Monday, July 6, 2026
Home Blog Page 119

तुमचा ब्रश स्वच्छ आहे का? ब्रशमध्ये 125000000 बॅक्टेरिया अन् बुरशी… संशोधनात खुलासा

0
तुमचा ब्रश स्वच्छ आहे का? ब्रशमध्ये 125000000 बॅक्टेरिया अन् बुरशी… संशोधनात खुलासा


Daily Toothbrush : तुम्ही कदाचित हा प्रश्न ऐकला असेल की, तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, टूथब्रशमध्ये बॅक्टेरिया आहेत का? तर एका संशोधनात या प्रश्नाच्या उत्तराचा खुलासा झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तुम्हाला वाटेल की दररोज सकाळी दात घासल्याने तुमच्या तोंडातील जंतू मरतात आणि ते नष्ट होतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची ओरल हेल्थ सांभाळत आहात. पण तुम्ही 100% चुकीचे आहात. तुमच्या ब्रशमधूनच पोटात बॅक्टेरिया जात आहेत. 

संशोधनातून असे दिसून आले आहे की तुमच्या टूथब्रशमध्ये लाखो बॅक्टेरिया असतात. तुमच्या टूथब्रशमध्ये 10 लाख ते १२५ दशलक्ष विविध प्रजातींचे बॅक्टेरिया आणि बुरशी असतात. अनेक बॅक्टेरिया जुन्या ब्रिसल्सच्या भेगांमध्ये प्रवेश करतात आणि हे बॅक्टेरिया पाण्याने धुवून काढून टाकले जात नाहीत.

जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा हे सर्व बॅक्टेरिया तुमच्या तोंडात प्रवेश करतात. दिवसातून दोनदा ब्रश करणाऱ्या लोकांना दिवसातून दोनदा या बॅक्टेरियांचा सामना करावा लागतो. टूथब्रशच्या रोजच्या ओल्यापणामुळे त्यात बॅक्टेरिया वाढतात. म्हणून, तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की दररोज नवीन टूथब्रश खरेदी करणे ही चांगली कल्पना आहे का? पण हा त्यावर उपाय नाही?

संशोधनात काय उघड?

ब्राझीलमध्ये केलेल्या एका अभ्यासात वेगवेगळ्या कंपन्यांकडून खरेदी केलेल्या 40 नवीन टूथब्रशची तपासणी करण्यात आली. निकालांमध्ये असे आढळून आले की, त्यापैकी निम्मे आधीच विविध प्रकारच्या बॅक्टेरियांनी संक्रमित होते. जर नवीन आणि जुने दोन्ही टूथब्रश बॅक्टेरियांनी संक्रमित असतील तर काय करावे? हे संशोधन बॅक्टेरियापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय सुचवते.

यावर उपाय काय?

संशोधकांचा असा सल्ला आहे की एक टक्के व्हिनेगर बॅक्टेरिया कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असू शकतो. यामुळे ब्रश करताना वेगळी चव लागते., जी पुढच्या वेळी तुम्ही ब्रश करता तेव्हा विचित्र वाटू शकते. ब्रशचे डोके अँटीसेप्टिक माउथवॉशमध्ये पाच ते दहा मिनिटे भिजवणे हा देखील चांगला उपाय आहे. अमेरिकन डेंटल असोसिएशनसारख्या संस्था दर तीन महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदलण्याची शिफारस करतात.

म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला विचारेल की तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का, तेव्हा तुम्ही त्यांना “तुमच्या टूथब्रशमध्ये बॅक्टेरिया आहेत का?” असे विचारू शकता.

FAQ

दात घासण्याच्या ब्रशवर किती जीवाणू असतात?
दात घासण्याच्या ब्रशवर 1 ते 12 दशलक्ष जीवाणू आणि बुरशीच्या प्रजाती असू शकतात, ज्यात शेकडो वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश असतो. याशिवाय विषाणूही असू शकतात. नवीन ब्रशवरही अर्धे ब्रश दूषित असू शकतात. 

ब्रशवर जीवाणू कसे येतात?
जीवाणू मुख्यतः तोंड, त्वचा आणि पर्यावरणातून येतात. टॉयलेट फ्लश करताना निर्माण होणाऱ्या धुकेमुळे (टॉयलेट प्ल्यूम) मलाविषयी जीवाणू ब्रशपर्यंत पोहोचू शकतात, जे 1.5 मीटरपर्यंत फवारले जाते. शेअर केलेल्या बाथरूममध्ये क्रॉस-कंटॅमिनेशन होऊ शकते. पाणी, हात आणि आर्द्रता देखील कारणीभूत असतात. ब्रश १२ आठवड्यांनंतर जीवाणूंची संख्या वाढते. 

