Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 169

वैतागून जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला अन् शंभुराज देसाईंनीच उचलला; 7/12 चं काम झटक्यातच झालं

0


सातारा : सरकारी काम अन् 6 महिने थांब ही म्हण आपल्याला केवळ माहिती नाही, तर अनेकांनी अनुभवली देखील असेल. कारण, शासकीय काम म्हटलं की कार्यालयात हेलपाटे मारा, सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा मागे लागा असेच असते. त्यामुळे, सामान्य माणूस वैतागून जातो. सरकारी कार्यालयात कधीकधी फोनही उचलला जात नाही. मात्र, जर तुमचं काम होत नसेल अन् तुम्ही सरकारी कार्यालयातील लँडलाईवर फोन केल्यानंतर चक्क पालकमंत्रीच (Shambhuraj desai) फोन उचलत असतील तर सुखद धक्काच म्हणावा लागेल. साताऱ्यातही (Satara) अशीच घटना घडली अन् एका वकिलाचं सातबाऱ्यासंदर्भातील गेल्या अनेक दिवसांपासून पेंडिग असलेलं काम झटक्यात मार्गी लागलं.  

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळे प्रचलित आहेत, त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्याचा त्यांचा हातखंडा आहे. सातारा दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात असाच एक प्रत्यय आज पत्रकार परिषद सुरू असताना आला. पत्रकार परिषद सुरु असताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील लँडलाईन फोनची रिंग वाजली आणि तो वाजत असलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला. फोनवरुन बोलणारी व्यक्ती बऱ्याच दिवसापासून 7/12 दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होती. त्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांना करण्यासाठी फोन केला अन् योगायोगाने थेट पालकमंत्र्यांनीच हा फोन उचलला. त्यावेळी, जिल्हाधिकारी समजून संबंधित व्यक्तीने स्वतःची तक्रार केली, त्याचं गाऱ्हाण मांडलं. त्यांवर पालकमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न समजून घेऊन मी पालकमंत्री बोलतोय, असा सुखद धक्का संबंधित व्यक्तीला दिला. तसेच, तुमचं काम करुन देतो, म्हणत फोन ठेवला. त्यानंतर, शंभुराज देसाई यांनी प्रांतधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दिल्या. 

दरम्यान, शंभुराज देसाईंच्या या तत्परतेने, योगायोगानं एका वकिलाचं अडलेलं काम मार्गी लागलं, त्यामुळे फोन करणाऱ्या व्यक्तीने शंभूराज देसाई यांचे आभार मानले. चुकून उचललेल्या फोनमुळे एकाचं काम मात्र मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची चर्चाही जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात होतेय, तर असेच इतरही लोकांची कामे व्हावीत, असाही सूर उमटत आहे. 

केदारेश्वर मंदिराची नव्याने उभारणी

दरम्यान, कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान श्री केदारेश्वर मंदिराची नव्याने उभारणी केली जात आहे. याच मंदिराचा भूमिपूजन सोहळा आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या मंदिराचे पावित्र्य कायम ठेवून 12 कोटी रुपये खर्च करून हे भव्य दिव्य मंदिर दिमागदारपणे उभे करण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा

नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

आणखी वाचा



Source link

विकासाचा नवा अध्याय – रणजितसिंह नाईक निंबाळकर व सचिन पाटील यांच्या पुढाकाराने कामांना वेग

0
विकासाचा नवा अध्याय – रणजितसिंह नाईक निंबाळकर व सचिन पाटील यांच्या पुढाकाराने कामांना वेग

फलटण | साहस Times प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षाच्या सत्तेखाली असतानाही विकासाच्या प्रतीक्षेत असलेले फलटण शहर आता अखेर नव्या वाटेवर वाटचाल करत आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे शहरातील रस्त्यांच्या विकासाला गती मिळाली असून, अनेक कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गल्ल्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा व शिवाजीनगर येथील श्रीमंत स्व. दादराजे खर्डेकर नगर परिषद शाळा क्रमांक ७ च्या मोकळ्या जागेत नव्याने उभारण्यात येणाऱ्या वॉकिंग ट्रॅकच्या कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

या कार्यक्रमास स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सुदाम मांढरे, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, फिरोज आतार, डॉ. प्रवीण आगवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, युवा उद्योजक अमित भोईटे, भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर म्हणाल्या, “शहराच्या विकासाला अनेक वर्षे अडथळे होते, मात्र आता बदलाची सुरुवात झाली असून प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधांचा विकास हे आमचे ध्येय आहे.”

