/२०२४, कलम २२३, १२५ अंतर्गत गुन्हा दाखल.
  • ९ ऑगस्ट २०२४: रानडे पेट्रोल पंपासमोरील घटनेत दिपक लांडगे हे नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध गु.नं. ४००/२०२४ दाखल.

यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात आणखी एक नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे फलटण शहर पोलीसांनी चायना व नायलॉन मांजावर बंदी आणण्यासाठी व्यापक मोहीम सुरु केली आहे. पतंग दोऱ्याचे विक्रेते, अपार्टमेंट्स, वसाहती याठिकाणी तपासण्या सुरू आहेत.

आज दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सोमवार पेठ, मंगळवार पेठ येथे सायंकाळी ६ वाजता पतंग उडवत असलेली काही अल्पवयीन मुले पोलिसांना पाहून पळून गेली. त्यांनी टाकून दिलेल्या पतंगाच्या दोऱ्यांमध्ये नायलॉनच्या चार रीळा आढळून आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुलांचा शोध सुरू आहे.

मोलाची सूचना
नायलॉन / चायना मांजा केवळ मानवासाठीच नव्हे तर पक्षी व प्राणी यांच्यासाठीही जीवघेणा ठरतो. त्याचा वापर पर्यावरणविरुद्ध असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घालणारी अधिसूचना लागू केली आहे. याची अंमलबजावणी पोलीस, महसूल, वनविभाग व अन्य यंत्रणा करत आहेत.

नायलॉन किंवा चायना मांजाचा वापर गुन्हा असून, भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत संबंधितांवर कडक कारवाई केली जाते. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. कोणी असा मांजा वापरताना आढळल्यास टोल फ्री ११२ किंवा फलटण पोलीस ठाणे – ०२१६६ २२२३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बँकिंग क्षेत्राला हादरा : बारामतीत बँक मॅनेजरची आत्महत्या, कामाच्या ताणाला कंटाळून टोकाचा निर्णय

0
बँकिंग क्षेत्राला हादरा : बारामतीत बँक मॅनेजरची आत्महत्या, कामाच्या ताणाला कंटाळून टोकाचा निर्णय

बारामती | साहस Times प्रतिनिधी :- बँकिंग क्षेत्रात कामाच्या तणावाचा आणखी एक बळी गेला असून, बारामती शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय ४५) यांनी बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनंतर बारामती परिसरात विशेषतः बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे – कामाचा असह्य ताण आणि वरिष्ठांचा मानसिक दबाव. “सर्व कर्मचारी आपली जबाबदारी समजून घेतात आणि १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कृपया त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार टाकू नये,” अशी मार्मिक विनंतीही त्यांनी चिठ्ठीद्वारे केली आहे.

ते पुढे लिहितात, “आत्महत्येचा निर्णय मी पूर्ण शुद्धीत आणि स्वतःच्या इच्छेने घेत आहे. यासाठी माझ्या कुटुंबातील कुणीही जबाबदार नाही.” पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांची माफी मागत, “माझ्या मृत्यूनंतर डोळ्यांचे दान करावं,” अशी शेवटची इच्छा देखील त्यांनी नमूद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून शिवशंकर मित्रा अत्यंत तणावात होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच गेला आणि अखेर त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

या घटनेनंतर बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पायलट सुमितने बंद केले एअर इंडिया-१७१ चे फ्यूल स्विच? US मीडियाचे दावे भारताने फेटाळले

0
पायलट सुमितने बंद केले एअर इंडिया-१७१ चे फ्यूल स्विच? US मीडियाचे दावे भारताने फेटाळले


Air India Flight Crash: एअर इंडियाचे विमान 171 च्या दुर्घटनेनंतर प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. अपघातापूर्वी वैमानिकांचे संभाषणही शोधण्यात आले आहे. कॉकपिट रेकॉर्डिंगचा हवाला देत पायलटने इंजिनचा इंधन पुरवठा बंद केल्याचा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमे करत आहेत. मात्र, भारताने तो साफ फेटाळून लावला आहे.



Source link

ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे निधन

0
ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे निधन

फलटण | साहस Times प्रतिनिधी. : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव (वय 63) यांचे गुरुवारी रात्री नागपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रा. रमेश आढाव हे पत्रकारितेतील अभ्यासू, निगर्वी आणि मुद्देसूद व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. पत्रकार परिषद, सामाजिक प्रश्न, आणि गावकारभार या साऱ्याच क्षेत्रांत त्यांनी आपली स्पष्ट, निर्भीड भूमिका कायम ठेवली होती.

त्यांचे पार्थिव शनिवारी दिनांक 19 रोजी सकाळी 7.oo वाजता गुणवरे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेथून अंत्ययात्रा निघेल आणि त्यांच्या गुणवरे येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

साहस टाइम्सतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.