Monday, July 6, 2026
Home Blog Page 120

दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी

0



मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीचा (Diwali) उत्साह आणि आनंद साजरा होत असताना राज्यातील दोन जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सातारा (Satara) आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडल्या असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. वाशिम जिल्ह्यातील पुसद येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. यातील जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सातारा जिल्ह्यातील सातारा कास रोडवर रेसिंग कारच्या नादात दोन-चार गाड्यांचा भीषण अपघात झाला. येथील गणेश खिंड परिसरातील ही घटना असून 5 चार चाकी गाड्यांची रेस लागली होती. त्यामध्ये, एक चार चाकी गाडी पलटी झाल्याने इतरही गाड्या त्यास धडकल्याची घटना घडली. हुल्लडबाजी करताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. दिवाळीच्या दिवशी अतिउत्साही पर्यटकांची सातारा-कास रोडवर हुल्लडबाजी सुरू होती. त्यावेळी झालेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हुल्लडबाज पर्यटकांवर  पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

वाशिमध्ये दुचाकी अन् वाहनाची धडक

वाशिम जिल्ह्यातही दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. वाशिम ते पुसद मार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. जखमीला तात्काळ वाशिमच्या  जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याची चर्चा असून, दुचाकीला धडक देताच धडक देणारे वाहन अपघात स्थळावरून पसार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. 

हेही वाचा

प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा



Source link

थायलंड अभ्यास दौरा – पर्यटनासोबत ऐतिहासिक समृद्धीचा अनुभव

0
थायलंड अभ्यास दौरा – पर्यटनासोबत ऐतिहासिक समृद्धीचा अनुभव

मुंबई.   पर्यटनाचा अनुभव घेत घेत थायलंडच्या इतिहासाचे मराठीतून सखोल ज्ञान मिळवण्याची संधी आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली झाली आहे. येत्या १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ५ रात्री ६ दिवसांचा थायलंड अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यात थ्री स्टार हॉटेलमध्ये निवास, दर्जेदार भोजन, आरामदायक प्रवास आणि मराठीतून ऐतिहासिक माहिती मिळण्याची सोय उपलब्ध आहे.

🧳 दौऱ्याचा खर्च : ₹६४,०००/- प्रति व्यक्ती

✈️ दौऱ्यात समाविष्ट :

  • थेट विमान प्रवास
  • थ्री स्टार हॉटेलमध्ये राहणी
  • दररोज सकाळचा नाश्ता
  • दुपारी व रात्री शाकाहारी/मांसाहारी जेवण
  • वातानुकुलित बसमधून स्थानिक पर्यटन

दौऱ्यात समाविष्ट नसलेले :

  • साईट सिंग फी
  • ट्रॅव्हल इन्शुरन्स (पॉलिसी)

☸️ विशेष आकर्षण :

थायलंड देशाचा इतिहास मराठीतून जाणून घेण्याची अनोखी संधी — ज्यामुळे हा दौरा केवळ पर्यटनापुरता मर्यादित न राहता एक समृद्ध अनुभव ठरेल.

✍🏻 नोंदणी सुरु आहे!

मर्यादित जागा असल्याने लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

📱 9320213414 / 9819337679

भारताची एकाचवेळी जगातील 24 देशांसोबत सर्वात मोठी डील! अमेरिका आणि चीनला जबरदस्त झटका

0
भारताची एकाचवेळी जगातील 24 देशांसोबत सर्वात मोठी डील! अमेरिका आणि चीनला जबरदस्त झटका


