Monday, July 6, 2026
Home Blog Page 121

ज्याला राजकारण करायचंय त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका, ज्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकार

0



Ajit Pawar in Phalthan speech: सरकारी विकासकामे करताना कॉन्ट्रॅक्टर चांगला असेल तर काम चांगले होते. जर कॉन्ट्रॅक्टर खराब असेल तर सरकारला पण त्रास होतो, अनेक कामं रेंगाळत राहतात. त्यामुळे ज्याला राजकारण करायचंय त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका अन् ज्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नका, हा माझा कटाक्ष असतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते शनिवारी फलटण (Phalthan) येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करुन हशा पिकवला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांच्या काही मागण्या ऐकून अजित पवार यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. 

यावेळी काही ग्रामस्थांनी गावातील वादांचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामपंचायतीकडून विरोधकांची अडवणूक केली जाते, अशी तक्रार त्यांनी अजितदादांकडे केली. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, ग्रामपंचायतीमधील लोक तुम्ही निवडून दिले आहेत. विकासकामांसाठी पैसे देणे माझे काम आहे. गावातील वाद हे थोरामोठ्यांनी एकत्र बसून आणि चर्चा करुन इथल्या लोकांनीच सोडवले पाहिजेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मी तुम्हाला अमुकतमुक माणसाला निवडून आणायला बटन दाबायला सांगितले होते का? आता पायताण घ्या आणि माझ्या डोक्यात टाका, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

तुमच्या इथं कंपन्या आहेत त्यांचा टॅक्स जरा वाढवा. तुम्हाला फक्त 20 लाख टॅक्स मिळतोय. तुमचा धंदापाणी नीट करा. गावात एकोपा ठेवा, जातीय सलोखा ठेवा, जातीय वादातून कोणाचं भलं झालं नाही. बारामती ॲग्रो तर फक्त साडेतीन लाख रुपये टॅक्स देते. वाढवा जरा, तेव्हाचा काळ वेगळा होता आताचा वेगळा आहे. डिस्टलरी मालकांना सांगा दादांनी आवाहन केलं आहे असे सांगा, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच आगामी काळात शेतीमध्ये एआयचा वापर करण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली. आमच्या शेतामधून आतापर्यंत 60-70 टन उस निघायचा. एआयचा वापर करुन तेच उत्पादन आता 100 टनापर्यंत जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून 18 हजार रुपये दिले जात आहेत. मात्र, आगामी काळात हे पैसे कृषी विभाग कडून देण्याचा विचार सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar news: ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून अजितदादांनी डोक्यावर हात मारुन घेतला

अजित पवार यांच्या या भाषणावेळी अनेक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाले. अजित पवार यांनी फलटणमधील विकासकामांच्या योगदानाचा उल्लेख करताना काही जणांची नावे घेतली. त्यावेळी समोरच्या प्रेक्षकांमधून एकजण उठला आणि त्याने तुम्ही साडेतीन वर्षे सरपंच राहिलेल्या व्यक्तीचे नाव घेतले नाही, अशी तक्रार केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, मी इथं लोकांची नावं घ्यायला आलोय की काम करायला आलोय. मी कधी बायकोचं नाव घेतलं नाही. इथे मी उखाणे घ्यायला आलो आहे का? तुम्ही डोक्यावर पडलात का तुम्ही, असा सवाल अजित पवारांनी समोरच्या व्यक्तीला विचारला.

यानंतर अजित पवार यांनी बारामतीपर्यंत जाणारे रस्ते कसे चांगले केले आहेत, याचा उल्लेख केला. त्यावेळी एका माणसाने अजित पवारांना सूचना केली की, ‘दादा रस्त्यावरील डिव्हायडर थोडे मोठे करा. कुत्री उडी मारुन गाडीसमोर येतात. त्यावेळी अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले की, ‘मी कुत्र्यांना सांगतो उडी मारु नका’. त्यांच्या या वक्तव्यावर हशा पिकला.अजित पवार निघत असताना एका व्यक्तीने म्हटले की, दादा आमच्या फलटणला पदरात घ्या. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘आता माझा पदर फाटलाय.’ यानंतर अजित पवार यांनी फलटणमधील विकासकामांकडे लक्ष देण्याचे आश्वासनही दिले. 

