Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 171

बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांवर ‘याशनी पॅटर्न’ची कारवाई सुरु;

0
बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांवर ‘याशनी पॅटर्न’ची कारवाई सुरु;

सातारा, दि. ५ ऑगस्ट (साहस टाइम्स):पवित्र शिक्षण क्षेत्राला बोगसगिरीचा काळा डाग लावणाऱ्या बोगस शिक्षकांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या दैनिक पुण्यनगरीने उघड केलेल्या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांवर बदली मिळवणाऱ्या व संवर्ग १चा लाभ घेणाऱ्या शिक्षकांविरोधात थेट कारवाईचा बडगा उगारत ‘याशनी पॅटर्न’च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्यायाचा नवा अध्याय लिहायला सुरुवात केली आहे.

खोटी दिव्यांग सर्टिफिकेट, मेंदूविकार, घटस्फोट, दुर्धर आजार यासारख्या फसव्या कारणांनी प्राथमिक शिक्षकांनी संवर्ग बदल करून शिक्षण खात्याची व समाजाची फसवणूक केली. काहींनी तर ऑनलाईन बदली पोर्टलवरून नवीन शाळा स्वीकारल्या, तर काहींनी बदली नाकारून मूळ शाळेत राहूनच अनधिकृत लाभ घेतले.

या बोगसगिरीची वैद्यकीय फेरपडताळणी करताना अनेक शिक्षक अपात्र आढळून आले असून, त्यांच्या विरोधात कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. या शिक्षकांनी जे लाभ घेतले आहेत ते रद्द करून त्यांच्या जागा संवर्ग चारमधील पात्र शिक्षकांसाठी खुल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस सीईओ नागराजन यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.

याशनी नागराजन यांच्या या धाडसी, पारदर्शक आणि निर्भीड निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या शिक्षकांना न्याय मिळणार असून, जिल्हा परिषदेचे कार्य अधिक विश्वासार्ह व पारदर्शक ठरणार आहे.

राज्यभर कौतुकाची लाट!

याशनी पॅटर्नमुळे संपूर्ण राज्यात सातारा जिल्हा चर्चेत आला असून, त्यांच्या धडाकेबाज आणि न्यायिक कामगिरीचे अनेक स्तरांवरून कौतुक होत आहे. सातारा जिल्हा क्रांतिवीरांची भूमी असली, तरी आज तो प्रशासनिक क्रांतीची दिशा देणारा जिल्हा बनत आहे.

निष्कर्ष:

प्रामाणिक शिक्षकांना न्याय मिळवून देणाऱ्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेला चालना मिळणार आहे. अपात्र शिक्षकांच्या जागा रिक्त करून त्या पात्र शिक्षकांसाठी खुल्या केल्यास, शिक्षण व्यवस्थेतील नैतिकतेला बळ मिळणार आहे.
याशनी नागराजन यांचा ‘याशनी पॅटर्न’ आता केवळ सातारा नव्हे तर महाराष्ट्रातही आदर्श ठरतोय!

Viral video unhealthy vegetables Curry Leaves found worm shocking video goes viral on social Media

0
Viral video unhealthy vegetables Curry Leaves found worm shocking video goes viral on social Media



Viral video unhealthy vegetables Curry Leaves found worm shocking video goes viral on social Media | बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल





Source link

pune footpath inspection by pmc prepares for ganeshotsav 2025 with road repairs new guidelines

0
pune footpath inspection by pmc prepares for ganeshotsav 2025 with road repairs new guidelines



pune footpath inspection by pmc prepares for ganeshotsav 2025 with road repairs new guidelines | पुण्यातील पदपथांबाबत महापालिकेचा मोठा निर्णय; ५५ अधिकाऱ्यांची नियुक्ती !