India making big deals with 24 countries : अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापारामुळे केवळ भारताचे नुकसान झाले नाही तर जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. अशातच भारताने अमेरिकेला जबरदस्त झटका दिला आहे.  भारताने एकाचवेळी 24 देशांशी करार केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मागील सहा महिन्यांत व्यापार शुल्कामुळे आणि चीनने या 24 देशांशी केलेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा भारताने प्रयत्न केला आहे. भारत सरकारने असा डेटा जारी केला आहे ज्यामुळे चीन आणि अमेरिका दोघांचीही झोप उडू शकते. भारताने करार केलेले 24 देश कोणते आहेत आणि भारताने या देशांशी किती व्यापार केला आहे ते जाणून घेऊया.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, भारतीय निर्यातदारांनी 24 देशांना केलेल्या निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली. या 24 देशांमध्ये कोरिया, संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, टोगो, इजिप्त, व्हिएतनाम, इराक, मेक्सिको, रशिया, केनिया, नायजेरिया, कॅनडा, पोलंड, श्रीलंका, ओमान, थायलंड, बांगलादेश, ब्राझील, बेल्जियम, इटली आणि टांझानिया यांचा समावेश आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील निर्यातीत घट झाली, ज्याचे मुख्य कारण सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टनने लादलेले उच्च शुल्क होते.

किती निर्यात झाली?

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) या 24 देशांमध्ये 129.3 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत सकारात्मक वाढ दर्शवते. ही भारताच्या एकूण निर्यातीच्या 59 टक्के आहे. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान निर्यात 3.02 टक्क्यांनी वाढून 220.12 अब्ज डॉलर्स झाली आणि आयात 4.53 टक्क्यांनी वाढून 375.11 अब्ज डॉलर्स झाली, ज्यामुळे व्यापार 154.99 अब्ज डॉलर्सची तूट झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 16 देशांना भारताच्या निर्यातीत नकारात्मक वाढ झाली आहे. देशाच्या निर्यातीत या देशांचे योगदान सुमारे 27 टक्के (60.3 अब्ज डॉलर्स) आहे.

भारताचे लक्ष या देशांकडे वाढले

एका निर्यातदाराने सांगितले की अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के मोठ्या प्रमाणात कर लादल्याने अमेरिकेतील निर्यातीवर परिणाम होत आहे, परंतु निर्यातदार समुदाय आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेसह इतर भौगोलिक देशांमध्ये निर्यातीला प्रोत्साहन देत आहे. निर्यातदाराने सांगितले की येत्या काही महिन्यांतही हा ट्रेंड कायम राहील. आकडेवारीनुसार, वॉशिंग्टनने लादलेल्या उच्च करांमुळे सप्टेंबरमध्ये भारताची अमेरिकेतील वस्तूंची निर्यात 11.93 टक्क्यांनी घटून 5.46 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर आली.

अमेरिकेसोबतची व्यापार स्थिती

आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत, देशाची अमेरिकेला होणारी निर्यात 13.37 टक्क्यांनी वाढून 45.82 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली, तर आयात 9 टक्क्यांनी वाढून 25.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली. अमेरिकेने 27 ऑगस्टपासून अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या भारतीय वस्तूंवर 50 टक्के व्यापक कर लादला. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत. 2024-25 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असेल.





Source link

प्रभाग क्रमांक १२ मध्ये विकास काकडे सर यांना जनतेचा पाठिंबा; सामाजिक कार्यातून उभं राहिलेलं नेतृत्व

0
प्रभाग क्रमांक १२ मध्ये विकास काकडे सर यांना जनतेचा पाठिंबा; सामाजिक कार्यातून उभं राहिलेलं नेतृत्व

प्रभाग क्रमांक १२ मध्ये विकास काकडे सर यांना जनतेचा पाठिंबा; सामाजिक कार्यातून उभं राहिलेलं नेतृत्व

फलटण (प्रतिनिधी): फलटण नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रभाग क्रमांक १२ मध्ये विशेष लक्ष वेधून घेतले जात आहे. विविध राजकीय गटांमधून इच्छुक उमेदवारांची चर्चा सुरू असताना, जनतेतूनच एक नावलौकिक प्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणून विकास वसंतराव काकडे सर यांचे नाव पुढे येत आहे.

सामाजिक कार्याची ठसठशीत पावले

विकास काकडे सर हे राजे गटाचे निष्ठावान व विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून, साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महापुरुष जयंती, रक्तदान शिबीर, श्रामणेर शिबीर, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरविण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

कोविड काळातही मदतीचा हात पुढे

कोविडच्या संकटमय काळात सरांनी शाळकरी मुलांसाठी शिधा वाटप, आर्थिक मदत, तसेच ताथवडा आश्रमशाळा व वृद्धाश्रमातील नागरिकांची मदत करून सामाजिक भान जपले. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक जिल्हा दक्षता समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेकांना मदत केली आहे.

शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील समृद्ध अनुभव

विकास काकडे सर हे श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे माजी उपप्राचार्य असून, मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली. तसेच, शिक्षक पतसंस्था व सहकारी संस्थांमध्ये ते व्हाइस चेअरमन म्हणून कार्यरत होते. सातारा सहकार बोर्डाचे ते संचालक आहेत.

सांस्कृतिक, साहित्य, व विचारमंथनातून समाज जागृती

हिंदी राष्ट्रभाषा प्रचारक म्हणून त्यांना पुणे हिंदी प्रचारक संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून 1991 मध्ये फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले स्मृती शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करून त्यांनी सामाजिक विचारधारेची मुहूर्तमेढ रोवली.

राजघराण्याशी जिव्हाळ्याचं नातं

श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ व विश्वासाचं नातं असून, राजे गटाचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षांपासून ते सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेतृत्व करत आले आहेत.

दलित चळवळीतील सक्रीय सहभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी दलित व बहुजन समाजातील युवकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिमा मिरवणूक काढण्याच्या मान विकास काकडे सर यांच्या नेतृत्वाखाली भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीला मिळाला . तसेच जयंती मिरवणुका, सामाजिक विचारधारा रुजवण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले गेले.

जनतेतून उमेदवारीची मागणी

प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांमध्ये विकास काकडे सरांविषयी  विश्वास व आदर आहे तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या सामाजिक जाणिवा, तळागाळातील लोकांसाठी केलेले कार्य आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन लक्षात घेता, त्यांना उमेदवारी मिळावी अशी सामान्य जनतेतून व कार्यकर्त्यांतून जोरदार मागणी होत आहे.


अष्टपैलू, अभ्यासू, आणि कार्यक्षम नेतृत्व असलेल्या विकास काकडे सरांसारख्या व्यक्तिमत्त्वाने स्थानिक राजकारणात प्रवेश केल्यास प्रभाग क्रमांक १२ मध्ये नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतो, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.

सम्यक संमबुद्धांची प्राचीन भारतात आढळून न येणारी चालण्याच्या स्थितीतील शिल्प !

0
सम्यक संमबुद्धांची प्राचीन भारतात आढळून न येणारी चालण्याच्या स्थितीतील शिल्प !

सम्यक संमबुद्धांची प्राचीन भारतात आढळून न येणारी चालण्याच्या स्थितीतील शिल्प !

भारतात जिथे बुद्ध धम्माचा उगम झाला त्या प्राचीन भारतात आढळून न येणारे हे शिल्प, नाग लोकांची भूमी असलेल्या नागपूरतील “नागलोक” या ठिकाणी आहे. बौद्ध शिल्पशास्त्रानुसार भूमी स्पर्श मुद्रा अथवा प्रामुख्याने आढळून येणारी धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा/ व्याख्यान मुद्रा ही सर्रासपणे दिसून येते, त्याही व्यतिरिक्त अनेक शिल्प आपल्याला आढळून येतात , पण चालणाऱ्या स्थितीतील सम्यक संमबुद्धांचे शिल्प दुर्मिळच, मग ही मूर्ती/ शिल्प आपल्याला कोणत्या कलेतून दिसून येते व कुठे?

चालणाऱ्या सम्यक संमबुद्धांच्या शिल्पची प्रमुख माहिती :