Mumbai News: मुंबईत महिलांसाठी 194 कोटीच्या मॉलचे काम सुरु: अजित पवार

मुंबईत 194 कोटीच्या मॉलचे काम सध्या सुरू आहे. महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याची विक्री त्या ठिकाणी होणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात 15 कोटींचा मॉल बनवणार आहोत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी देखील बनवणार आहे. मला आता इथं निधी मागितला तुमची तुम्हीच काम करून घ्या. या योजनेतून सगळीच काम होतील. त्या योजनेचा फायदा घ्या. आता मोटरसायकल असेल तरी त्याला घर दिले जाणार आहे. आतापर्यंत 44 लाख घर आपण मंजूर केले आहेत. मागच्या आणि आताची धरून राज्य बँकेंना पूरग्रस्तांना दहा कोटी रुपये दिले. त्याचेच आमच्यावरती आरोप होत आहेत. आरोप करणारे करत असतात. पण त्या बँकेने दहा कोटी रुपये दिले, असे अजित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

औंधच्या राणीसाहेबांनी म्यानातून तलवार उपसली, हवेत नाचवली, अजित पवार बघतच बसले

आणखी वाचा



Source link

‘पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू’, उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात न

0



Udayanraje Bhosale Jaykumar Gore: सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सुसंवाद आणि जिव्हाळा असलेली जोडी म्हणून ओळखले जाणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) पुन्हा एकदा एकत्र आले असून, त्यांच्या मैत्रीची झलक जिल्हा शासकीय विश्रामगृहावर पाहायला मिळाली.

जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात, उदयनराजेंनी मिश्कील शैलीत “पार्टी कुठे?” असा प्रश्न विचारला. त्यावर जयकुमार गोरेंनीही तेवढ्याच मिश्कीलपणे उत्तर दिलं, “चला, जलमंदिरलाच पार्टी करू!” या एका संवादातूनच दोघांमधील सुसंवादाची आणि सौहार्दाची पुनर्स्थापना झाल्याचे स्पष्ट झाले.

Udayanraje Bhosale Jaykumar Gore: उदयनराजे व जयकुमार गोरे यांच्यात सुप्त नाराजी 

सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नावाची चर्चा भाजपकडून खासदारकीसाठी होऊ लागल्यानंतर, उदयनराजे व जयकुमार गोरे यांच्यात एक प्रकारचा ‘सुप्त नाराजीचा’ सूर तयार झाला होता. यामुळे दोघेही जरी एकमेकांविरोधात उघडपणे बोलले नसले, तरी एक प्रकारचा तणाव जाणवू लागला होता.

Udayanraje Bhosale Jaykumar Gore: वाढदिवसाची पार्टी कुठे?

दुरावा मिटवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत, नुकत्याच झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत हे दोघे नेते एकत्र आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजपला सर्वाधिक जागा मिळवून पक्षाचे वर्चस्व वाढवण्याच्या उद्देशाने झालेल्या या बैठकीत खासदार उदयनराजे, मंत्री जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आणि आमदार मनोज घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर सर्वजण एकत्र बाहेर पडले. त्याच वेळी उदयनराजेंनी गोरेंच्या खांद्यावर हात ठेवत मिश्कीलपणे वाढदिवसाची पार्टी कुठे? असा प्रश्न विचारला. त्यावर गोरेंनीही “चला, जलमंदिरवरच पार्टी करू” असं उत्तर देत माहोल हलकाफुलका केला. उदयनराजेंनी गोरेंना हलकासा चिमटा काढत मैत्रीची गोडी अधिकच वाढवली.

