Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 163

सनी DJ चे मालक, कर्तृत्ववान व मनमिळावू सनी काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
सनी DJ चे मालक, कर्तृत्ववान व मनमिळावू सनी काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

फलटण – महात्मा फुले नगर येथील शांत, संयमी, कर्तृत्ववान आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सनी DJ चे मालक सनी सुनिल काकडे यांचे आज शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सनी काकडे हे DJ  चालक मालक संघटनेमध्ये अतिशय प्रेमळ , लोकप्रिय व्यक्तीमत्व होते DJ च्या क्षेत्रात सो कर्तुत्वावर स्वतःची अशी ओळख निर्माण केली होती Djच्या दुनियातील राजा माणूस असणारा  तरुणांमध्ये लोकप्रिय, मनमोकळे आणि नेहमी मदतीस तत्पर राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे महात्मा फुले नगर व फलटण शहरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी  मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिक उपस्थित  असून, अंत्ययात्रा दुपारी ३.०० वाजता महात्मा फुले नगर येथून निघणार आहे.

सनी काकडे यांच्या आठवणी कायमच फलटणकरांच्या मनात जिवंत राहतील.

साहस Times कडून भावपूर्ण श्रद्धांजली

सातारच्या धैर्याने माऊंट एलब्रुस केले सर, अवघ्या तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी

0



Satara: सातारच्या धैर्याने माऊंट एलब्रुस केले सर, अवघ्या तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी



Source link

नगरपरिषदेच्या वतीने ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

0
नगरपरिषदेच्या वतीने ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

फलटण — देशभक्तीच्या गीतांनी, तिरंग्याच्या सलामीने आणि देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना स्मरून संपूर्ण फलटण शहरात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या वतीने आयोजित मुख्य समारंभात सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री. निखिल बाजीराव मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी फलटण नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिक, वीरपत्नी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, व्यापारी बांधव, नागरिक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविण्यात आले.

मुख्याधिकारी मोरे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांना आदरांजली वाहून, त्यांच्या उदात्त आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले. देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सदैव जागरूक राहावे असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करून सर्वांनी वृक्षलागवड करावी, हे आपले मुलभूत कर्तव्य असल्याचे मा. मोरे यांनी नमूद केले.

समारंभात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी व भाषणे सादर केली. नगरपरिषद शासकीय इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली, शहरभर देशभक्तीपर गाणी वाजविण्यात आली तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नाटकाचे सादरीकरण करून प्रेक्षकांना भारावून टाकले.

श्रीकृष्ण, खरा मॅनेजमेंट गुरू…

0
श्रीकृष्ण, खरा मॅनेजमेंट गुरू…


गौरी मांजरेकर
भारतीय संस्कृतीत आणि तत्वज्ञानात भगवान श्रीकृष्णाचे स्थान अजोड आहे . श्रीकृष्णाचा उल्लेख केवळ एक अवतारी पुरुष किंवा दैवी चमत्कार करणारा देव म्हणून केला जात नाही ,तर एक कुशल राजनीती-तज्ञ ,दूरदृष्टीचा रणनीतीकार आणि सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक म्हणूनही हे व्यक्तिमत्व ओळखले जाते. महाभारत आणि विशेषतः श्रीभगवतगीतेतील श्रीकृष्णाचे विचार आजच्या कोर्पोरेट जगात आणि करियर बांधणीच्या वाटेवर मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ ठरतात. व्यवस्थापनाची मूळ तत्वे जसे की नेतृत्व, संवाद, ध्येय निश्चिती, टीम वर्क, आणि संकट काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता, ही सर्व कृष्णचरित्रात व गीतेतील विचारांतून आढळतात. श्रीकृष्णाची व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शिकवण यातील तत्वे करियरच्या उभारणीसाठी वापरली जाऊ शकतात.

श्रीकृष्ण- दूरदृष्टी असलेला नेता (विजनरी लीडर)

श्रीकृष्णाचे आयुष्य हे दूरदृष्टी आणि योजनाबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे.

उदाहरण : कंसाचा वध केल्यानंतर मथुरेवर जरासंधाचे हल्ले होतील हे ओळखून श्रीकृष्णाने राजधानी द्वारकेला हलवली. एका सुरक्षित किनारपट्टीवरील मोक्याचे, नैसर्गिक ठिकाण त्यांनी राजधानीच्या शहरासाठी, त्यांच्या जनतेच्या पुनर्वसन करण्यासाठी निवडले. त्यामुळे जरासंधाच्या १७ हल्ल्यानंतरही द्वारका सुरक्षित राहिली.