चालणाऱ्या सम्यक संमबुद्धांच्या मूर्तीतील वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या चेहऱ्यावर स्थितप्रज्ञता आहे तसेच डावा हात खाली सोडलेला असून उजवा हात अभय मुद्रेत आहे तर अंगावर घातलेल्या चीवराच्या घड्या मध्यम स्वरूपाच्या आहेत जशा गांधारशैलीत दिसतात त्याहीपेक्षा कमी स्वरूपाच्या आहेत, गतिमानता प्रदर्शित करण्यासाठी कलाकारांनी मूर्तीतील डावा पाय पुढे प्रदर्शित केला आहे तर उजवा पाय मागे असून तो किंचितसा टाचेतून उचललेल्या स्थितीत आहे ही सर्व लकब मूर्तीला गतिमानता बहाल करते, ही मूर्ती कमळाच्या अधिष्ठाणावर स्थापित असून कमळ हे पावित्र्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
आग्नेय आशियातील मूळ: चालणाऱ्या सम्यक संमबुद्धांची मुद्रा (posture) “थाई” कलेत आढळून येते , विशेषत: इ.स. १३ व्या शतकातील सुखोथाई (Sukhothai) साम्राज्यातील एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे. ती प्रामुख्याने थायलंड आणि आग्नेय आशियाच्या इतर भागांमध्ये आढळते येते.

भारतात दुर्मिळ : चालणाऱ्या सम्यक संमबुद्धांची मूर्ती भारतातील सर्वात कमी आढळणाऱ्या मुद्रांपैकी एक म्हणून ओळखली जाते. पारंपरिक भारतीय शिल्पशैलीत सम्यक संमबुद्ध बहुतेकदा बसलेल्या (जसे की बोधगया येथील भूमिस्पर्श मुद्रा किंवा सारनाथ येथील (धम्म -चक्र मुद्रा), उभ्या किंवा पहुडलेल्या ( महापरिनिर्वाण मुद्रा ) स्थितीमध्ये शिल्पांकित केली जाते.
प्राचीन भारतातील ( जम्बुदिपातील) काळात तीन प्रमुख शिल्पशैल्या प्रसिद्ध पावल्या, त्यापैकी सर्वात आधी ज्यांनी सम्यक संमबुद्धांचे शिल्प निर्माण केले त्या इंडो- ग्रीक शैलीला ‘गांधार’ शिल्पशैली म्हणतात त्याच बरोबर ‘मथुरा’ शिल्पशैली प्रसिद्ध होती त्याचबरोबर अमरावती शिल्पशैली देखील प्रसिद्ध पावली होती.
पण यामध्ये कुठेही आढळून न येणारे हे शिल्प थाई शिल्पकलेमध्ये आपल्याला आढळून येते, शिल्पशैली जशी वेगवेगळी होती तसेच वेगवेगळे शिल्प घडवण्याचे त्यांचे माध्यम ही वेगळे होते, आता हे माध्यम कोणकोणते आहेत हे जर समजून घ्यायचे असेल तसेच थाई शिल्प घडवण्याचे माध्यम कोणते होते हे जर समजून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत येत्या डिसेंबरमध्ये थायलंडच्या अभ्यास दौऱ्यातून समाविष्ट व्हा.

थायलंड अभ्यास दौऱ्यात सहभाग घ्यायचा असेल तर खालील लिंक द्वारे समूहात जोडून घ्या, अधिक माहिती समूहात प्रसिद्ध केली जाईल : https://chat.whatsapp.com/FGnTawHIEZ449qRgcUwZwZ?mode=wwt

संपादन व मांडणीः सूरज रतन जगताप.  

         (बौद्ध अभ्यासक आणि सांस्कृतिक वारसा संशोधक)

.

रामराजेंचा कार्यकर्त्यांना जागे करण्याचा निर्धार: ‘सैन्यच पळपुटं निघालं तर लढाई कशी जिंकणार?’”

0
रामराजेंचा कार्यकर्त्यांना जागे करण्याचा निर्धार: ‘सैन्यच पळपुटं निघालं तर लढाई कशी जिंकणार?’”

कोळकी (ता. फलटण) :   आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकून, त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्याचा निर्धार करत, विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथे आयोजित मेळाव्यात जोरदार भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित झालेला हा मेळावा, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या पाठीमागील अनंत मंगल कार्यालयात पार पडला. बसस्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर झालेल्या या मेळाव्यास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती.

पराभवाचं आत्मपरीक्षण आणि तीव्र कानपिचक्या

रामराजेंनी सुरुवातीलाच मागील निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करत थेट कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली.
एवढी लोकं जमवता मग सीट का पडते? कार्यकर्ते आहेत, जनतेत राग नाही, मग पराभव का?” असा थेट सवाल करत त्यांनी निवडणुकीआधी विरोधकांकडून पैसे वाटले जात असताना कार्यकर्ते गप्प का राहिले, यावर ताशेरे ओढले.

