
फलटण (साहस Times प्रतिनिधी ) :फलटण शहरातील गोळीबार मैदान परिसरात चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राहुल अशोकराव निंबाळकर यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सायंकाळी ६.४५ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली.
चोरट्याने घरात प्रवेश करून खालीलप्रमाणे मौल्यवान वस्तू चोरून नेल्या:
- ४ लाख रुपये रोख रक्कम
- १० ग्रॅम ६४९ मिली वजनाची सोन्याची चैन – ₹५१,५५०
- १ ग्रॅम ५९० मिली वजनाची सोन्याच्या मंगळसूत्रातील मराठी वाटी – ₹७,४४०
- ४ ग्रॅम ४२० मिली वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र – ₹२२,३६५
- ३४ ग्रॅम ५५० मिली वजनाचा सोन्याचा टेंपल हार – ₹१,७३,७८६
- ८ ग्रॅम ८५० मिली वजनाचे सोन्याचे टेंपल झुबे – ₹४४,५१५
- ३ ग्रॅम २५० मिली वजनाचा सोन्याचा हार – ₹१६,३४७
एकूण मुद्देमालाची किंमत ₹७,१६,३०३ इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राहुल अशोकराव निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 265/2025 B.N.S. कलम 305(a), 331(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, चोरट्यांचा लवकरच शोध लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