रियर टूल: मार्केट ट्रेंड व तंत्रज्ञान यांच्या बदलाचा अंदाज घेऊन आधीच तयारी करणे, करियरची दीर्घकालीन योजना आखणे आवश्यक आहे. ‘पुढील पाच वर्षांत मला कुठे पोहोचायचे आहे?’, ‘माझे ध्येय काय आहे?’,‘ते गाठण्यासाठी मला कोणती नवीन कौशल्ये शिकण्याची गरज आहे?’, असे प्रश्न स्वतःला विचारून करियरचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. आपल्या करियरच्या ध्येयपूर्तीसाठी लागणाऱ्या कौशल्यांची व अनुभवांची निश्चित योजना बनविणे गरजेचे आहे.

श्रीकृष्ण- संघ निर्मिती (टीम बिल्डिंग)

संघ निर्मिती (टीम बिल्डिंग) म्हणजे विविध व्यक्तिमत्वे, कौशल्ये, आणि पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणून,त्यांच्यात परस्पर विश्वास, सहकार्य आणि उद्दिष्टाभिमुखता निर्माण करणे. यामध्ये फक्त लोकांची निवडच नाही, तर त्यांना प्रेरित ठेवणे, योग्य जबाबदाऱ्या देणे आणि काम करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणेही समाविष्ट असते.

श्रीकृष्णाच्या जीवनातील उदाहरण :

कुरुक्षेत्र युद्धात पांडवांचा संघ हा विविध प्रकारचे स्वभाव, व्यक्तिसापेक्ष क्षमता आणि मर्यादा असलेल्या योद्ध्यांचा होता.

भीम : अतुलनीय बळ आणि जोश, पण प्रसंगी उग्र स्वभाव.

अर्जुन : श्रेष्ठ धनुर्धर आणि शूर लढवय्या, पण भावनिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील.

युधिष्टिर : धर्मनिष्ठ आणि संयमी, पण निर्णय घेण्यात विलंब

नकुल-सहदेव : कौशल्यपूर्ण पण कमी प्रसिद्ध

श्रीकृष्णाचा संघ बांधणी दृष्टिकोन :

१. प्रत्येकाची ताकद आणि कमकुवत बाजू ओळखून योग्य काम देणे.

२. भीमाला बलप्रयोगाची आवश्यकता असलेल्या मोहिमांवर पाठविणे.

३. अर्जुनाला निर्णायक क्षणी मुख्य आघाडी देणे.

४. युधिष्टिराला रणनीतिक चर्चा आणि नैतिक निर्णयांमध्ये पुढे मान देणे.

५. नकुल-सहदेव यांना सहाय्यक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणे.

करियर टूल : टीम तयार करताना फक्त कौशल्य न पाहता स्वभाव आणि परस्पर जुळवून घेण्याची क्षमताही महत्त्वाची. प्रत्येक सदस्यांची ताकद ओळखून त्यांच्या सामर्थ्यानुसार जबाबदाऱ्या व भूमिका देणे. संघात परस्पर विश्वास निर्माण केल्यास संकट काळात उद्दिष्ट साध्य होते.

श्रीकृष्ण – संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल )

संवादकौशल्य म्हणजे आपली मते, उद्दिष्टे, किंवा संदेश अशा प्रकारे मांडणे की तो समोरच्याला स्पष्ट समजेल, त्यावर विश्वास बसेल आणि तो कृती करण्यास प्रवूत्त होईल. श्रीकृष्ण हे याबाबतीत माहिर होते- त्यांचे शब्द फक्त माहिती देणारे नव्हते, परंतु प्रेरणादायी, परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करणारे होते आणि योग्य मार्गदर्शन करणारे होते.

१. थेट प्रेरणादायी संवाद

उदाहरण : कुरुक्षेत्र युद्धाच्या पहिल्या दिवशी अर्जुनाने आपल्या नातलंगाशी लढणे योग्य ठरेल का? असे विचारून आपल्या मनातील गोंधळ व्यक्त केला. परंतु श्रीकृष्णाने भगवतगीतेच्या ७०० श्लोकांमध्ये तत्वज्ञान, नैतिकता आणि कर्तव्य यांची सांगड घालून अर्जुनाचा मानसिक गोंधळ दूर केला. या पद्धतीने संवादातील तर्क आणि भावना व प्रेरणा यांचा अद्वितीय संगम भगवतगीतेत पाहण्यास मिळतो.