तुमच्या गावात रात्रीच्या पैशाच्या गाड्या फिरत होत्या, तेव्हा तुम्ही बायकांबरोबर टीव्ही बघत होता का? पाय रोवून जर तुम्ही बाहेर पडलात असता, तर पैसे वाटप थांबलं असतं,” अशा रोखठोक शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना झापले.

“सैन्यच पळपुटं निघालं तर लढाई कशी?”

रामराजेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लढाई करायची आहे, पण सैन्यच जर पळपुटं निघालं, तर आमचं काही खरं नाही.” ही लढाई केवळ राजकीय नसून, कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची आणि सामान्य जनतेच्या शांततेने जगण्याच्या हक्काची आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बदललेल्या राजकारणावर सडकून टीका

तालुक्यातील सध्याच्या राजकारणातील बदलांवर सडकून टीका करत रामराजेंनी २०१९ नंतरचा काळ आठवला.
कॉन्ट्रॅक्टर असाल तर बिलं अडवतो, अवैध वाळूवाल्यांवर दंड, पोलिसांमार्फत दमदाटी, खोट्या केसेस – हे सगळं सुरू आहे, पण आम्ही कधीच सत्ता वापरून त्रास दिला नाही, ते आमच्यातले संस्कार नव्हते,” असे ते म्हणाले.

पक्ष नव्हे, गट महत्त्वाचा – भविष्यातील दिशेवर संकेत

आपला मूळ पक्ष अपक्ष आहे, पक्ष गौण, गट महत्त्वाचा.” असे सांगत रामराजेंनी भविष्यात कोणत्या पक्षात जाणार यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सूचित केले.
कोणत्या पक्षात जायचं, ते मी ठरवीन. मी ३० वर्षे मुंबईच्या चौपाटीवर लाटा मोजत नव्हतो,” असा टोला त्यांनी दिला.

‘गेले ते मेले’ – सोडून गेलेल्यांवर उपहास

सोडून गेलेल्यांबद्दल बोलताना, “गेले ते मेले” म्हणत त्यांनी विषयावर अधिक बोलणे टाळले. “संध्याकाळी यादी काढा, एक सणसणीत अंघोळ करा आणि ‘ओम शांती’ म्हणा,” असे सांगत त्यांनी या विषयावर फुलस्टॉप टाकला.

        विकास कामांचे श्रेय आणि तरुण पिढीवर भाष्य

निरा देवघर धरण आणि श्रीराम कारखाना यासारख्या विकास प्रकल्पांबद्दल भाष्य करत त्यांनी श्रेय घेणाऱ्यांवर टीका केली.
धरणच झालं नसतं, तर पाईपलाईन कुठून टाकली असती? दुष्काळ पाहिलेला नाही, म्हणून तरुण कालव्यात बुड्या मारतायत,” अशी टीका करत त्यांनी तरुणांना इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.

       कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

शेवटी, पाय रोवून गावात उभे राहण्याचा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांकडून घेतला. मोठ्या संख्येने हात वर करून कार्यकर्त्यांनी या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
“आपण सर्वांनी एकत्र आलो, पुन्हा मैदानात उतरणार आहोत, आणि यावेळी इतिहास घडवणार,” असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

     विशेष वैशिष्ट्ये:

  • भाषणाचा ठाम, प्रखर आणि स्फूर्तिदायक सूर
  • विरोधकांवर मुद्देसूद टीका
  • कार्यकर्त्यांना सरळपणे जबाबदारीची जाणीव
  • राजकीय दिशा अद्याप ठरवलेली नाही
  • कोळकी परिसरातील राजकीय हालचालींना गती

धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 

0



Satara Crime News : सातारा (Satara)  जिल्ह्यातील कोरेगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील जयपूर येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यामुळं जयपूर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये सोमनाथ निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. पैलवान सचिन शेलार यांनी वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैलवान सचिन शेलार यांच्या हातात रक्ताने माखलेला कोयता होता. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. यामध्ये जखमी झालेल्या सोमनाथ निकम यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर रहिमतपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या घटनेसंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Crime News: छ. संभाजीनगरमध्ये वैयक्तिक वादातून तरूणाला संपवण्याचा प्रयत्न; एकाच कुटुंबातील सदस्यांनी मध्यरात्री रस्त्यात अडवलं, डोकं जमीनीवर आपटलं अन् चाकू, तलवारीने हल्ला

आणखी वाचा



Source link

मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?

