Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 170

🔹 फलटण नगरीच्या विकासात नवे पर्व : ‘मुधोजी क्लब’च्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनाने रंगणार इतिहास 🔹

0
🔹 फलटण नगरीच्या विकासात नवे पर्व : ‘मुधोजी क्लब’च्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनाने रंगणार इतिहास 🔹

फलटण ( साहस Times) – फलटणच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील अग्रणी संस्था ‘मुधोजी क्लब’च्या नव्या इमारतीच्या भूमीपूजनाचा ऐतिहासिक सोहळा गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा फुले चौकातील क्लब परिसरात संपन्न होणार आहे. या नव्या वास्तूचे भूमीपूजन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार असून, फलटणच्या प्रगतीच्या वाटचालीत हा एक नवा अध्याय ठरणार आहे.

या कार्यक्रमाला श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (उपाध्यक्ष, मुधोजी क्लब), श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (चेअरमन, मुधोजी क्लब), राजीव नाईक निंबाळकर (सेक्रेटरी), हेमंत भोसले (खजिनदार), नितीनभैय्या भोसले (मा. उपनगराध्यक्ष, नगरपरिषद), तसेच क्लबचे विश्वस्त समर जाधव, डॉ. महेश बर्वे, महादेव माने आणि व्यवस्थापक बाळासाहेब बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या नव्या इमारतीमुळे शहरातील युवक, नागरिक आणि क्रीडापटूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, फलटणच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी ही वास्तू केंद्रबिंदू ठरणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन दुरुस्ती व सुविधा सुधारणा संदर्भात लुंबिनी संस्थेचे निवेदन

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन दुरुस्ती व सुविधा सुधारणा संदर्भात लुंबिनी संस्थेचे निवेदन

फलटण (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन (समाज मंदिर), मंगळवार पेठ, फलटण या ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूची तातडीने दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी लुंबिनी बहुद्देशीय संस्थेच्यावतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात समाज मंदिरात पूर्वीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्तमानपत्र वाचनालय सुरू करणे, तसेच आंबेडकर वाचनालयातील खिडक्यांना साउंडप्रूफ ग्लास आणि मजबूत ग्रील बसविणे, यासारख्या महत्त्वाच्या सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन लुंबिनी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक कुणाल किशोर काकडेॲड. सुरज काकडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी फलटण नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी मोरे साहेब यांना सादर केले.

मुख्याधिकारी मा. मोरे साहेबांनी या मागण्यांची गंभीर दखल घेत त्वरित कामे हाती घेण्याची ग्वाही दिली, असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

स्थानिक नागरिकांतून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून, स्मृती भवनाच्या सुधारित सुविधांमुळे सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उत्तरकाशीपाठोपाठ आता कुमाऊंमध्ये पाऊस, रस्ते बंद; नद्यांना आला पूर

0
उत्तरकाशीपाठोपाठ आता कुमाऊंमध्ये पाऊस, रस्ते बंद; नद्यांना आला पूर



उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसामुळे लोक हैराण झाले आहेत.



Source link

डीजे, डॉल्बी मिरवणुकीवर बंदीची साताऱ्यात मागणी; कोल्हापुरात गणेशोत्सवात लेसर लाईटला बंदी

0


Laser lights banned during Ganeshotsav in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात गणेश उत्सव कालावधीत लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गणेश मुर्ती आगमन, घरगुती गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुक तसेच इतर कार्यक्रमादरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा शो किंवा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्यये 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईट वापरास प्रतिबंध केला आहे. दुसरीकडे, साताऱ्यातही ज्येष्ठ नागरिकांनी डिजेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. डीजेसह होणारी मिरवणूक ही अंत्ययात्रा असून त्याला काहीही करून बंदी आणावी, अशी मागणी ज्येष्ठ सातारा पोलिसांना निवेदन देत मागणी केली आहे. 

उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र

दरम्यान, कोल्हापुरात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकांमध्ये गणेश उत्सव मंडळांकडून लेझर, लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्याकरीता आलेल्या भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्याने व्यक्तींचा डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा झाल्या होत्या. गणेश उत्सव कालावधीत विसर्जन मिरवणूक तसेच इतर कार्यक्रमा दरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्यास व्यक्तीच्या डोळ्याचा पडदा तसेच बुबुळाला इजा होवू शकते. यासाठी हा आदेश देण्यात आला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असेही या अधिसुचनेत नमुद करण्यात आले आहे.