 हे जीवाणू हानिकारक आहेत का?
बहुतेक जीवाणू निर्दोष किंवा फायदेशीर असतात, जे दात सडण्यापासून वाचवतात. मात्र, काही जसे E. coli (डायरिया होऊ शकते), Staphylococci (त्वचेची संसर्ग), Pseudomonas aeruginosa किंवा Candida यामुळे दात सडणे, मज्जासंस्थेची जळजळ, पोटाचे आजार किंवा थ्रश होऊ शकते. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांसाठी धोका जास्त. विषाणू जसे फ्लू किंवा हर्पीस 48 तासपर्यंत टिकू शकतात. सामान्यतः निरोगी व्यक्तींना धोका कमी असतो. 





Source link

फलटण तालुक्यात रस्ते विकासाला गती – हिंगणगाव आणि तारडगाव रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

0
फलटण तालुक्यात रस्ते विकासाला गती – हिंगणगाव आणि तारडगाव रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

फलटण (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील रस्ते विकासाच्या कामांना वेग येत असून हिंगणगाव आणि तारडगाव परिसरातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांचे भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या दोन्ही रस्त्यांसाठी एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.हिंगणगाव-अदर्की बू ते हिंगणगाव पांढरेची वस्ती रस्ता – 5 कोटी रुपये तारडगाव ते सुळ वस्ती रस्ता – 5 कोटी रुपये या कामांना आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “तालुक्यात सर्वत्र दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. या कामांसाठी आवश्यक निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल.”

    कार्यक्रमास युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, विलासराव नलवडे, भाजप तालुका अध्यक्ष अमित रणवरे, राजाभाऊ काकडे, किरण जाधव, सुरेश भोईटे, अतुल गायकवाड, आदित्य गायकवाड, प्रशांत गायकवाड, रमेश भोईटे, शुभम नलवडे, सचिन पोळ, संतोष सुळ, बापू निंबाळकर, दत्तराज नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भूमिपूजन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    एन. रघुरामन यांचा कॉलम: सक्षम नातेसंबंधासह पर्यायी घरांचा वृद्धांना आधार मिळावा

    0
    एन. रघुरामन यांचा कॉलम:  सक्षम नातेसंबंधासह पर्यायी घरांचा वृद्धांना आधार मिळावा


    • Marathi News
    • Opinion
    • Column By N. Raghuram, Elderly Should Get Support From Alternative Housing With Capable Relationships

    8 तासांपूर्वी

    • कॉपी लिंक

    लोक जास्त काळ जगत आहेत आणि कसे आणि कुठे राहायचे याचा ते विचार करत आहे. चेन्नईचे ८९ वर्षीय जे. नारायणन हेही त्याला अपवाद नाहीत. त्यांनी १५ वर्षांपूर्वी हा विचार केला होता, जेव्हा त्यांच्या पत्नीला (आता ८४ वर्षांची) आजारपणामुळे चालता- फिरता येत नव्हते. त्यावेळी त्यांना आपल्या माेठ्या घरात एकटे राहायचे नव्हते. म्हणून ते चेन्नईच्या एका आलिशान भागात एका नातेवाईकाच्या बंगल्यात राहायला गेले, तिथे आरोग्य सेवा जवळ होत्या. ते दुसऱ्या माळ्यावर राहत होते. तिथे

    चार बेडरूम, एक स्वयंपाकघर आणि एक दिवाणखाना होता. यामुळे त्यांना एकांत मिळाला. घरगुती मदतीसाठी जागा मिळाली आणि आपत्कालीन परिस्थितीत तिथे नातेवाईक येऊ शकत हाेते. त्यांची मुलगी विवाहित आहे आणि त्यांचा मुलगा परदेशात राहतो आणि घराचा खर्च भागवतो.