0



सातारा : कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय मी घेईल, पण अपक्ष तर आपलं मूळच आहे. मी कुठेही जाणार नाही, मी आहे त्याच पक्षात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje naik nimbalkar) यांनी जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांना इशारा दिलाय. मुंबईला जाऊन 30 वर्षे मी काही लाटा मोजल्या नाहीत. कोणत्या पक्षात जायचं त्याचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही त्याबाबत अस्वस्थ होऊ नका तुम्ही फक्त तुमचे काम कराअसे म्हणत रामराजेंनी कार्यकर्त्यांचेही कान टोचले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्याना उद्देशून भाषण केले. पुढे बोलताना ते म्हणाले, विधानसभा (Satara) निवडणूक पराभव कार्यकर्ता जागृत नसल्यामुळे झाला. निवडणुकीच्या वेळेस पैसे वाटत होते त्यावेळेस तुम्ही काय करत होता? तुम्ही त्यांना अडवला का नाही? असा जाब देखील रामराजेंनी कार्यकर्त्यांना विचारला. 

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रामराजे नाईक निंबाळकरांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. फलटणमधील अनंत मंगल कार्यालयात हा आढावा बैठकीचा कार्यक्रम पार पडला. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीमध्ये असले तरी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. 

दरम्यान, आगामी काळात कशी वाटचाल करायची याबाबत रामराजे निंबाळकर यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो पण तो विषय बाजूलाच राहिला. निवडणूक झाली निवडणूक हरलो ज्यांना जायचं होतं ते गेले. गाव पातळीवर दौरा असेल तर लोक मला भेटत असतात. कुठल्या पक्षात जायचं यामुळे एवढं अस्वस्थ व्हायचं काय कारण? आपले मूळच अपक्ष आहे, मी कुठल्या पक्षात जाणार आहे असं नाही, मी आहे तिथे थांबणार आहे, असे रामराजेंनी स्पष्ट केले.

गव्हर्नर होऊन काय करू

सारखा बोलले जाते माझं वय झालंय माझं वय झालं मी काय वय लपवायला नटी आहे का? 2020 पासून वेगळ्या पद्धतीचा राजकारण आपल्या भागात सुरू झालं आहे. प्रशासनाला हाताशी धरून वेगवेगळ्या केसेस लावण्याचा प्रयत्न केला गेला. हे लोक काय करतील हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे ही निवडणूक तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवायचे काय करायचे ते. माझ्याकडे विकासकामाची काम घेऊन कोणी येत नाही, बदली आणि पोलीस स्टेशनची काम एवढेच काम माझ्याकडे येतात. मला स्वतःला आता काही मिळवायचं नाही. देणार कोण नाही, दिलं तर गव्हर्नर करतील? गव्हर्नर होऊन जम्मू-काश्मीरचा काय करता? असा मिश्किल टोलाही रामराजेंनी लगावाला.

काँट्रॅक्टर व्हायचं त्यांनी राजकारणात येऊ नका

ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचे त्यांनी राजकारणात येऊ नका, कार्यकर्ता कार्यकर्ता  उभे करणारा पाहिजे, कार्यकर्ता कॉन्ट्रॅक्टर झाला तर मग तो सत्तेबरोबर जायला लागतो, असे म्हणत कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले. दरम्यान, कोणत्या पार्टीत जायचं हे तुम्हाला काय करायचे, मी ठरवीन. काय कुठल्या पार्टीत जायचं ते तुम्ही ठरणार आहात का? ठरवणार असेल तर सांगा, त्यावर आपण मतदान घेऊ बघूया एक मत होते का? काय करायचं हे मला कळते. तीस वर्षे मुंबईला काय समुद्राच्या कडेला बसून लाटा मोजत बसलो नाही, असेही रामराजेंनी म्हटलं.