Source link

आंबे खाऊन मुलं होतात, मी लावलेल्या झाडाचा आंबा खाऊन बघा; संभाजी भिडे त्या वक्तव्यावर अजूनही ठाम

0


Sambhaji Bhide news: सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीवेळी तिरंगा झेंडा (Tiranga Flag) स्वीकारला गेला होता. आपल्याला तिरंगा ध्वज आणि संविधान मानलेज पाहिजे. मात्र, भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक राहिला आहे. त्यामुळे देव,देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करु, तिरंगा फडकवू. पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. ते सोमवारी नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी संभाजी भिडे यांनी पुन्हा एका त्यांच्या ‘आंबा खाऊन मुलं होतात’, या वक्तव्याचा उच्चार केला. मी आंबे खाऊन मुल होतं, असे बोललो होतो. मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आजही तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. त्या वक्तव्यावरुन माझ्यावर कोर्टात खटला सुरु आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.

Bhide guruji in Satara: खग्रास ग्रहणाच्या काळात मंत्राचा जप केला तर जन्मोजन्मीसाठी मंत्राची शक्ती प्राप्त होते: संभाजी भिडे

सोयराबाई यांना जे वाटतं होत ते शक्य नव्हते. सोयराबाई यांना छत्रपती संभाजी महाराजांनी राजा व्हावे, असे वाटत नव्हते. मात्र, पुढच्या काळात राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांच्यानंतर राजे झाले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात साम्य काय तर, संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या तोडीस तोड व्यक्तिमत्व होते. संभाजी महाराज यांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के हा नालायक माणूस होता, ज्याने वातनासाठी शेण खाल्ले, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.

खग्रास ग्रहणाच्या काळात मनुष्याने एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याला त्या मंत्राची शक्ती जन्मोजन्मीसाठी प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी  गायत्री मंत्राचा जप केला होता. मंत्राचे पठण करताना ते ते अंगावरचे कपडे काढून मानेपर्यंत शीत (थंड)पाण्यात काही तास होते. त्यांच्या मृत्यूवेळी 3 एप्रिल रोजी त्यांना ताप असाह्य झाला तोंडावाटे पाणी दिलेले शरीरातून बाहेर पडत होते. शरीर पूर्ण खचले होते. शिवाजी महाराज हे उपस्थित असलेल्यांना म्हणाले की,  आम्ही जातो आमचा काळ झाला. सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, हे त्यांचे शेवटचे शब्द होते, असा दावा संभाजी भिडे यांनी केला.

आणखी वाचा

महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले, हिंदू समाजाला xxडू बनवत आहेत : संभाजी भिडे

आणखी वाचा



Source link

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: गुरूकडे गेल्यानंतर नवीन जन्म होईल, विश्वास ठेवा

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  गुरूकडे गेल्यानंतर नवीन जन्म होईल, विश्वास ठेवा


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, After Going To The Guru, You Will Be Reborn, Have Faith

23 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शास्त्रांमध्ये लिहिले आहे – ‘आचार्यो मृत्यु:’ म्हणजेच तुम्ही गुरूकडे गेल्यावर मृत्यू होतो. अर्थात गुरूच्या सान्निध्यात आपण आहोत तसेच राहत नाहीत व आपण असायला हवे तसे घडतो. हा पुनर्जन्म आहे. गुरूची शक्ती अशी आहे की प्राणी आणि पक्षीदेखील आदराच्या भावनेने गुरूसमोर नतमस्तक होतात.

शिवजी पार्वतीजींना सांगत होते काकभूशुंडी कथा सांगत तेव्हा पक्षी त्यांच्या दाराशी येत – ‘बर तर कह हरि कथा प्रसंगा। आवहिं सुनही अनेक बिहंगा।’ ते वडाच्या झाडाखाली श्री हरीच्या कथा सांगत. तेव्हा पक्षी तिथे गोळा हाेऊन कथा ऐकत असत.