    वृद्धावस्थेत बहुतेक लोक स्वतःच्या घरात राहू इच्छितात. आज, वाढत्या देखभाल खर्चामुळे नाही तर आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना घरात राहणे कठीण होत आहे. ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता आहे ते दैनंदिन कामांसाठी मदतनिस नियुक्त करत आहेत. उर्वरित लोक घरांचे पर्याय शोधत आहेत. हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉइंट सेंटर फॉर हाऊसिंगच्या स्टडीजनुसार, २०२३ मध्ये ९,९०,००० अमेरिकन लोक मदतनिसासह किंवा नातेवाईक नसलेल्या व्यक्तीसोबत राहत होते. त्यात २०२१ च्या तुलनेत ही वाढ ८.८% आहे. वृद्धत्वाच्या आरोग्य आव्हानांमध्ये आणि दीर्घायुष्याच्या विरोधाभासात, मुंबईतील विकासक आरोग्य सुविधांजवळ आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या आंतरपिढीय गृहसंकुलांची उभारणी करत आहेत. हे विकासक दोन फायदे देताहेत. त्याच कॉलनीतील एका शेजारच्या इमारतीत तरुणांना राहण्याची सोय आहे आणि समवयस्कांसोबत वेळ घालवण्यासाठी एक उद्यान आहे. एका रिअल इस्टेट कंपनीने १०० एकरची टाउनशिप सुरू केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या ४५ टॉवरपैकी दोन वृद्धांसाठी समर्पित आहेत. या इमारतींमध्ये सर्व्हिस्ड अपार्टमेंटसारखेच फायदे असतील, ज्यामध्ये समर्पित हाऊसकीपिंगचा समावेश असेल. इमारतींमध्ये मोठे व्हीलचेअर-फ्रेंडली दरवाजे आणि जखमा टाळण्यासाठी गोलाकार भिंतीच्या कडा असतील. घरी शिजवलेले जेवण देखील घरात किंवा कम्युनिटी हॉलमध्ये उपलब्ध असेल. विकासक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गावी आपलेपणाची भावना देऊ इच्छितात. पाश्चात्य देशांमध्ये, २०% गृहनिर्माण बाजारपेठ ज्येष्ठ नागरिकांना पुरवली जाते.वृद्धांना परवडणारी आणि आरामदायी घरे उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित गृहनिर्माण धोरण २०२५ मध्ये कर कपात प्रस्तावित आहे. ५-७% स्टॅम्प ड्युटी भरण्याऐवजी, ज्येष्ठांना निवासी गृहनिर्माण सुविधा खरेदी करताना फक्त १,००० रुपये भरावे लागतील. मुंबईत अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांची मुले त्यांच्यापासून दूर राहतात. माझे सहकारी विजय शंकर मेहता यांच्या मते, अनेक श्रीमंत बेबी बूमर्स (१९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले) सहा चुका करतात. ते म्हणतात की, लोक कामात “व्यस्त’ असतात, लोक ‘आनंदी’ जीवन जगतात, नंतर म्हातारपण आणि दूरच्या नात्यांमुळे ‘त्रस्त’ होतात, म्हणून ते त्यापैकी काहींना टाळू लागतात, तंत्रज्ञानात रमलेली लोकसंख्या ‘आळशी’ होते आणि अखेर काही नाती ‘नष्ट’ होतात. पण नारायणन यांच्या सारख्या लोकांनी दोन्ही गोष्टी सांभाळल्या, अनेक लोकांशी संबंध राखले आणि योग्य वेळी “पर्यायी निवासस्थान” शोधले. हे आता पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि मुंबईसारख्या शहरांमध्येही त्याची सुरुवात झाली आहे. २०३० नंतर, वृद्धांची संख्या वाढणार असल्याने जगासमोर आणखी पर्याय उपलब्ध असतील. नारायणन यांच्या प्रमाणे, तुमच्या शहरात राहण्यासाठी ते खूप महाग होण्यापूर्वी लवकरात लवकर पावले उचला.



    Source link

    भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेतर्फे नवनिर्वाचित महिला अध्यक्षा आयु. रंजना राजकुमार रणवरे यांचा सन्मान

    0
    भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेतर्फे नवनिर्वाचित महिला अध्यक्षा आयु. रंजना राजकुमार रणवरे यांचा सन्मान

    फलटण (ता. फलटण):भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सातारा पूर्व अंतर्गत फलटण तालुका महिला कार्यकारिणीचे गठण महाराष्ट्र राज्य महिला संघटिका व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आयुनी. राजश्रीताई सरावदे, जिल्हाध्यक्षा आयुनी. सुजाता गायकवाड आणि जिल्हा शाखा सातारा पूर्व अध्यक्ष आयु. नानासाहेब मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.