Udayanraje Bhosale Jaykumar Gore: भाजपच्या व्यासपीठावरून उदयनराजे-गोरे पुन्हा एकत्र

याआधी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्याशी असलेल्या संघर्षाच्या काळात उदयनराजे, गोरे आणि रणजित निंबाळकर हे तिघे एकत्र असायचे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे आणि रामराजेंमध्ये समेट झाल्यावर हे त्रिकुट काहीसे दूर झाले होते. पण आता, भाजपच्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा उदयनराजे-गोरेंमध्ये मैत्रीचे सूर उमटत आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आणखी वाचा 

आमदार गायकवाड यांचा खुलासा; ती दीड कोटींची डिफेंडर कार 100 टक्के कर्जातून, नेमकी कोणाची?

आणखी वाचा



Source link

बिअर पिऊन किडनीमधील मुतखडा बाहेर पडतो का? डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ करणं योग्य आहे का?

0
बिअर पिऊन किडनीमधील मुतखडा बाहेर पडतो का? डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ करणं योग्य आहे का?


Beer Good for Kidney Stone : जेव्हा तुम्हाला किडनी स्टोन होतात तेव्हा बरेच लोक म्हणतात की बिअर पिल्याने ते विरघळतात. पण यात किती तथ्य आहे, किंवा तुम्हाला माहिती आहे का की याचा तुमच्या आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होईल? जर तुम्ही लोकांकडून ऐकल्यानंतर किंवा दुसऱ्याला असे करताना पाहिले असेल, तर ते योग्य आहे की अयोग्य याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉ. प्रियदर्शी रंजन त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे की जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर बिअर पिणे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकते.

Add Zee News as a Preferred Source

किडनी स्टोनसाठी बिअर पिणे योग्य आहे का? 

जर तुम्हाला वारंवार किडनी स्टोन होतात किंवा आधीच किडनी स्टोन आहेत, तर लोक सहसा म्हणतात की बिअर पिल्याने ते बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून, या रुग्णांनी भरपूर बिअर प्यावे. पण हे बरोबर आहे का? तज्ञ म्हणतात की बिअर एक नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे, म्हणजे ते लघवी वाढवते आणि लहान खडे बाहेर काढू शकते.

बिअरमध्ये प्युरिन असतात, जे यूरिक ऍसिडची पातळी वाढवू शकतात. अल्कोहोल सुरुवातीला शरीराला हायड्रेट करते, परंतु नंतर ते शरीराला डिहायड्रेट करते, लघवीला केंद्रित करते आणि खडे तयार करण्यासाठी योग्य वातावरण तयार करते. बिअर मूत्रपिंड आणि यकृत दोन्हीवर ताण देखील टाकते आणि व्यसनास कारणीभूत ठरू शकते. बिअर हा किडनी स्टोनवर उपचार नाही. हे एक सामान्य पेय आहे, जे डॉ. प्रियदर्शी किडनी स्टोनसाठी अजिबात शिफारस करत नाहीत.

तुम्ही बिअरसाठी इतर सुरक्षित पर्याय वापरून पाहू शकता. जसे की लिंबू पाणी, बार्ली वॉटर, तुळशीचा रस किंवा नारळ पाणी. हे अधिक नैसर्गिक आणि शरीरासाठी अनुकूल आहेत आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या किडनीला आधार देतात.





Source link

पैशांचं घबाड सापडलेल्या IPS हरचरण यांच्यावर काय कारवाई? कोणाला असतो अधिकार? जाणून घ्या सर्वकाही!

0
पैशांचं घबाड सापडलेल्या IPS हरचरण यांच्यावर काय कारवाई? कोणाला असतो अधिकार? जाणून घ्या सर्वकाही!