करियर टूल : स्टोरी टेलिंग अथवा कथाकथन हे तंत्र वापरून आपला विचार पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या कथा, दृष्टांत आणि उदाहरणे देऊन समजावणे.

२. योग्य शब्दांची निवड (चॉईस ऑफ वर्ड्स)

श्रीकृष्ण व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीनुसार शब्दांशी निवड करून आपले शब्दकौशल्य वारंवार गीताज्ञानातून दाखविले आहे. शांतिदूत म्हणून कौरव दरबारात जाताना राजनैतिक भाषेचा वापर, अर्जुनाला रणनीती सांगताना संक्षिप्त, स्पष्ट आणि आत्मविश्वास,मनोबल वाढविणारी भाषा आणि वृंदावनातील गोपिकांसोबत खेळकर आणि आनंदी भाषा अशारीतीने कृष्णाने परिस्थिती व व्यक्ती सापेक्ष पार्श्वभूमी समजून भाषेचा ढंग बदलला.

करियर टूल : श्रोत्यांची मनःस्थिती समजून स्वतःची संवादशैली विकसित करणे.

३. भावनिक बुद्धिमत्ता ( इमोशनल इंटेलिजन्स)

श्रीकृष्णाकडे समोरच्या व्यक्तीची भावनिक स्थिती ओळखण्याची विलक्षण कसब होते. त्याच्या या कौशल्यामुळे त्याला अर्जुनाच्या डोळ्यातील कर्तव्याचा गोंधळ दिसला. भीमाच्या रागात त्याला ऊर्जा व अन्यायाविरुध्द लढण्याची भावना दिसली.

करियर टूल : समोरच्याच्या भावनेशी जुळवून समोरच्याशी संवाद सुरु करणे आणि त्याला मग हळूहळू आपल्याला अपेक्षित भावना अथवा कृतीकडे नेणे. तसेच समोरच्याच्या भावना ओळखून संवाद हा सकारात्मक बनविण्याचा प्रयत्न करणे.

४. कर्मण्येवाधिकारस्ते : निष्काम कर्म करण्यास प्रेरणा

भगवद्गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे वचन श्रीकृष्णाच्या व्यवस्थापन तत्त्वांचा गाभा आहे. याचा अर्थ, ‘आपला अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्यांच्या फळावर नाही’.

करियर टूल : करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कामावर पूर्ण लक्ष दिले पाहिजे, ते काम सर्वोत्तम कसे होईल यावर भर दिला पाहिजे. समजा, तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करीत असाल तर, तुमचे सर्व लक्ष तो प्रकल्प यशस्वी करण्यावर असावे. त्याच्या यशामुळे मिळणाऱ्या मन-सन्मान किंवा अपयशामुळे होणाऱ्या टीकेचा विचार करू नये.

श्रीकृष्ण- वैचारिक समतोल साधणारा

स्थितप्रज्ञता: यश व अपयश दोन्हीमध्ये समतोल राखणे

भगवत गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची संकल्पना स्पष्ट केली आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती, जिचे मन सुखदुःख, जयपराजय, मानापमान या दोन्ही परिस्थितीत विचलित होत नाही, बुद्धी स्थिर राहते. श्रीकृष्णाच्या मते, अशा भावनांच्या लाटांमध्ये वाहून न जाता आपल्या बुद्धीला स्थिर ठेवणे आवश्यक आहे. यशस्वी करियर घडविण्यासाठी यशाचा स्वीकार विनम्रतेने आणि अपयशाचा स्वीकार धैर्याने करता आला पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती मिळाल्यास किंवा मोठ्या यशाने हर्षोल्हासीत होतो. याउलट, एखादा महत्वाचा प्रकल्प अयशस्वी झाल्यास किंवा त्याला बढती न मिळाल्यास तो निराश होतो.

करियर टूल : अपयशातून शिकून पुढे जाण्याची क्षमता आणि यशामुळे गर्व न बाळगता आपले पाय जमिनीवर रोवून ठेवणे, हे स्थितप्रज्ञतेचे लक्षण आहे. या गुणामुळे व्यक्ती संतुलित निर्णय घेऊ शकतो. स्थितप्रज्ञता: यश व अपयश दोन्हीमध्ये समतोल राखणे

श्रीकृष्ण- वाद निवारण कौशल्य

वाद निवारण कौशल्य म्हणजे मतभेद, वाद, किंवा तणावपूर्ण परिस्थिती शांततापूर्ण आणि प्रभावीपणे सोडवण्याची कला. यात केवळ भांडण थांबवणे नसून, दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा काढणे आणि दीर्घकालीन नातेसंबंध टिकवणे महत्वाचे असते.