    Shiva Serial Last Ep Purva Kaushik Emotional Post : ‘शिवा’ची भूमिका साकारणारी पूर्वा कौशिक झाली भावुक

    0
    Shiva Serial Last Ep Purva Kaushik Emotional Post : ‘शिवा’ची भूमिका साकारणारी पूर्वा कौशिक झाली भावुक



    Shiva Serial Last Ep Purva Kaushik Emotional Post : ‘शिवा’ची भूमिका साकारणारी पूर्वा कौशिक झाली भावुक | मालिका संपताना शिवाची भावुक पोस्ट, zee marathi shiva serial off air updates





    Source link

    चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम: उत्तराखंडसारख्या नैसर्गिक‎ आपत्तीत सातत्याने वाढ का?‎

    0
    चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:  उत्तराखंडसारख्या नैसर्गिक‎ आपत्तीत सातत्याने वाढ का?‎


    • Marathi News
    • Opinion
    • Chetansinh Solanki’s Column, Why Is There A Continuous Increase In Natural Disasters Like Uttarakhand?

    15 तासांपूर्वी

    • कॉपी लिंक

    ‎‎‎‎‎‎‎‎‎‎उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे झालेला पूर आणि कहर‎ही काही वेगळी घटना नाही. गेल्या वर्षी हिमाचल‎प्रदेशात असेच पूर आले, वायनाडमध्ये भूस्खलन‎झाले, वडोदरा आणि जगभरात पूर आला,‎दुबईसारख्या वाळवंटी शहरांमध्ये पूर आला आणि‎लॉस एंजलिस शहरात लागलेली विनाशकारी आग‎लागली. ‘डाऊन टू अर्थ’ मासिकाच्या अहवालानुसार,‎२०२४ मध्ये ३६६ दिवसांपैकी ३२२ दिवस भारताला‎अत्यंत हवामानविषयक घटनांचा सामना करावा‎लागला. आपण या आपत्तींना अपवाद म्हणून‎वागवणे थांबवले पाहिजे. ते आता एक नवीन आदर्श‎बनले आहेत. प्रश्न हा नाही की उत्तरकाशी का घडले,‎तर तो इतक्या वारंवार आणि इतक्या तीव्रतेने का घडत‎ आहे. ही एकेकाळी घडणारी दुर्घटना आहे, जी आपण‎विसरून पुढे जाऊ शकतो? की ती येणाऱ्या मोठ्या‎आपत्तींचे लक्षण आहे? भारतभरातील माझ्या ऊर्जा‎स्वराज यात्रेदरम्यान, मी शेकडो सभांमध्ये एक साधा‎प्रश्न विचारला आहे:

    QuoteImage

    पूर, भूस्खलनामुळे गावे उद्ध्वस्त झाली,‎मंदिरे ढिगाऱ्यात बदलली, घरे आणि‎हॉटेल्स कागदासारखी वाहून गेली. काही‎लोकांना आपले प्राण गमवावे लागले,‎अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. हे का‎घडले आणि ते पुन्हा घडणार नाही?‎