DIG Corruption: आयपीएस, आयएएस होण्यासाठी लाखो तरुण दिवसरात्र एक करुन मेहनत घेत असतात. अनेकजण आपलं करिअर पणाला लावतात. त्यातील काहीजण आयपीएस, आयएएस होतात. यानंतर निष्कलंकपणे हे पद संभाळणेदेखील तितकेच जिकरीचे असते. कारण वर्दीला लागलेला एखादा भ्रष्टाचाराचा डाग तुमच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकतो.  पंजाब डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांची कहाणी अशीच आहे. दरम्यान हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर काय कारवाई होणार? कोणाला असतो हा अधिकार? सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

हरचरण सिंग भुल्लर यांचे वडील मेजर मेहल सिंग भुल्लर हे नागरी सेवांतील एक दिग्गज होते. 1960 च्या दशकात भारतीय सैन्यात सामील होऊन त्यांनी 13 व्या पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर पद मिळवले. 1962 च्या चीन युद्ध, 165 च्या पाकिस्तान युद्ध आणि मिझोरम बंडखोरीविरोधी अभियानांत त्यांचे शौर्य उल्लेखनीय राहिले. नंतर त्यांनी आयपीएसमध्ये सामील होऊन पंजाबमध्ये दहशतवादाविरुद्ध लढा दिला. 

2002-03 मध्ये पंजाबचे डीजीपी म्हणून अतिरेक्यांना आत्मसमर्पणासाठी प्रोत्साहित केले. पंजाब सशस्त्र पोलिसांना मजबूत केले. जालंधरमधील पीएपी कॉम्प्लेक्स आणि पोलिस डीएव्ही शाळेची स्थापना केली. तसेच WWE कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’चे प्रशिक्षण यामुळे ते खेळप्रेमी म्हणूनही ओळखले गेले. हा वारसा मुलाला प्रेरणा देणारा ठरला.

भ्रष्टाचार शोध आणि तात्काळ कारवाई

आयपीएस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यास प्रथम सीबीआय किंवा राज्य अँटी-करप्शन ब्युरोद्वारे तपास सुरू होतो. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट 1988 (PCA) अंतर्गत लाचखोरी, संपत्तीचा गैरवापर किंवा पदाचा दुरुपयोग यावर एफआयआर दाखल होते. तात्काळ अटक, शोधकारवाई आणि मालमत्ता जप्त होते, जसे की नुकत्याच पंजाब डीआयजी हरचरण सिंग भुल्लर प्रकरणात 8 कोटी रुपये आणि सोने जप्त झाले. न्यायालयीन परवानगीने निलंबन होते आणि गुन्हे तपासात सहकार्याची मागणी केली जाते. हे प्रकरण सामान्यतः 3-6 महिन्यांत न्यायालयात पोहोचते, ज्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 165-169 अंतर्गत गुन्हा दाखल होतो.

दंड आणि शिक्षेचे स्वरूप

दोषी आढळल्यास PCA अंतर्गत 3 ते 7 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. पदाचा दुरुपयोग असल्यास आयपीसी (BNS) कलम 161-165अ अंतर्गत अतिरिक्त कारवाई होते, ज्यात नोकरीतून काढून टाकणे, पेन्शन रद्द करणे आणि मालमत्ता जब्तीचा समावेश असतो. उदाहरणार्थ, पूर्व आयपीएस अमिताभ ठाकुर यांच्यावर जालसाजी प्रकरणात एफआयआर दाखल झाली, तर जी. संपत कुमार यांना न्यायालय अवमानासाठी 15 दिवसांची शिक्षा झाली. दीर्घकालीन परिणाम म्हणजे कायमस्वरूपी निलंबन आणि भविष्यातील नोकरीस बंदी येऊ शकते.

कारवाईचा अधिकार कोणाकडे?

प्राथमिक तपास आणि एफआयआरसाठी सीबीआय, राज्य एसीबी किंवा पोलीस यांचा अधिकार असतो, पण आयपीएससारख्या केंद्रीय सेवकांसाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असते. पदोन्नती आणि शिस्तभंगासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि यूपीएससीचा अधिकार असतो. न्यायिक प्रक्रियेसाठी विशेष न्यायालय किंवा उच्च न्यायालय निर्णय घेतात. पंजाब प्रकरणात सीबीआयने अटक केली, तर पंजाब सरकारने निलंबनाची घोषणा केली. 