उदाहरण: कुरुक्षेत्र युद्ध टाळण्यासाठी कौरव दरबारात ते शांतिदूत म्हणून गेले. संवादाद्वारे त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे. त्यांनी स्पष्ट पण बोलण्यात नम्रता ठेवून पांडवांचे हक्क मांडले. तसेच अतिशय कुशलतेने दुर्योधनाला युद्ध नको असल्यास सत्ता न सोडता पांडवांना दुसरी भूमी देण्याचा प्रस्ताव मांडला.

करियर टूल : दोन्ही बाजूंचे हित लक्षात घेऊन तोडगा सुचविणे तसेच पर्याय मांडून दोन्ही बाजूना समाधान मिळेल असा प्रस्ताव मांडण्याची कला विकसित करणे.

श्रीकृष्ण: आत्मज्ञानी व आत्म-मूल्यमापन करण्यात तरबेज

भगवतगीतेत कृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे महत्व सांगितले आहे. अर्जुनाला आपले कर्तव्य माहित नव्हते, परंतु कृष्णाने त्याला आत्मज्ञान करून दिले.

करियर टूल : करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी, स्वतःला ओळखणे सर्वात महत्वाचे आहे. आपल्या आवडी-निवडी, आपली कौशल्ये, आपली कमकुवत बाजू, आणि आपल्या ताकदीच्या बाजू आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. एकदा आपल्याला स्वतःची ओळख झाल्यावर, आपण योग्य करियरची निवड करू शकतो. ‘मी करियरमध्ये कुठे उभा आहे?’, ‘मी योग्य मार्गावर आहे का?’, असे प्रश्न स्वतःला विचारून आत्म-मूल्यमापन करणे महत्वाचे आहे.

श्रीकृष्ण : वेळेनुसार बदलण्याचे क्षमता असलेले व्यक्तिमत्व

कृष्णाने वेळोवेळी परिस्थितीनुसार आपली युद्धातील नीतीत बदल घडविले. त्यांनी युद्ध टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केले. काही ठिकाणी त्यांनी शांततेचा प्रस्ताव ठेवला तर जेव्हा त्यांना कळून चुकले की युद्ध अटळ आहे तेव्हा कूटनीतीचा वापर करून रणनीतीची आखणी केली.

करियर टूल : हीच निर्णायक लवचिकता आजच्या काळात आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठा आणि नवीन स्पर्धा नवीन आव्हाने निर्माण करीत आहेत.

अशा परिस्थितीत, नवीन बदल स्वीकारून नवीन कौशल्ये शिकणे, नवीन भूमिका स्वीकारणे व नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे महत्वाचे आहे.

थोडक्यात, श्रीकृष्णाचे जीवन हे केवळ महाभारताची कथा नाही, तर ते एक व्यवस्थापनशास्त्र आहे, जे प्रत्येक काळात, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक करियरमध्ये मार्गदर्शक ठरते. म्हणूनच, श्रीकृष्ण हे खऱ्या अर्थाने ‘मॅनेजमेंट गुरु’ आहेत.

gourimanjrekar69@gmail.com



Source link

Mahindra चा 15 ऑगस्टला मोठा धमाका, एकाचवेळी ४ जबरदस्त SUV लाँच, तुम्हाला कोणती आवडली?

0
Mahindra चा 15 ऑगस्टला मोठा धमाका, एकाचवेळी ४ जबरदस्त SUV लाँच, तुम्हाला कोणती आवडली?


No match is being played.