    या निवड प्रक्रियेदरम्यान फलटण तालुका शाखेचे पदाधिकारी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे पार पडलेल्या पूज्य भंते करूणानंद थेरो यांच्या महाथेरो सन्मान व कठीण चिवरदान धम्मसोहळ्यात उपस्थित असल्याने त्या वेळी अनुपस्थित होते. पूर्व सूचना देऊन नियोजित निवड प्रक्रिया झाली असती तर आनंदच झाला असता.पण असो भारतीय बौद्ध महासभा व्यक्ती पेक्षा धम्माला सर्वोच्च स्थानी मानते. त्यामुळे या निवड प्रक्रियेचे आम्ही स्वागत करतो. छ. संभाजी नगर येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते होते.त्यामुळे फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि बौद्ध उपासक – उपासिका यांनी या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. आणि या धम्म सहलीत सर्वजण सहभागी झाले.

    धम्म सहलीहून परतल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित महिला अध्यक्षा आयु. रंजना राजकुमार रणवरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मान सोहळा आयोजित केला. त्यांना पुष्पगुच्छ, शॉल, धम्मध्वज आणि धम्मपट्टी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नव्या महिला कार्यकारिणीतील सरचिटणीस आयु. रुक्षलाताई भोसले, कोषाध्यक्षा आयु. वृषालीताई झेंडे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील धम्मप्रचार कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

    अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी आपले विचार मांडताना सांगितले –
    “धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबात धम्माचे मूल्य आणि सम्यक विचार रुजतात. रणवरे कुटुंबाचे योगदान चळवळीशी पूर्वीपासून निगडित असून त्यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका शाखा निश्चितच अधिक सक्षम बनेल. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आपल्या संपूर्ण महिला कार्यकारिणीला सहकार्य राहील. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कार्यकारणीला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

    राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी सांगितले –
    “आयु. रंजना रणवरे या धम्मनिष्ठ, समर्पित व कार्यक्षम कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे फलटण तालुक्यात बौद्ध धम्माच्या प्रचार–प्रसाराला नवे बळ मिळेल. रणवरे कुटुंब तन, मन, धनाने चळवळीला सदैव सहकार्य करीत राहील.”

    आपल्या सत्काराला उत्तर देताना आयु. रंजना रणवरे म्हणाल्या –
    “फलटण तालुका महिला शाखेच्या माध्यमातून महिलांना चळवळीतील ‘धम्मदूत’ म्हणून सक्रिय करण्याचा मी संकल्प व्यक्त करते. धम्म, शिक्षण, समता आणि संघटन या चार स्तंभांवर आधारित कार्य अधिक दृढ करण्याचा माझा निर्धार आहे. मी अध्यक्ष झाले असले तरी आपण सर्वजण समान आहोत; एकत्रितपणे धर्माचा प्रचार–प्रसार करूया. माझ्या कुटुंबाचा हेतू कोणत्याही स्वरूपाचा मोठेपणा मिरवणे हा नसून धम्म कार्याला गतिमान करण्याचा विचार आहे. तेव्हा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेची मला मदत निश्चितच त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडेल.”

    या प्रसंगी प्रमुख उपस्थिती आयु. दादासाहेब भोसले सर(राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल), आयु. महावीर भालेराव सर(तालुकाध्यक्ष, भा.बौ.म. शाखा फलटण), आयु. बाबासाहेब जगताप सर (महासचिव), आयु. विठ्ठल निकाळजे सर (कोषाध्यक्ष), आयु. रामचंद्र मोरे सर (प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष), आयु. बजीरंग गायकवाड सर (संस्कार सचिव), ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण निकाळजे सर, प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे सर, संघटक आयु.आनंद जगताप सर, राजकुमार रणवरे सर, बनसोडे साहेब व रणवरे कुटुंबीय उपस्थित होते.
    या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका शाखेचे संस्कार सचिव आयु.बजीरंग गायकवाड यांनी केले.

    फलटण तालुका शाखेच्या वतीने महिलांना “धम्मदूत” म्हणून सक्रिय करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. महिला कार्यकारिणीच्या माध्यमातून धम्म, शिक्षण, समता आणि संघटन या चार स्तंभांवर आधारित कार्य पुढे नेण्याचा निर्धार भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने या प्रसंगी घेण्यात आला.

    आभाळात दिसला ‘एलियन’? भारतावर हे कोणतं सावट की आणखी काही….