राज्य सेवेतून केंद्रीय पदापर्यंत उन्नती

यूपीएससी उत्तीर्ण न होता हरचरण सिंग यांनी राज्य पोलिस सेवा (एसपीएस) परीक्षेद्वारे पंजाब पोलिसात डीएसपी म्हणून प्रवेश केला. संगरूर, बर्नाला, फतेहगड साहिब, होशियारपूर, खन्ना, जागरों, गुरुदासपूर आणि मोहाली जिल्ह्यांत सेवा बजावली. मोहालीचे एसएसपी म्हणून गुन्हे नियंत्रणात यश मिळवले. 2016 मध्ये यूपीएससी शिफारशीप्रमाणे एसपीएसमधून आयपीएसमध्ये पदोन्नती मिळाली. 2023 मध्ये डीआयजी झाले आणि 27 नोव्हेंबर 2024 रोजी रोपर रेंजचा पदभार सांभाळला. येथे ड्रग्सविरोधी मोहिमेचे नेतृत्व केले, बेकायदा व्यापार रोखला आणि शिरोमणि अकाली दल नेते बिक्रम सिंग मजिथियांच्या ड्रग्स प्रकरणात एसआयटीचे प्रमुख होते. नागरी सेवकांसाठी हे उदाहरणीय ठरले.

FAQ

प्रश्न: हरचरण सिंग भुल्लर यांना यूपीएससी न देता आयपीएस कसे बनता आले?

उत्तर: हरचरण सिंग भुल्लर यांनी राज्य पोलिस सेवा (एसपीएस) परीक्षेद्वारे पंजाब पोलिसात डीएसपी म्हणून प्रवेश केला. संगरूर, मोहालीसह विविध जिल्ह्यांत सेवा बजावल्यानंतर, २०१६ मध्ये यूपीएससीच्या शिफारशीवरून त्यांना एसपीएसमधून आयपीएसमध्ये पदोन्नती मिळाली. २०२३ मध्ये ते डीआयजी बनले, ज्यामुळे यूपीएससी न देता आयपीएस बनण्याचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय ठरला.

प्रश्न: भुल्लर यांना भ्रष्टाचार प्रकरणात कसे पकडले गेले?

उत्तर: ११ ऑक्टोबर २०२५ रोजी भंगार व्यापारी आकाश बट्टा याने चंदीगड सीबीआय कार्यालयात तक्रार केली की, भुल्लर यांनी खोट्या एफआयआरच्या नावाखाली ८ लाख रुपयांची मागणी केली. सीबीआयने १० दिवस पाळत ठेवली आणि १६ ऑक्टोबर रोजी मोहाली कार्यालयात ५ लाखांचा हप्ता स्वीकारताना भुल्लर आणि मध्यस्थ कृशानू यांना रंगेहाथ पकडले. छाप्यात ७ कोटी रुपये, १.५ किलो सोने आणि अन्य मौल्यवान वस्तू जप्त झाल्या.

प्रश्न: या प्रकरणाचा पंजाब पोलिसांवर काय परिणाम झाला?

उत्तर: भुल्लर यांच्या अटकेने पंजाब पोलिस विभागाला मोठा धक्का बसला, विशेषतः डीजीपी गौरव यादव यांच्या भ्रष्टाचारविरोधी धोरणाला हा धक्का मानला जातो. या प्रकरणाने सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचे गंभीर परिणाम दाखवले. पंजाब सरकारने कारवाईची घोषणा केली असून, पंचकुला येथे भुल्लर यांची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण नागरी सेवेच्या इच्छुकांसाठी सावधगिरीचा धडा आहे.





Source link

पवार कुटुंबियांचा यंदाचा दिवाळी भेट कार्यक्रम रद्द

0
पवार कुटुंबियांचा यंदाचा दिवाळी भेट कार्यक्रम रद्द

बारामती – दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत होणारा दिवाळी भेट कार्यक्रम यंदा होणार नाही. उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या वर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षी गोविंद बागेत शरद पवार, सुप्रिया सुळे, आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली होती, तर अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी काटेवाडी येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या होत्या.