हेही वाचा

Video: 24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले…

आणखी वाचा



Source link

बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य

0



सातारा : राज्यातील काही जिल्ह्यात बिबट्या (Leopard) या वन्य प्राण्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्री कुणाच्या घरात, तर दिवसाच कुणाच्या तरी बांधावर बिबट्याचा वावर गेल्या काही महिन्यात दिसून आलाय. त्यामुळे, ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. सोलापूर, धाराशिव, सातारा, नाशिक, पुणे जिल्ह्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सातारा (Satara) वन विभागाने एक आयडिया लढवली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळला जावा या हेतूने सातारा वन विभागाने कराड तालुक्यातील उंडाळे येथे ए.आय. लेफर्ड डीटेक्शन सिस्टिम बसवली आहे. 

वन विभागाने कराड तालुक्यात बसवलेल्या ए.आय. सिस्टीममुळे बिबट्या आला की 120 डेसिबलचा सायरन वाजणार आहे. त्यामुळे, आता गावातील लोकांना बिबट्या नेमका कुठे आहे? हे कळणार असून सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. कराड तालुक्यातील उंडाळे गावासह परिसरात बिबट्यासह वन्य प्राण्याचा वावर वारंवार दिसून येत आहे. शेतकऱ्यांसह शाळा कॉलेजच्या मुलांचा वावर जास्त असलेल्या क्षेत्रामध्ये वनविभागाने ए.आय. लेफर्ड सिस्टम लोकांच्या मागणीवरून बसवली आहे. गेल्या दीड वर्षात बिबट्याने अनेकांवर हल्ले केलेबाहेत. आता बिबट्या आल्याचे समजणार असल्याने ग्रामस्थांसाठी ही आनंदाची बातमी आहे, असे येथील गावचे उपसरपंच बापुराव पाटील यांनी म्हटले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात 2 चिमकुल्यांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 लहानग्या मुलांचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडल्या आहेत. बिबट्याने घराच्या ओट्यावरून हल्ला करून उचलून नेलेल्या चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह तब्बल 19 तासांच्या शोधकार्यानंतर सापडला. महिनाभरात दोन बालकांचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. अवघ्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर नावाच्या चिमुकल्याला त्याच्या घराच्या ओट्यावरून नरभक्षक बिबट्याने हल्ला करून उचलून नेले होते. या घटनेने संपूर्ण वडनेर परिसरात भीती आणि दहशत पसरली आहे. लष्कराचे जवान आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्रुतिकचा शोध घेतला जात होता.

हेही वाचा

ते तुम्ही केलंय, अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र

आणखी वाचा



Source link

ज्याला राजकारण करायचंय त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका, ज्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकार

0



Ajit Pawar in Phalthan speech: सरकारी विकासकामे करताना कॉन्ट्रॅक्टर चांगला असेल तर काम चांगले होते. जर कॉन्ट्रॅक्टर खराब असेल तर सरकारला पण त्रास होतो, अनेक कामं रेंगाळत राहतात. त्यामुळे ज्याला राजकारण करायचंय त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका अन् ज्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नका, हा माझा कटाक्ष असतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते शनिवारी फलटण (Phalthan) येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करुन हशा पिकवला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांच्या काही मागण्या ऐकून अजित पवार यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. 