हे काकभूशुंडीजींसाठी सांगितले गेले. आपण गुरुकडे गेलो तर ते आपल्याला हरिकथा सांगतात. ती गुरुमंत्राच्या स्वरूपात असली तरी. प्राणी आणि पक्ष्यांना गुरूची भाषा समजते. आपण तर मानव आहोत. म्हणून गुरूंच्या सान्निध्यात जाल तेव्हा गुरू तुम्हाला नवीन जन्म देतील. अहंकार गळून पडावा. अन्यथा कधीही बदल होणार नाही.



Source link

फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाच्या घरात सायंकाळच्या वेळेत चोरी; ७ लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

0
फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाच्या घरात सायंकाळच्या वेळेत चोरी; ७ लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

फलटण (साहस Times  प्रतिनिधी ) :फलटण शहरातील गोळीबार मैदान परिसरात चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राहुल अशोकराव निंबाळकर यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सायंकाळी ६.४५ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली.

चोरट्याने घरात प्रवेश करून खालीलप्रमाणे मौल्यवान वस्तू चोरून नेल्या:

  • ४ लाख रुपये रोख रक्कम
  • १० ग्रॅम ६४९ मिली वजनाची सोन्याची चैन – ₹५१,५५०
  • १ ग्रॅम ५९० मिली वजनाची सोन्याच्या मंगळसूत्रातील मराठी वाटी – ₹७,४४०
  • ४ ग्रॅम ४२० मिली वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र – ₹२२,३६५
  • ३४ ग्रॅम ५५० मिली वजनाचा सोन्याचा टेंपल हार – ₹१,७३,७८६
  • ८ ग्रॅम ८५० मिली वजनाचे सोन्याचे टेंपल झुबे – ₹४४,५१५
  • ३ ग्रॅम २५० मिली वजनाचा सोन्याचा हार – ₹१६,३४७

एकूण मुद्देमालाची किंमत ₹७,१६,३०३ इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी राहुल अशोकराव निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 265/2025 B.N.S. कलम 305(a), 331(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदर घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, चोरट्यांचा लवकरच शोध लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प समता नगर, विडणी येथे संपन्न

0
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प समता नगर, विडणी येथे संपन्न

फलटण साहस Times| भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प समता नगर, मौजे विडणी येथे मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडले. या वेळी “बौद्धांचे मंगल दिन आणि मंगल सण” या विषयावर प्रवचन देण्यासाठी आयु. चंद्रकांत मोहिते सर यांना प्रवचनकार म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

आपल्या प्रभावी भाषणात मोहिते सरांनी बौद्ध समाजातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या दिवसांचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, इ.स.पूर्व 563 मध्ये भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी वनात एका शालवृक्षाखाली झाला, आणि तिथूनच बौद्ध समाजाच्या मंगल दिनांची सुरुवात झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे बौद्ध जीवनात नवीन ऊर्जा संचारली. वर्षभरातील बारा पौर्णिमा या बौद्धांसाठी मंगल दिन ठरतात.

त्यांनी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल हा जन्मदिन, 1 जानेवारीला भिमा कोरेगाव विजय दिन, 20 मार्च महाड सत्याग्रह, 14 ऑक्टोबर माता रमाई जन्म दिन, आणि धम्मदिक्षा दिन यांसारख्या अनेक दिवसांचे बौद्ध दृष्टिकोनातून महत्त्व विषद केले. हे सर्व दिवस प्रत्येक बौद्धाने साजरे केले पाहिजेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी भगवान बुद्धांच्या विचारांवर आधारित मंगल मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुवर्य दादासाहेब भोसले (केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर, सातारा व पुणे जिल्हा प्रभारी), तालुका महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संस्कार सचिव बजरंग गायकवाड यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मोरे (उपाध्यक्ष, प्रचार-पर्यटन विभाग) यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आभारप्रदर्शन करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घडवले. कार्यक्रम अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी झाला.