    QuoteImage

    “आपण किती विकास केला‎पाहिजे? आपण किती काळ विकास केला पाहिजे?’‎आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीही – प्राध्यापक‎नाही, पालक नाही, धोरणकर्ते नाही, अर्थशास्त्रज्ञ नाही,‎शास्त्रज्ञ नाही – याचे उत्तर नाही. तरीही प्रत्येक जण‎आग्रह धरतो की, आपण वाढले पाहिजे. सरकारांना‎अधिक जीडीपी वाढ हवी आहे. कंपन्यांना अधिक‎नफा हवा आहे. लोकांना मोठी घरे आणि वेगवान‎गाड्या हव्या आहेत. पण कोणीही त्यावर मर्यादा‎घालण्यास तयार नाही. हे ब्रेकशिवाय गाडी‎चालवण्यासारखे आहे. आणि ते कसे संपते हे‎आपल्याला माहिती आहे. अनंत वाढीच्या ध्यासाने‎आपल्याला इतके व्यापले आहे की आपण थांबायलाही‎तयार नाही. आपण आर्थिक आणि तांत्रिक विस्ताराच्या‎शर्यतीत अडकलो आहोत, एक मूलभूत प्रश्न‎विचारल्याशिवाय : आपण योग्य दिशेने जात आहोत‎का? खरं तर वेग इतका वेगवान आहे की थांबून विचार‎करायला कोणाकडेही वेळ नाही. आज कृत्रिम‎बुद्धिमत्ता आणि मोबाइल नेटवर्क्ससारख्या तंत्रज्ञानाची‎प्रगती वेगाने होत आहे – तरीही आपण श्वास घेत‎असलेली हवा, आपण पितो ते पाणी आणि आपण ज्या‎मातीवर अवलंबून आहोत ती पूर्वीपेक्षा जास्त वेगाने‎कमी होत आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या‎सर्व गोष्टी कमी होत नाहीत. पृथ्वीचे तापमान वाढत‎आहे आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व‎गोष्टी, जसे की हवा, पाणी आणि माती, कमी होत‎आहेत. जीवनाला आधार देणाऱ्या सर्व गोष्टी कमी होत‎असतील तर आपण निरोगी आणि स्थिर जीवन कसे‎जगू शकतो? या सर्वामागे विज्ञान आहे. आपला ग्रह‎अधिक गरम होत आहे. ज्यांनी आकडेवारीकडे लक्ष‎दिले नाही. त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की, २०२४‎हे मानवी इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष होते. शरीराच्या‎तापमानात फक्त २ अंश वाढ झाल्याने आपल्याला ताप‎येतो. आपण योग्यरीत्या खाऊ, काम करू किंवा‎विश्रांती घेऊ शकत नाही. परंतु १८५० पासून म्हणजेच‎औद्योगिकीकरणापासून पृथ्वी सुमारे २.५ अंशांनी गरम‎झाली आहे. आपण असे म्हणू शकतो की पृथ्वीला ताप‎आहे – आणि ती संतुलन गमावत आहे. हवामान‎बदलावरील आंतरसरकारी पॅनल (IPCC) गेल्या‎अनेक दशकांपासून आपल्याला इशारा देत आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जागतिक तापमानवाढीची पातळी २ अंशांपेक्षा जास्त‎झाली तर हवामानातील बदल अपरिवर्तनीय होईल.‎त्यानंतर मानवाकडून होणारे कोणतेही प्रयत्न हवामान‎बदल थांबवू शकणार नाहीत. चिंताजनक बाब म्हणजे‎आयपीसीसीनुसार आपण २०४५ ते २०५० पर्यंत‎जागतिक तापमानवाढीचा २ अंशांचा टप्पा ओलांडू. २०‎ते २५ वर्षांत. आणि तरीही जग झोपलेले दिसते. आपण‎काय करत आहोत? जागतिक नेते काय करत आहेत?‎२९ वर्षांपासून ते दरवर्षी कार्बन उत्सर्जन कसे कमी‎करायचे यावर चर्चा करण्यासाठी सीओपी बैठकीत‎भेटतात. आणि तरीही दरवर्षी जागतिक कार्बन उत्सर्जन‎वाढत आहे. भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर‎तिसरा सर्वात मोठा कार्बन उत्सर्जक बनला आहे.‎याचा अर्थ असा की १९२ देश आपल्यापेक्षा कमी‎उत्सर्जन करतात. भारताने २०७० पर्यंत निव्वळ‎शून्यावर पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे – २ अंशांच्या‎अंदाजित तापमान वाढीनंतर पूर्ण २० वर्षे. घर जळून‎खाक झाल्यानंतर हे अग्निशमन दल पाठवण्यासारखे‎आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)‎



    Source link

    बिहारमधील वगळलेल्या मतदारांची माहिती द्या

    0
    बिहारमधील वगळलेल्या मतदारांची माहिती द्या


    नवी दिल्ली : बिहारमधील निवडणूक प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या सुमारे ६५ लाख मतदारांची माहिती ९ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवडणूक आयोगाला दिले.

    न्यायाधीश सूर्य कांत, उज्जल भुयान आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना वगळलेल्या मतदारांची माहिती, राजकीय पक्षांना आधीच दिलेली माहिती आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेला त्याची प्रत देण्याच्या सूचना केल्या आहेत.

    ‘एसआयआर’ला आव्हान देणाऱ्या ‘एडीआर’ संस्थेने निवडणूक आयोगाला यादीतून वगळलेल्या सुमारे ६५ लाख मतदारांची नावे जाहीर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारा एक नवीन अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्यामध्ये हे मतदार मृत आहेत, कायमचे स्थलांतरित आहेत किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्यांचा विचार केला जात नाही, असे नमूद करण्याची मागणी केली आहे.





    Source link

    ट्रम्प यांच्या विशेष दूताशी पुतिन यांची चर्चा

    0
    ट्रम्प यांच्या विशेष दूताशी पुतिन यांची चर्चा



    Russian President Vladimir Putin spoke with Steve Wittkoff, special envoy to Donald Trump, amid looming US sanctions on Russia for the Ukraine conflict. ट्रम्प यांच्या विशेष दूताशी पुतिन यांची चर्चा





    Source link

    US President Donald Trump stated having no information on Russia’s uranium, fertilizer, and chemical imports रशियाकडून आयातीबाबत माहिती नाही : ट्रम्प

    0
    US President Donald Trump stated having no information on Russia’s uranium, fertilizer, and chemical imports रशियाकडून आयातीबाबत माहिती नाही : ट्रम्प


    पीटीआय, न्यूयॉर्क/वॉशिंग्टन

    रशियाकडून युरेनियम, खते आणि रसायनांच्या आयातीबद्दल काहीही माहिती नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेकडून या वस्तूंच्या आयातीबाबत भारताच्या विधानावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली.