मात्र, यंदा कुटुंबावर आलेल्या वैयक्तिक दुःखामुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नेहमीप्रमाणे होणारा दिवाळी भेटीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

फलटण नगरपालिका निवडणुकीतील गोंधळावर काँग्रेसचा आक्षेप – मतदार यादी निश्चितीनंतरच आरक्षण सोडत घ्यावे अशी मागणी

0
फलटण नगरपालिका निवडणुकीतील गोंधळावर काँग्रेसचा आक्षेप – मतदार यादी निश्चितीनंतरच आरक्षण सोडत घ्यावे अशी मागणी

फलटण : फलटण शहर व तालुक्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर आक्षेप घेतला आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांवर अद्याप निवडणूक शाखेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्याचप्रमाणे सदोष मतदार यादीवर दाखल करण्यात आलेल्या हरकतींमुळे काही प्रभागांतील मतदार संख्येत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, मतदार यादी अंतिम होण्याआधी जाहीर केलेल्या आरक्षण प्रक्रियेत अनियमितता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरक्षण सोडत पुन्हा एकदा मतदार यादी निश्चित झाल्यानंतरच घेण्यात यावे, अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र सुर्यवंशी (बेडके) व शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. पंकज पवार यांनी मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या वेळी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री. गंगाराम रणदिवे, काँग्रेसचे पदाधिकारी श्री. धनंजय गोरे, श्री. सुधीर शिंदे यांचीही उपस्थिती होती.

फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मध्ये तिरंगी लढतीची शक्यता — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे युवा नेतृत्व कुणाल किशोर काकडे चर्चेत.

0
फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मध्ये तिरंगी लढतीची शक्यता — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे युवा नेतृत्व कुणाल किशोर काकडे चर्चेत.

फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मध्ये तिरंगी लढतीची शक्यता — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे युवा नेतृत्व कुणाल किशोर काकडे चर्चेत.

फलटण — फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ ‘ब’ (मंगळवार पेठ) या सर्वसाधारण गटातून आगामी निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या प्रभागात दोन जुन्या चेहऱ्यांमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता असतानाच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, उच्च शिक्षित आणि सामाजिक कार्यात अग्रेसर युवा नेतृत्व कुणाल किशोर काकडे हे नवे पर्याय म्हणून जोरदार चर्चेत आले आहेत.
कुणाल काकडे हे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. समाजात ऐक्य, प्रगती आणि विकासाचा संदेश पोहोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे आणि प्रबोधनाचे विचार त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत रुजवले आहेत, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे.
दरम्यान, प्रभागातील जुन्या दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले असले तरी, नागरिक आता तिसऱ्या पर्याय म्हणून कुणाल किशोर काकडे यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. “बदल घडवून आणण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी मिळावी,” अशी भावना मतदारवर्गात व्यक्त होत आहे.
कुणाल काकडे यांच्या एन्ट्रीमुळे या प्रभागात तिरंगी लढत निश्चित दिसत असून, राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत. फलटणमधील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ही निवडणूक केवळ परंपरेची लढत न राहता, आंबेडकरी विचारसरणी आणि युवा नेतृत्वाच्या चळवळीची नवी दिशा ठरण्याची शक्यता आहे.

15 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट; परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भरली धडकी

0



Maharashtra Rains Updates: दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना (Maharashtra Rains Updates) पुन्हा एकदा धडकी भरलीय. हवामान विभागानं आज (16 ऑक्टोबर) आणि उद्या (17 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्टचा (Yellow Alert) इशारा दिलाय आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांचं (Marathwada Farmer) अतोनात नुकसान झालं. काही शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून गेल्यात तर काही शेतकऱ्यांचं हाता तोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं, त्यातून बळीराजा सावरत नाहीत तेवढ्यात हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्यानं, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

यवतमाळच्या जिल्ह्यातील पुसद परिसरात पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे (Rain In Yavatmal) पुसद आणि वनवारला परिसरात शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी सोयाबीनची कापणी आणि काढणी सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सोयाबीन भिजत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गंजी झाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असल्याने कसेबसे वाचलेले सोयाबीन काढतेवेळी पाऊस आल्याने शेतात उभे असलेले सोयाबीन पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच शेतात फुटलेला कापूसही ओला झाल्याने शेतकऱ्यांनाचे नुकसान होत आहे. 