    0
    आभाळात दिसला ‘एलियन’? भारतावर हे कोणतं सावट की आणखी काही….


    Science News : अवकाशाबाबतची कैक गुपितं अशी आहेत, जी कायमच संशोधकांसह सामान्यांचंही कुतूहल चाळवून जातात. अशाच एका कुतूहलाचा प्रत्यय नुकताच भारतात आला असून, जी घटना घडून गेली आहे ती पाहता प्रत्येकजण भारावला आहे. भारतात एक अशी आश्चर्यकारक जागा आहे, जिथं जगातील सर्वाधिक उंचीवर असणारी एक खगोलशास्त्र संस्था असून, तिथं एक असं दृश्य पाहायला मिळालं, जे सहजासहजी दिसत नाही. किंबहुना या दृश्यानं अनेकांना धडकीसुद्धा भरली. 

    Add Zee News as a Preferred Source

    शास्त्रीय भाषेनुसार लडाखच्या हान्ले इथं आभाळातून एक अनपेक्षित दृश्य दिसलं, ज्यामध्ये धूमकेतु लेमन(Comet Lemmon) आकाशगंगेच्या मागे लकाकत असल्याचं दिसून आलं. Indian Astronomical Observatoryचे प्रभारी शास्त्रज्ञ आणि खगोल छायाचित्रकार दोर्जे अंगचुक यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं, ज्यानंतर सोशल मीडियावर या दृश्यांनी अनेकांचच लक्ष वेधलं. काहींना आभाळात दिसलेली ती गोष्ट एलियन वाटली, तर काहींना उगाचच चिंता वाटली. मात्र तो एलियन नसून, होता एक धुमकेतू. 

    हान्लेच्या विस्तीर्ण पठारी भागातून टीपण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये लेमन नावाचा धूमकेतू, Milky Way तून पुढे लकाकत जाताना दिसत आहे. हे दृश्य इतकं अप्रतिम आहे, की पाहणाऱ्यांची नजर त्यावरून हटक नाहीये. भारतातील किंबहुना जगातील सर्वात सुरक्षित आणि प्रदूषणविरहित अशा आकाशाचं हे ठिकाण जगभरातील खगोल अभ्यासकांसाठी एक आकर्षणाचं केंद्रस्थान आहे. सदर क्षेत्रातील जाणकारांनी भारतावरून गेलेल्या या धूमकेतूला  C/2023 A3 असं नाव दिलं असून, या महिन्यात तो पृथ्वीच्या बराच जवळ असल्याचं म्हटलं गेलं. 

     

    अंगचुक यांनी याबाबत दिलेल्या सविस्तर माहितीनुसार हान्लेच्या निरभ्र आकाशात धुमकेतूला त्याचा उजेड वाढच्या लोकसंख्येमुळं फार काळ टीकवता येणार नाही. हा धुमकेतू माऊंट लेमन सर्वेक्षणादरम्यान प्रथमत: दिसला होता. ज्यानंतर आता तो हान्लेमध्ये आकाशगंगेखाली दिसणं ही एक अतिशय महत्त्वाची बाब ठरत आहे. दरम्यान हान्ले मागील काही वर्षांमध्ये खगोलशास्त्र आणि त्यासंदर्भातील अनेक गोष्टींमुळं प्रकाशझोतात आलं असून पर्यटकांचाही ओघ इथं वाढत आहे. त्यामुळं येथील निरभ्र आकाश आणि अंधाऱ्या रात्रींमध्ये व्यत्यय येत असून, काही प्रसंगी आकाशगंगाही दिसत नाहीत, हे वास्तवसुद्धा नाकारता येत नाही. 

    FAQ

    हान्ले, लडाख येथे कोणत्या धूमकेतूचे दर्शन झाले?
    लडाखच्या हान्ले येथे धूमकेतु लेमन (Comet Lemmon) चे अप्रतिम दर्शन झाले. हे दृश्य आकाशगंगेच्या (Milky Way) मागे लकाकत जात असतानाचे दिसले, ज्यामुळे अनेकजण भारावले. हे दृश्य सहजासहजी दिसत नाही आणि त्याने सामान्यांसह संशोधकांचे कुतूहल वाढवले.

    हे दृश्य कोणी कॅप्चर केले आणि कसे?
    भारतीय खगोल वेधशाळेचे (Indian Astronomical Observatory) प्रभारी शास्त्रज्ञ आणि खगोल छायाचित्रकार दोर्जे अंगचुक (Dorje Angchuk) यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केले. 