Aug 12, 2025 | 3rd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

WI

(50 ov) 294/6

VS

PAK

92(29.2 ov)

West Indies beat Pakistan by 202 runs
Full Scorecard →

Aug 12, 2025 | 2nd T20

South Africa in Australia, 3 T20I Series, 2025

SA

(20 ov) 218/7

VS

AUS

165(17.4 ov)

South Africa beat Australia by 53 runs
Full Scorecard →

Aug 10, 2025 | 2nd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

PAK

(37 ov) 171/7

VS

WI

184/5(33.2 ov)

West Indies beat Pakistan by 5 wickets (DLS method)
Full Scorecard →





Source link

वानखेडे स्टेडियमच्या पुनर्बांधणीला विरोध करणारी याचिका १५ वर्षांनंतर फेटाळली

0
वानखेडे स्टेडियमच्या पुनर्बांधणीला विरोध करणारी याचिका १५ वर्षांनंतर फेटाळली



Mumbai high court Petition opposing reconstruction of Wankhede Stadium dismissed after 15 years वानखेडे स्टेडियमच्या पुनर्बांधणीला विरोध करणारी याचिका १५ वर्षांनंतर फेटाळली





Source link

High Blood Pressure वर रामबाण उपाय आहे ‘ही’ जपानी ट्रिक; कायम कंट्रोल राहिल BP

0
High Blood Pressure वर रामबाण उपाय आहे ‘ही’ जपानी ट्रिक; कायम कंट्रोल राहिल BP


Japanese Walking Technique For High Blood Pressure: आजच्या काळात, उच्च रक्तदाब (BP) ही एक सामान्य पण धोकादायक समस्या बनली आहे. वाढत्या रक्तदाबाचा परिणाम हळूहळू हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूवर होतो. म्हणूनच उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. त्याच वेळी, ते नियंत्रित करण्यासाठी, औषधांसह जीवनशैली बदलणे खूप महत्वाचे आहे.

ही खास युक्ती काय आहे?

जपानी संशोधकांनी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक खास तंत्र विकसित केले आहे. त्याला ‘इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग’ असे नाव देण्यात आले आहे. इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग म्हणजे काय आणि ते रक्तदाब नियंत्रित करण्यात कसा परिणाम करते ते जाणून घेऊया.

इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग म्हणजे काय?

इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग २००७ मध्ये जपानचे प्रोफेसर हिरोशी नोज आणि शिझुए मासुकी यांनी विकसित केले होते. या तंत्रात, चालणे दोन भागात विभागले गेले आहे.

इंटरव्हल वॉकिंग कसे करावे?

  • जलद चालणे
  • ३ मिनिटे वेगाने चाला, जेणेकरून तुमचा श्वास थोडा वेगवान होईल आणि तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील.
  • हळू चालणे
  • यानंतर, ३ मिनिटे आरामात हळू चाला.
  • ही पद्धत ५ वेळा पुनरावृत्ती केली जाते. म्हणजेच, एकूण ३० मिनिटे चालणे असते ज्यामध्ये १५ मिनिटे जलद चालणे आणि १५ मिनिटे मंद चालणे असते.

रक्तदाब कसा नियंत्रित केला जातो?

संशोधन अहवालानुसार, जेव्हा तुम्ही इंटरवल वॉकिंग करता तेव्हा शरीराच्या रक्तवाहिन्या सक्रिय होतात आणि रक्त प्रवाह सुधारतो. इंटरवल वॉकिंग केल्याने, सिस्टोलिक बीपी सुमारे ९ मिमी एचजी आणि डायस्टोलिक बीपी सुमारे ५ मिमी एचजीने कमी होऊ शकते. जर तुमचा रक्तदाब वेळोवेळी वाढला तर तुम्ही ही चालण्याची युक्ती तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करू शकता. याद्वारे, तुम्हाला काही महिन्यांत आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात. या तंत्रामुळे शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता देखील वाढते, जी हाय बीपी असलेल्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.

इतरही अनेक फायदे आहेत

  • रक्तदाब नियंत्रित करण्याव्यतिरिक्त, मध्यांतर चालण्यामुळे तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळू शकतात. 
  • हे फुफ्फुसांची क्षमता वाढवते.
  • ते पायांना बळकटी देते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे दैनंदिन काम चांगले करण्यास मदत होते.
  • ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, जे विशेषतः टाइप-२ मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे.
  • या सर्वांव्यतिरिक्त, दररोज थोडा वेळ चालण्याने मूड चांगला राहतो, झोप चांगली लागते आणि ताणतणाव देखील कमी होतो.

कसे सुरू करावे?

  • सुरुवातीला, फक्त एक मिनिट जलद आणि ३ मिनिटे हळू चालण्याने सुरुवात करा.
  • हळूहळू ३ मिनिटे जलद आणि ३ मिनिटे हळू चालण्यापर्यंत पोहोचा.
  • या दरम्यान, नेहमी तुमची पाठ सरळ ठेवा आणि तुमची नजर पुढे ठेवा.
  • तसेच, सुरुवातीला, दुसऱ्या व्यक्तीच्या देखरेखीखाली असे चाला.