पाण्यावरच्या शेतीचा धाराशिव पॅटर्न तयार करण्यासाठी चाचपणी- (Experiments to create a Dharashiv pattern of water-based farming)

महापुरात धाराशिवमध्ये शेकडो एकर जमीन खरडून गेली. नदीकाठच्या जमिनीला याचा सर्वाधिक फटका बसला. शेतात मातीच शिल्लक नाही. त्यामुळे आता अशा ठिकाणी पाण्यावर शेती करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. पाण्यावरच्या शेतीचा धाराशिव पॅटर्न तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. महिनाभरात याबाबतचा अहवाल तयार करण्याचे सांगण्यात आलं आहे. पाण्यावरची शेती खर्चिक आहे मात्र त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार असल्यास सरनाईक म्हणाले. 

काढणीला आलेलं सोयाबीन काढा, कृषी विद्यापीठाचा सल्ला (Rain Updates)

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही शिफारसी केल्या आहेत.  त्यानुसार, काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Weather Alert: आज संपूर्ण मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचे यलो अलर्ट, पुढील दोन दिवस कुठे काय स्थिती?

आणखी वाचा



Source link

धुळीचे साम्राज्य, खड्ड्यांची दहशत – रस्ता बंद आंदोलनाचा इशारा

0
धुळीचे साम्राज्य, खड्ड्यांची दहशत – रस्ता बंद आंदोलनाचा इशारा

फलटण | प्रतिनिधी पालखी महामार्ग अंतर्गत फलटण शहरात सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्यांच्या कामात प्रचंड अकार्यक्षमता आणि नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अनेक भागांत नागरिक आणि व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः महात्मा फुले चौक ते टेलिफोन ऑफिस या प्रमुख मार्गावरील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने परिसरातील दुकानदार, गाळेधारक तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या धुळीमुळे मंडई परिसरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी आणि सायकलस्वारांचे हाल होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, संतापाची भावना उफाळून आली आहे.

स्थानिक गाळेधारक व नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप कोणतेही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की, तातडीने नियोजनबद्ध काम सुरू करून धुळीपासून व खड्ड्यांपासून दिलासा द्यावा.

“प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या कामांची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी,” अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, पुढील दोन दिवसांत ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर ‘रस्ता बंद आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

🔻 महत्त्वाचे मुद्दे:

  • रस्त्यांचे खोदकाम झाल्यावर काम अर्धवट सोडले
  • महात्मा फुले चौक ते टेलिफोन ऑफिस परिसरात धुळीचे साम्राज्य
  • अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता
  • स्थानिक नागरिक आणि गाळेधारक संतप्त
  • प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी
  • ठोस पावले न उचलल्यास रस्ता बंद आंदोलनाचा इशारा

बुद्ध विहारासाठीचा लढा आता जिल्हा परिषदेत – आंबेडकरी समाजाची निर्णायक भूमिका”

0
बुद्ध विहारासाठीचा लढा आता जिल्हा परिषदेत – आंबेडकरी समाजाची निर्णायक भूमिका”

“मत त्यालाच, जो न्यायासाठी उभा राहील – समाज मंदिराचा प्रश्न निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार!”

फलटण, दि. १५ ऑक्टोबर:  साखरवाडीतील आंबेडकरी समाजाच्या बुद्ध विहारासाठीचा लढा आता साखरवाडी संघर्ष #बुद्ध विहार हक्काचा ,वंचित बहुजन आघाडी ,ZP 2025 ,प्रकाश आंबेडकर ,दलित ओबीसी एकत्र ,मत हक्कासाठी संघर्ष ,संविधान वाचवा ,समाज मंदिर हक्कानेकेवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय व्यासपीठावरही पोहोचला आहे. २०२५ हे वर्ष संघर्षमय ठरणार, याची सुरुवातच संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रद्द होण्यापासून झाली.