    हान्ले ही जागा का खास आहे?
    हान्ले ही जगातील सर्वाधिक उंचीवर (4500 मीटर) असलेली खगोलशास्त्र संस्था असलेली जागा आहे. येथील आकाश प्रदूषणविरहित आणि निरभ्र असल्याने ते जगभरातील खगोल अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. 





    Source link

    भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने धम्म सहलीचे यशस्वी आयोजन

    0
    भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने धम्म सहलीचे यशस्वी आयोजन


    फलटण : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) शाखा फलटण तालुका
    यांच्या वतीने एकूण ४० बौद्ध उपासक -उपासिका व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दि. 19 व 20 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज नगर येथे प्रचार व पर्यटन विभाग शाखा फलटण तालुका यांच्यावतीने धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी ‘धम्माचल’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम
    अजिंठा लेणी फर्दापुर तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम धम्माचल चे सभासद भंते बोधिधम्मा यांनी सर्व बौद्ध उपासक उपासिका व पदाधिकाऱ्यांना त्रिसरण पंचशील दिले. सर्वांनी तिथे भेट दिली. त्यांच्या धम्म कार्याला शुभेच्छा दिल्या.
    जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेल्या अजंठा लेण्यांना भेट देऊन महायान आणि हीनयान परंपरेतील बौद्ध लेण्यांचा इतिहास, कलात्मकता व धम्म संदेश समजून घेतला. या ऐतिहासिक स्थळाने बौद्ध धर्माच्या महान परंपरेची पुनःप्रत्ययाने आठवण करून दिली. अजंठा लेणी इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते इ.स. सहाव्या शतकापर्यंत या लेण्या कोरल्या गेल्या. एकूण ३० लेण्या आहेत. त्यापैकी काही हीनयान (प्रारंभीची परंपरा) आणि काही महायान (उत्तरकालीन परंपरा) शैलीतील आहेत. हीनयान परंपरेतील लेणींमध्ये बुद्धाची प्रतिमा नसून धम्मचक्र, कमळ, रिकामा सिंहासन, बोधिवृक्ष अशा प्रतीकांद्वारे बुद्धत्वाचे दर्शन घडते.या काळातील लेण्या साध्या, ध्यानमय आणि साधना केंद्रित आहेत.महायान परंपरेतील लेणींमध्ये बुद्धाची मूर्ती, बोधिसत्वांची शिल्पे व भित्तिचित्रे दिसतात.
    या काळात बुद्ध मानवी रूपात दाखवले जातात. लेणी क्रमांक १, २, १६, १७, १९ आणि २६ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांमध्ये जगताचा त्याग, ज्ञानप्राप्ती, करुणा व प्रज्ञेचा संदेश दिसतो. भित्तिचित्रांमध्ये जातक कथा, बुद्धांचे जीवन प्रसंग, तसेच समाजजीवनाचे सुंदर दर्शन घडले. या चित्रांतून भारतीय कला, अध्यात्म आणि मानवी मूल्यांची गहन सांगड दिसून येते.
    पूज्य भिक्खू करुणानंद यांचा ‘महाथेरो’ समारंभ तसेच कठिण ‘चिवरदान’ धम्म सोहळ्यास उपस्थित राहून हा संपूर्ण सोहळा पाहिला. यावेळी पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात येण्याची भावना व्यक्त केली. त्यांनी सर्व तालुक्यातील पदाधिकारी व उपासक-उपासिका यांना आशीर्वाद दिले. सर्वांच्या प्रति मंगल मैत्रीची भावना व्यक्त केली. लवकरच सातारा जिल्ह्यामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांना शुभेच्छा दिल्या व यावेळी बोलताना त्यांनी बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासंदर्भात आपली भूमिका मांडली. संपूर्ण देशभर सुरू असणाऱ्या आंदोलनाविषयी व धम्मकार्याविषयी त्यांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची भावना व्यक्त केली.
    दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी वेरूळ येथील लेण्यांना भेट देऊन बौद्ध, जैन आणि हिंदू परंपरेतील अद्भुत शिल्पकलेचा संगम अनुभवला. धम्म, कला आणि इतिहास यांचा अनोखा मिलाफ येथे दिसून आला. बौद्ध आणि कैलास लेणी भारतीय वारशाचे दोन अद्भुत अध्याय सर्व पदाधिकारी व उपासक – उपासिका यांनी औरंगाबाद येथील एलोरा लेणी परिसरात भेट देऊन धम्म,कला व इतिहासाचा थेट अनुभव घेतला.
    वेरूळ येथील लेणी क्र 16 कैलास लेणी व एकूण १२ बौद्ध लेण्या (१–१२ क्रमांक) विहार व चैत्यगृह स्वरूपात पहायला मिळाले. महायान परंपरेचे दर्शन, ध्यानस्थ बुद्ध, बोधिसत्त्वांच्या मूर्ती. विशेष प्रसिद्ध असलेली विश्वकर्मा लेणी (लेणी क्र. १०)लाकडी तुळईसारखी छताची नक्षी आणि ध्यानस्थ बुद्धमूर्ती. संघजीवनाचे दर्शन, अभ्यास, ध्यान व उपासनेसाठी रचना प्रत्यक्ष पाहण्यासाठी यावेळी इ.स.५व्या ते ७व्या शतकातील कलात्मक वारसा पाण्याची संधी या धम्म सहलीच्या माध्यमातून मिळाली. यावेळी प्रसिद्ध असलेल्या लेणी क्र. 10 ‘विश्वकर्मा लेणी’ म्हणून ओळखले जाते. या लेणीमध्ये त्रिसरण,पंचशील, बुद्ध पूजा, भिमस्मरण, भीम स्तुती सामुदायिक रित्या भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासिका यांनी घेतली. यावेळी थाई भिक्खू यांना वंदन केले.