डॉल्बी, डीजे, लेझर लाईट बंद करण्याची मागणी

दुसरीकडे, सातारा शहराला ‘पेन्शनधारकांचे शहर’ म्हणून ओळखले जाते, कारण तेथे निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहतात. काही दिवसांवरच सार्वजनिक उत्सव,मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांना अनेक समस्या भेडसवु लागल्या आहेत. डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयविकारग्रस्त रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे सातारातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बी, डीजे, लेझर लाईट बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी सह पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये अनुभवसंपन्न अधिकाऱ्याची पुनरागमन!स्वच्छतेच्या राष्ट्रीय यशानंतर मुकेश अहिवळे पुन्हा फलटण नगर परिषदेत रुजू

0
फलटणमध्ये अनुभवसंपन्न अधिकाऱ्याची पुनरागमन!स्वच्छतेच्या राष्ट्रीय यशानंतर मुकेश अहिवळे पुन्हा फलटण नगर परिषदेत रुजू

फलटण प्रतिनिधी –स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत कराड शहराला गौरव मिळवून देणारे, अनुभवी आरोग्य निरीक्षक मुकेश विनायक अहिवळे यांनी आता फलटण नगर परिषदेत आरोग्य निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या पुनरागमनाने स्थानिक स्वच्छता मोहिमांना नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिवळे यांनी यापूर्वी कराड नगरपरिषदेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असताना, केंद्र सरकारतर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत, पश्चिम विभागात ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात कराडला द्वितीय क्रमांक मिळवून दिला होता. याबद्दलचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात देण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ, कराड पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर आणि मुकेश अहिवळे उपस्थित होते.

मूळचे फलटण येथील असलेले अहिवळे यांनी फलटण नगर परिषदेतूनच आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली होती. सेवाबढतीनंतर त्यांची कराड येथे बदली झाली होती. आता विशेष बदलीने ते पुन्हा आपल्या मूळ गावी फलटणमध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत.

त्यांच्या अनुभवाचा फायदा फलटण शहराच्या स्वच्छता अभियानास निश्चितच होईल, असा विश्वास नगर परिषद वर्तुळात व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील  सर्वात मोठी कारवाई; बोगस शिक्षकांची उचलबांगडी, निलंबन व गुन्हे दाखल

0
साताऱ्यातील  सर्वात मोठी कारवाई; बोगस शिक्षकांची उचलबांगडी, निलंबन व गुन्हे दाखल

सातारा – राज्यात शिक्षण क्षेत्राला कलंक ठरणाऱ्या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर जोरदार कारवाईचा दणका सुरु झाला आहे. यामध्ये आतापर्यंत ३८ शिक्षकांची बदलीच्या लाभातून उचलबांगडी करण्यात आली असून, दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. तर, तीन शिक्षक निलंबित झाले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई जिल्हा परिषद साताऱ्यातून सुरु झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष येथे केंद्रित झाले आहे.

सीईओ याशनी नागराजन यांच्या कठोर निर्णयांची फलश्रुती

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी बोगस शिक्षकांविरोधात कठोर पावले उचलत राज्यातील सर्वात मोठ्या फेरतपासणी मोहिमेची सुरुवात केली. त्यांच्या आदेशानुसार, सुमारे ५८६ शिक्षकांची वैद्यकीय फेरतपासणी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केली जात आहे.

  • शारीरिक तपासणीसाठी पाठवले शिक्षक – ३२७
  • तपासणीस उपस्थित – ३००
  • पात्र ठरले – २२५
  • अपात्र ठरले – ६०
  • गैरहजर – २७

यातील ६० शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले असून, गैरहजर २७ शिक्षकांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. मात्र, पुन्हा गैरहजर राहिल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार आहे.

बोगस दिव्यांग आणि आजारग्रस्त प्रमाणपत्र धारक उघडे

संवर्ग १ व २ मधून बदलीचा लाभ घेण्यासाठी काही शिक्षकांनी बनावट दिव्यांगत्वाचे किंवा दुर्धर आजाराचे दाखले सादर केल्याचे उघडकीस आले आहे. वैद्यकीय फेरतपासणीत अशा ३८ शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांच्या जागा आता संवर्ग ४ मधील पात्र शिक्षकांसाठी खुल्या करण्यात येत आहेत. विन्सीस आयटी कंपनीमार्फत या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

पुण्यनगरीचा लढा ठरला निर्णायक

या संपूर्ण गौडबंगालाचा पर्दाफाश करण्याचे महत्त्वाचे कार्य दै. पुण्यनगरीने केले. यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत कारवाईचा बडगा उचलला. शिक्षणातील बोगसगिरी थांबवण्यासाठी हा लढा प्रेरणादायक ठरत आहे.

पुढील टप्पा:
गैरहजर व अपात्र शिक्षकांवर निलंबन व फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू असून, शिक्षण क्षेत्रात स्वच्छता आणि पारदर्शकता यासाठी ही मोठी पावले मानली जात आहेत.

पालघर : सफाळे इंडोर स्टेडियममध्ये पुणे पलटणचा सराव, क्रिकेट सोबत कबड्डीचे प्रशिक्षण वर्ग

0
पालघर : सफाळे इंडोर स्टेडियममध्ये पुणे पलटणचा सराव, क्रिकेट सोबत कबड्डीचे प्रशिक्षण वर्ग



Puneeri Paltan Kabaddi team trains at Omtex Indoor Stadium in Safale, Palghar, सफाळे इंडोर स्टेडियममध्ये पुणे पलटणचा सराव, क्रिकेट सोबत कबड्डीचे प्रशिक्षण वर्ग





Source link

Option to invest in gold for a thousand rupees What is this scheme print eco news