ही रद्द झालेली जयंती समाजासाठी एक अपमान ठरली. कारण बाबासाहेबांची जयंती हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर समाजाच्या आत्मसन्मानाचा उत्सव असतो. समाज मंदिराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यात आलेल्या दिरंगाईमुळे आणि सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या दुर्लक्षामुळे हे दुर्दैवी चित्र समोर आले.

       मागणीचा केंद्रबिंदू – शासकीय जागा हवीच!

गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू असलेला बुद्ध विहाराचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. ग्रामपंचायतीने गावठाण हद्दीत जागा नाही, असा लेखी ठराव देऊन जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे समाजाची मागणी सरळसरळ शासकीय जागेसाठी आहे – आणि ती साखरवाडीत उपलब्ध देखील आहे.

            पाच ठोस मुद्दे समाजाच्या मागणीसाठी:

  1. गावठाण जागेचा मुद्दा संपलेला आहे. आता शासकीय जागाच हवी.
  2. गट क्र. १७१९ ते १७२४ मध्ये रिक्त शासकीय जागा असून ती समाज मंदिरासाठी न्याय्य आहे.
  3. सदर जागा पूर्वी पोलीस स्टेशनसाठी राखीव होती, पण आता रिकामी आहे. नवीन पोलीस स्टेशन इतरत्र हलवले गेले आहे.
  4. आंबेडकरी समाजात उच्चशिक्षित, जाणता आणि संघटित तरुणवर्ग तयार झाला आहे, जो आता आवाज उठवत आहे.
  5. प्रस्थापित पक्षांचा फक्त मतांसाठी वापर – यावेळी दलित व ओबीसी समाज सजग, निर्णायक भूमिका घेणार.

सामाजिक लढ्याचं रूपांतर राजकीय रणधुमाळीत!

साखरवाडी–पिंपळवाडी जिल्हा परिषद गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.

अक्षय साळवे या तरुण समाज नेत्याने जाहीर केले आहे की, “जो समाजासोबत राहील, त्यालाच सत्ता. जो न्यायासाठी लढेल, त्यालाच मत!

आगामी ZP निवडणुकीत बुद्ध विहाराच्या जागेचा मुद्दा केवळ प्रमुख नाही, तर निर्णायक ठरेल. प्रत्येक गाव, वाडी, गल्लीबोळात हा प्रश्न पोहोचवून मतदार जागृत केला जाणार आहे.

     प्रकाश आंबेडकर यांची भेट आणि राजकीय रणशिंग:

प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हीच आता दलित–ओबीसी समाजासाठी पर्याय ठरणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच सामान्यांचा आवाज बुलंद केला आहे, त्यामुळे या गटात इतर मागासवर्गीय समाजही वंचितसोबत येण्याची शक्यता आहे.

       लढा केवळ जागेचा नाही, तर सत्तेतील सहभागाचा आहे!

“बुद्ध विहार नाकारलं, पोलिसांकडून दडपशाही झाली, सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला – हे सगळं जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत,” असा इशारा दिला जात आहे.

    आवाज बुलंद – ध्येय स्पष्ट:

“प्रस्थापित नेत्यांचं गुलाबपुष्पाने स्वागत होणार नाही, तर लोकशाहीच्या ताकदीने उत्तर दिलं जाईल!”

साखरवाडीतील बुद्ध विहाराचा प्रश्न हा केवळ जागेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता दलित–ओबीसी समाजाच्या सन्मानाचा, आत्मभिमानाचा आणि राजकीय सहभागाचा लढा ठरत आहे. यावेळी प्रस्थापितांना सहज विजय मिळणार नाही, कारण या निवडणुकीचा केंद्रबिंदू असेल –
“सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार आणि समाज मंदिराचा लढा!”