Source link

ऋजुता दिवेकर म्हणजे वजन कमी करण्यासाठी ‘घरी शिजवलेले अन्न’ सर्वोत्तम; चुकीच्या आहाराची ५ लक्षणे

0
ऋजुता दिवेकर म्हणजे वजन कमी करण्यासाठी ‘घरी शिजवलेले अन्न’ सर्वोत्तम; चुकीच्या आहाराची ५ लक्षणे


करिना कपूरसारख्या कलाकारांसोबत काम केलेल्या सेलिब्रिटी पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नियमितपणे तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्ससोबत व्यावहारिक आरोग्य आणि निरोगीपणाच्या टिप्स शेअर करतात. तिच्या पोस्टमध्ये, तिने तुमचा आहार सर्वोत्तम नसल्याची ५ लक्षणे सांगितली आहेत. 

१. प्रथिनांचे ओव्हरलोड

ऋजुता दिवेकर तुमच्या आरोग्यासाठी अस्थिर आहाराची ५ लक्षणे अधोरेखित करतात. तुमच्या आहारात एकाच पोषक तत्वाचे वर्चस्व आहे. २०२५ मध्ये, शक्यता आहे की ते प्रथिने आहे. नकळत, तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये आणि तुमच्या आतड्यात असंतुलन निर्माण कराल.

२. मसालेदार

तुम्ही मसाल्यांचा तुमचा दैनंदिन डोस सोडून दिला आहे आणि आता तुम्हाला दररोज रात्री काहीतरी खारट, मसालेदार किंवा गोड हवे आहे असे वाटते.

३. घाबरत काय जेवता?

तुम्हाला काळजी वाटते की तुम्ही खूप खात आहात, म्हणून तुम्ही रोटी, तो चमचाभर भात आणि बरेच काही कमी करू लागता. तुम्हाला वजन कमी करायचे आहे, परंतु त्याऐवजी, तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि स्पष्टता गमावत आहात.

४. एकटेपणा

गणपतीला मोदक, ईदवर निखळ कोरमा किंवा ख्रिसमसवर केक खाणं चीट मिल म्हणून ओळखले जाते. यामुळे. सण, मित्र आणि कुटुंब या सगळ्याची मजा गमावतो. आणि हळूहळू तुम्हाला एकटेपणा जाणवतो.

५. आतड्यांवरील आरोग्याचा भार

स्वयंपाकघरातील कॅबिनेटमध्ये आता प्रोबायोटिक पेय, प्रीबायोटिक सप्लिमेंट आणि काही पचनाचे मिश्रण आहे. तुमचे पोट शेवटचे कधी पूर्णपणे साफ झाले हे तुम्हाला आठवत नाही. कारण ते नेहमीच अस्वस्थ असते. 

“अन्न ही संस्कृती, समुदाय आणि पाककृती आहे. जगण्याचा हा एक निरोगी मार्ग आहे. घरी शिजवलेले अन्न हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. वजन कमी करण्यासाठी हाच सर्वात सोपा उपाय आहे. 





Source link

मोदींनी ट्रम्प यांना दोन वेळा नोबेलसाठी नॉमिनेट करावे’, माजी अमेरिकन अधिकाऱ्यानेच घेतली अध्यक्षांची फिरकी

0
मोदींनी ट्रम्प यांना दोन वेळा नोबेलसाठी नॉमिनेट करावे’, माजी अमेरिकन अधिकाऱ्यानेच घेतली अध्यक्षांची फिरकी


राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जास्त शुल्क (टॅरिफ) लावल्यामुळे ते अमेरिकेच्या नागरिकांचेच लक्ष्य बनले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी असेही म्हटले आहे की, ट्रम्प विनाकारण भारताला नाराज करत आहेत. तसेच, त्यांनी उपरोधिकपणे म्हटले की भारताने ट्रम्प यांना दोनदा नोबेल पारितोषिकासाठी नामांकित (नॉमिनेट) करायला हवे.



Source link

Ratnagiri journalists to protest 17-year delay in Mumbai-Goa highway work on August 16

0
Ratnagiri journalists to protest 17-year delay in Mumbai-Goa highway work on August 16



Ratnagiri journalists to protest 17-year delay in Mumbai-Goa highway work on August 16 | मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार परिषदेचे निवळी येथे आंदोलन





Source link