0
Option to invest in gold for a thousand rupees What is this scheme print eco news



Option to invest in gold for a thousand rupees What is this scheme print eco news | सोनेप्रेमींसाठी अतीव महत्त्वाचे… सोन्यांत केवळ हजार रुपयांत गुंतवणुकीचा पर्याय! काय आहे ही योजना समजून घ्या…





Source link

₹10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299; आईच्या निधनानंतर अकाऊंटमध्ये आली तब्बल इतकी रक्कम; मोजून थकले

0
₹10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299; आईच्या निधनानंतर अकाऊंटमध्ये आली तब्बल इतकी रक्कम; मोजून थकले


Viral News: राजधानी दिल्लीला लागून असणाऱ्या नोएडामध्ये एका 20 वर्षीय तरुणाच्या खात्यात अचानक इतके पैसे आले की बँक कर्मचारी हैराण झाले. ही रक्कम इतकी मोठी होती की, तिला मोजणंही कठीण झालं होतं. रकमेचा हा आकडा 37 अंकी आहे. अनेकांनी दावा केला आहे की, दीपक नावाचा हा तरुण भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त श्रीमंत झाला आहे. त्याच्या खात्यात तब्बल ₹10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 इतकी रक्कम आली आहे. ही बातमी पसरताच दीपकला नातेवाईक, शेजारी आणि मित्रांचे फोन येऊ लागले. इतके फोन येऊ लागल्यानंतर दीपकही हैराण झाला आणि आपला फोन बंद करुन टाकला. 

सचिन गुप्ता नावाच्या एका पत्रकाराने सकाळी याबद्दल पोस्ट शेअर केली होती. त्यांनी सांगितलं की. हे पैसे 20 वर्षीय दीपकच्या कोटक बँक खात्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की ही रक्कम सुमारे 1 अब्ज 13 लाख 56 हजार कोटी आहे. सचिन गुप्ता यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “माझे गणित थोडे कमकुवत आहे. इतर लोक गुणाकार आणि भागाकार करू शकतात. सध्या, आयकर विभाग याची चौकशी करत आहे. बँक खाते गोठवण्यात आले आहे.”

काय होता मेसेज?

मीडिया रिपोर्टनुसार, हे खातं दीपकची आई गायत्री देवी यांचं होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं होतं. यानंतर दीपक हे अकाऊंट चालवत होता. 3 ऑगस्टच्या रात्री दीपकला एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये खात्यात ₹1.13 लाख करोड़ (₹1,13,56,000 करोड़) जमा झाल्याचं लिहिण्यात आलं होतं. 

हा मेसेज पाहिल्यानंतर दीपकलाही विश्वास बसत नव्हता. त्याने आपल्या मित्रांना मेसेज दाखवला आणि शून्य मोजण्यास सांगितले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक बँकेत गेला. आपल्या खात्यात खरंच इतके पैसे जमा झाले आहेत का? हे त्याला जाणून घ्यायचं होतं. बँक अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं की, त्याच्या खात्यात खरोखरच इतके पैसे आहेत. पण त्यांनी त्याला इतके पैसे जमा केल्याने संशय निर्माण होत आहे, यामुळे खाते गोठवण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं. बँकेने ताबडतोब आयकर विभागाला याबद्दल माहिती दिली. आयकर विभाग आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

ही तांत्रिक किंवा बँकेची चूक होती की पैशांच्या अफरातफरीचे प्रकरण आहे याचा तपास अधिकारी करत आहेत. चौकशीनंतरच सत्य समोर येईल. अनेक नेटकऱ्यांनी हे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, “हे शक्य नाही. ही बँकेच्या सॉफ्टवेअरमधील किंवा मॅन्युअल एन्ट्रीमधील चूक आहे.”

दुसऱ्या एका युजरने 20 वर्षांचा मुलगा आता अंबानींपेक्षा श्रीमंत आहे असं उपाहासात्मकपणे म्हटलं आहे. एका व्यक्तीने तर रक्कम मोजण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “एकशे क्विंटिलियन, एकशे पस्तीस क्वाड्रिलियन, सहाशे ट्रिलियन, दहा दशलक्ष, तेवीस हजार, पाचशे साठ आणि दोनशे नव्वद.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘कोणाला अच्छे दिन आले असतील किंवा नसतील, पण भावाचे चांगले दिवस आले आहेत. त्याने मोदीजींचे आभार मानले पाहिजेत.’





Source link

आमच्याकडे BRICS आहे… टॅरिफ टॅक्टिक्स दरम्यान डोनाल्ड ट्रम्पला रशियाने सुनावले

0
आमच्याकडे BRICS आहे… टॅरिफ टॅक्टिक्स दरम्यान डोनाल्ड ट्रम्पला रशियाने सुनावले


रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर उघडपणे टीका केली असून, अमेरिकेचे सरकार जगभरातील देशांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शुल्काचे डावपेच वापरत आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झखारोवा म्हणाल्या की, अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा आणि स्वतंत्र मार्ग निवडणाऱ्या देशांवर शुल्काची धमकी देत आहे आणि राजकीय हेतूने प्रेरित आर्थिक दबाव आणत आहे.



Source link