AI द्वारे ‘रांझणा’चा क्लायमॅक्स बदलल्याने भडकले धनुष; माझ्या नकारानंतरही…

0
AI द्वारे ‘रांझणा’चा क्लायमॅक्स बदलल्याने भडकले धनुष; माझ्या नकारानंतरही…



तब्बल १० वर्षांनंतर दिग्दर्शक या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन आला आहे. धनुष ‘रांझणा’च्या सिक्वेलमध्येही मुख्य भूमिकेत आहे. पण सिक्वेलमध्ये मोठा ट्विस्ट आहे. AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चित्रपटाच्या दु:खद शेवटाचे रुपांतर सुखद अंतात झाले, जे धनुषला अजिबात आवडले नाही. याचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे.



Source link

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी मागे किती संपत्ती सोडली, किती देणी ठेवली; जाणून घ्या सविस्तर

0
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी मागे किती संपत्ती सोडली, किती देणी ठेवली; जाणून घ्या सविस्तर


झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. लोकप्रिय आदिवासी नेत्याने २०१९ मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली मालमत्ता आणि देणी जाहीर केले होते. त्यांनी आपल्या मागे किती मालमत्ता सोडली आहे आणि त्याच्यावर किती देणी आहेत हे जाणून घेऊया.



Source link

“…तर जाळ्या लावून घरात खुशाल कबुतरं पाळा”; कबुतरखान्यावरून मराठी अभिनेत्याचा संताप

0
“…तर जाळ्या लावून घरात खुशाल कबुतरं पाळा”; कबुतरखान्यावरून मराठी अभिनेत्याचा संताप


Marathi Actror Talk’s About Dadar’s Kabutar Khana : मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखान्याचा विषय चर्चेचा मुद्दा ठरत आहे. कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे व त्यांच्या पिसांमुळे श्वसनाचे आजर पसरत असल्याने माणसांसाठी ते अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे बीएमसीने दादरच्या कबुरतरखान्यावर ताडपत्री व शेड घालून कारवाई केली आहे. काही लोकांनी याला विरोध केल्याचं दिसलं. यावर मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोष व्यक्त केला आहे.

कबुतरांची वाढत असलेली संख्या त्या परिसरातील माणसांसाठी अडचणीचे कारण ठरत आहे आणि त्याशिवाय कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु, दादर येथील काही रहिवाशांनी त्याला विरोध केल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता अभिनेता अभिजीत केळकरने याबाबत त्याची प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अभिजीत केळकरची प्रतिक्रिया

अभिजीतने याबाबत म्हटले, “काहीच दिवसांपूर्वी दादरच्या कबुतरखान्याचा हा व्हिडीओ शूट करतानाच माझा भयंकर संताप झाला होता… भूतदया वगैरे सगळं मलाही आहेच, मलाही प्राणी, पक्षी अतिशय प्रिय आहेत; पण कबुतर या पक्षयामुळे श्वसनाचे बरे न होणारे गंभीर विकार, आजार होतात हे सिद्ध झालंय. मुंबई महानगरपालिकेने त्याबाबत वारंवार सचेत करूनही, सूचना देऊनही लोकांना अक्कल येत नाही.”

हेही वाचा

अभिनेता पुढे म्हणाला, “कबुतर हा कुठल्या एका धर्माचा पक्षी आहे, असे ज्यांना वाटत असेल, त्यांनी त्याला आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावे… आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान याचे तरी धार्मिक राजकारण न करता, मुंबई महापालिकेनं जी ताडपत्री, शेड घालून, कारवाई केली आहे, त्यामागे खंबीरपणे उभे राहावे ही कळकळीची विनंती”.

हेही वाचा

अभिजीतने पोस्टमध्ये पुढे मुंबई महापालिकेला टॅग करीत त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. अभिजीत केळकर सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा तो यामार्फत सामाजिक मुद्द्यांवर त्याची प्रतिक्रिया देत असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपटांत काम केले आहे. शेवटचा तो ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकला होता.





Source link