    ‘‘मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. मला याची चौकशी करावी लागेल, परंतु आम्ही त्याचे उत्तर देऊ’’, असे ट्रम्प म्हणाले. चीनसह रशियन ऊर्जा खरेदी करणाऱ्या सर्व देशांवर १०० टक्के कर लादण्याची धमकी दिल्याच्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना टक्केवारीचा उल्लेख केला नाही, परंतु असेच काहीतरी करणार असल्याचे सूतोवाच मात्र ट्रम्प यांनी केले.

    ‘अदानींविरुद्धच्या चौकशीमुळे पंतप्रधान हतबल’

    नवी दिल्ली : गौतम अदानी यांची अमेरिकेत चौकशी सुरू असल्याने पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासमोर उभे राहू शकत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी बुधवारी ‘एक्स’वर केली. ‘डबल ए’ आणि रशियाशी तेल व्यापारादरम्यान आर्थिक संबंध उघड होण्याचाही धोका असल्याने मोदींचे हात बांधले असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

    हेही वाचा
    हेही वाचा

    युद्धे रोखल्याचा दावा

    ट्रम्प यांनी २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी व्हाइट हाऊस ऑलिंपिक टास्क फोर्स स्थापन करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या वेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तान-मधील युद्ध रोखल्याचा पुनरुच्चार केला. हा दावा त्यांनी १० मेपासून ३० हून अधिक वेळा केला आहे. गेल्या पाच महिन्यांत पाच युद्धे रोखल्याचा दावा करतानाच युक्रेन संघर्ष संपवण्यास मदत केलेले सहावे युद्ध असावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.





    Source link

    फलटण शहरात थरार! संशयिताचा हवेत गोळीबार, एकजण पसार

    0
    फलटण शहरात थरार! संशयिताचा हवेत गोळीबार, एकजण पसार

    फलटण :-  फलटण शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस उघडपणे समोर येत असताना, मंगळवारी संध्याकाळी गिरवी नाका परिसरात चकमकीसारखी घटना घडली. वीणा नंबर प्लेट लावलेल्या मोटरसायकलवरून फिरणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी थांबवले असता, त्यातील एकाने थेट हवेत गोळी झाडत पलायन केले, तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पुढे आली आहे.

    याआधी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या राहत्या घरी भरदिवसा चोरी होऊन तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्या घटनेनंतरही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रचंड प्रश्न उपस्थित झाले होते.

    शहरातील नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल प्रचंड असंतोष असून, चोरट्यांनी अक्षरशः शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या टोळ्यांनी आता चक्क गोळीबार करून पोलिसांना थेट आव्हान दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

    दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर फलटण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

    परप्रांतीय व्यक्तीकडून आधी दीड हजार उकळले, नंतर दोन लाखांची मागणी, पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल

    0
    परप्रांतीय व्यक्तीकडून आधी दीड हजार उकळले, नंतर दोन लाखांची मागणी, पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल



    परप्रांतीय व्यक्तीकडून आधी दीड हजार उकळले, नंतर दोन लाखांची मागणी, पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल





    Source link

    आजच्याच दिवशी हिरोशिमावर अनेरिकेने टाकले ‘लिटिल बॉय’, एका क्षणात हजारो लोकांची झाली वाफ, १.४० लाख मृत्यू

    0
    आजच्याच दिवशी हिरोशिमावर अनेरिकेने टाकले ‘लिटिल बॉय’, एका क्षणात हजारो लोकांची झाली वाफ, १.४० लाख मृत्यू


    Hiroshima attack 1945: आज जग पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अणुहल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. रशियाने अमेरिकेसोबतचा करार मोडत इशारा न देता सीमेवर अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा मंगळवारी केली. याच दिवशी अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केला होता. 80 वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट 1945 रोजी मानवी इतिहासातील सर्वात भीषण आणि विध्वंसक हल्ला झाला होता. अमेरिकेच्या बी-२९ बॉम्बर ‘एनोला गे’ने जपानमधील हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला. या बॉम्बस्फोटात सुमारे १४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला इतका भीषण होता की हजारो लोकांचे बाष्पीभवन झाले. या हल्ल्यामुळे लाखो लोकांना कायमस्वरूपी शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.



    Source link