    बिबी का मकबरा हे एक सुंदर ऐतिहासिक स्मारक आहे. याला “दख्खनचा ताजमहल” असेही म्हटले जाते.याला भेट देण्यात आली.
    धम्म सहलीच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी, उपासक – उपासिका यांनी आज औरंगाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी निगडित ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रवेशकमान : या कमानी खाली उभं राहून सर्वांनी विद्यापीठाच्या नामांतर लढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेतली. हा लढा आंबेडकर विचारांवरील श्रद्धेचा आणि सामाजिक न्यायाचा प्रतीक ठरला.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्मारक : येथे सर्वांनी नमन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. स्मारकातील छायाचित्रे व माहिती फलकातून त्यांच्या शिक्षण, संघर्ष आणि संविधान निर्मितीतील योगदान समजावून घेतले.
    मिलिंद महाविद्यालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाला भेट दिली. हे शैक्षणिक संस्थान प्रत्यक्ष पाहून सर्वांनी “शिक्षण हेच खरे शस्त्र” या संदेशाची प्रेरणा घेतली.
    नागसेन वन : या बौद्ध पवित्र स्थळी सर्वांनी शांत वातावरणात त्रिसरण – पंचशील घेत ध्यान केले व बुद्ध, धम्म आणि संघ यांना अभिवादन केले. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या बोधिवृक्षालाही वंदन केले. त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेल्या बुद्ध रूपाची माहिती संकलित केली व बुद्धरुपाला पंचांग प्रणाम करून वंदन केले.या संपूर्ण भेटीद्वारे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक – उपासिका यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, बौद्ध संस्कृतीचे वारसास्थळ आणि शिक्षण – धम्म यांची प्रेरणा अनुभवली.