यावेळी काही ग्रामस्थांनी गावातील वादांचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामपंचायतीकडून विरोधकांची अडवणूक केली जाते, अशी तक्रार त्यांनी अजितदादांकडे केली. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, ग्रामपंचायतीमधील लोक तुम्ही निवडून दिले आहेत. विकासकामांसाठी पैसे देणे माझे काम आहे. गावातील वाद हे थोरामोठ्यांनी एकत्र बसून आणि चर्चा करुन इथल्या लोकांनीच सोडवले पाहिजेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मी तुम्हाला अमुकतमुक माणसाला निवडून आणायला बटन दाबायला सांगितले होते का? आता पायताण घ्या आणि माझ्या डोक्यात टाका, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

तुमच्या इथं कंपन्या आहेत त्यांचा टॅक्स जरा वाढवा. तुम्हाला फक्त 20 लाख टॅक्स मिळतोय. तुमचा धंदापाणी नीट करा. गावात एकोपा ठेवा, जातीय सलोखा ठेवा, जातीय वादातून कोणाचं भलं झालं नाही. बारामती ॲग्रो तर फक्त साडेतीन लाख रुपये टॅक्स देते. वाढवा जरा, तेव्हाचा काळ वेगळा होता आताचा वेगळा आहे. डिस्टलरी मालकांना सांगा दादांनी आवाहन केलं आहे असे सांगा, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच आगामी काळात शेतीमध्ये एआयचा वापर करण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली. आमच्या शेतामधून आतापर्यंत 60-70 टन उस निघायचा. एआयचा वापर करुन तेच उत्पादन आता 100 टनापर्यंत जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून 18 हजार रुपये दिले जात आहेत. मात्र, आगामी काळात हे पैसे कृषी विभाग कडून देण्याचा विचार सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar news: ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून अजितदादांनी डोक्यावर हात मारुन घेतला

अजित पवार यांच्या या भाषणावेळी अनेक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाले. अजित पवार यांनी फलटणमधील विकासकामांच्या योगदानाचा उल्लेख करताना काही जणांची नावे घेतली. त्यावेळी समोरच्या प्रेक्षकांमधून एकजण उठला आणि त्याने तुम्ही साडेतीन वर्षे सरपंच राहिलेल्या व्यक्तीचे नाव घेतले नाही, अशी तक्रार केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, मी इथं लोकांची नावं घ्यायला आलोय की काम करायला आलोय. मी कधी बायकोचं नाव घेतलं नाही. इथे मी उखाणे घ्यायला आलो आहे का? तुम्ही डोक्यावर पडलात का तुम्ही, असा सवाल अजित पवारांनी समोरच्या व्यक्तीला विचारला.

यानंतर अजित पवार यांनी बारामतीपर्यंत जाणारे रस्ते कसे चांगले केले आहेत, याचा उल्लेख केला. त्यावेळी एका माणसाने अजित पवारांना सूचना केली की, ‘दादा रस्त्यावरील डिव्हायडर थोडे मोठे करा. कुत्री उडी मारुन गाडीसमोर येतात. त्यावेळी अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले की, ‘मी कुत्र्यांना सांगतो उडी मारु नका’. त्यांच्या या वक्तव्यावर हशा पिकला.अजित पवार निघत असताना एका व्यक्तीने म्हटले की, दादा आमच्या फलटणला पदरात घ्या. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘आता माझा पदर फाटलाय.’ यानंतर अजित पवार यांनी फलटणमधील विकासकामांकडे लक्ष देण्याचे आश्वासनही दिले. 

Mumbai News: मुंबईत महिलांसाठी 194 कोटीच्या मॉलचे काम सुरु: अजित पवार

मुंबईत 194 कोटीच्या मॉलचे काम सध्या सुरू आहे. महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याची विक्री त्या ठिकाणी होणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात 15 कोटींचा मॉल बनवणार आहोत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी देखील बनवणार आहे. मला आता इथं निधी मागितला तुमची तुम्हीच काम करून घ्या. या योजनेतून सगळीच काम होतील. त्या योजनेचा फायदा घ्या. आता मोटरसायकल असेल तरी त्याला घर दिले जाणार आहे. आतापर्यंत 44 लाख घर आपण मंजूर केले आहेत. मागच्या आणि आताची धरून राज्य बँकेंना पूरग्रस्तांना दहा कोटी रुपये दिले. त्याचेच आमच्यावरती आरोप होत आहेत. आरोप करणारे करत असतात. पण त्या बँकेने दहा कोटी रुपये दिले, असे अजित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

औंधच्या राणीसाहेबांनी म्यानातून तलवार उपसली, हवेत नाचवली, अजित पवार बघतच बसले

आणखी वाचा



Source link