    या धम्म सहलीतील प्रमुख उपस्थिती आयु. दादासाहेब भोसले साहेब – राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल असिस्टंट स्टाफ ऑफिसर, आयु. महावीर भालेराव सर – तालुकाध्यक्ष, भा.बौ.म. फलटण, आयु. बाबासाहेब जगताप सर, महासचिव, भा.बौ.म. शाखा फलटण, आयु. विठ्ठल निकाळजे सर – कोषाध्यक्ष, भा.बौ.म. शाखा फलटण, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, संस्कार सचिव आयु.बजीरंग गायकवाड सर, आयु.अमोल भोसले सर, प्रचार पर्यटन सचिव आयु.अमोल काकडे, बौद्ध उपासक रमेश भोसले, तालुका संघटक आयु.अरविंद निकाळजे सर, माण तालुका भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आयु.आबा भोसले, धम्म उपासक अजय निकाळजे, कनिष्क घोरपडे, उपासिका चित्राताई गायकवाड मॅडम, सुवर्णप्रभा महादेव मोरे मॅडम,आयुनी कल्पना भालेराव मॅडम, आयुनी पारिजातका जगताप मॅडम, आयुनी विशाखा कीर्तावडे मॅडम, आयुनी अश्विनी मोरे मॅडम, आयुनी भाग्यश्री गायकवाड मॅडम, आयुनी उमिता अमोल भोसले,आयुनी सुषमा रमेश भोसले, प्रतिक अमोल भोसले,अनुष्का अमोल भोसले, रोनित रमेश भोसले, आयुनी योगिता घोरपडे, अंजली भोसले, समिधा घोरपडे, निलाक्षी जगताप, तनिष्का जगताप, आयुष गायकवाड, आरोही गायकवाड, आरोही मोरे, अपेक्षा मोरे, अनुष्का भोसले, रोनित भोसले,ज्योती अमोल काकडे, श्रुती अमोल काकडे, हर्षवर्धन अमोल काकडे सर्व पदाधिकारी व उपासक – उपासिका – भा.बौ.म. शाखा फलटण या धम्म सहलीत इतिहास, कला आणि करुणा यांचा संगम अनुभवताना सर्वांनी बुद्ध वचनांचे महत्त्व पुन्हा जाणले.
    या धम्म सहलीस भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयुष्यमान नानासो मोहिते सर यांनी शुभेच्छा दिल्या.

    टोळीवर पोलीस प्रशासनाची कारवाई: अकलुजमधील सहा गुन्हेगार ६ महिन्यांसाठी हद्दपार

    0
    टोळीवर पोलीस प्रशासनाची कारवाई: अकलुजमधील सहा गुन्हेगार ६ महिन्यांसाठी हद्दपार

    सोलापूर: अकलुज (ता. माळशिरस) येथील समाजविघातक टोळीवर कडक कारवाई करत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये सहा गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर ६ महिन्यांसाठी हद्दपार केलं आहे.

    अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी सदर टोळीच्या कारवायांबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. टोळीतील सदस्यांनी अकलुज, सातारा शहर आणि श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

           टोळीवर दाखल गुन्ह्यांचा आढावा:

    • जबरदस्तीने दहशत निर्माण करणे
    • गंभीर स्वरूपाचे शरीरावरील हल्ले
    • विनयभंगाचे प्रकार
    • जनावरे नेऊन आर्थिक फसवणूक
    • मारहाणीचे आणि दुखापतीचे गुन्हे

    ही टोळी संघटितपणे गुन्हे करत असून समाजात भीतीचे वातावरण तयार करत होती. त्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेत टोळीला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

             हद्दपार केलेले टोळी प्रमुख व सदस्य:

    1. करण अभिमान उर्फ अभिमन्य पवार – टोळी प्रमुख, रा. जुना बाजार तळ, अकलुज
    2. बंटी उर्फ अभिषेक अभिमान उर्फ अभिमन्य पवार – टोळी सदस्य, रा. जुना बाजार तळ, अकलुज
    3. विठ्ठल उर्फ ओंकार सोमनाथ यादव – टोळी सदस्य, रा. अकलुज
    4. सागर अतुल पावसे – टोळी सदस्य, रा. अकलुज
    5. विजय शंकर नायडू – टोळी सदस्य, रा. संग्रामनगर
    6. आयान ख्वाजा तांबोळी – टोळी सदस्य, रा. संग्रामनगर

            पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:

    हद्दपार केलेले इसम जर जिल्ह्यात वावरताना आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण यांना माहिती द्यावी. भविष्यातही दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या इसमांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी दिली.

    मुख्यमंत्री फडणवीस २६ ऑक्टोबरला फलटण दौऱ्यावर – विकासकामांचे भूमिपूजन आणि राजकीय हालचालींना वेग

    0
    मुख्यमंत्री फडणवीस २६ ऑक्टोबरला फलटण दौऱ्यावर – विकासकामांचे भूमिपूजन आणि राजकीय हालचालींना वेग

    फलटण | प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २६ ऑक्टोबर रोजी फलटण दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. ही माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

    फडणवीस यांच्या दौर्‍यात मंजूर झालेली व पूर्णत्वास आलेली विकासकामे केंद्रस्थानी असणार आहेत. या प्रकल्पांमुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे.

    या दौऱ्यादरम्यान भाजपमध्ये काही नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दौरा राजकीय घडामोडींनाही गती देणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

    तसेच, मुख्यमंत्री फडणवीस फलटण तालुक्यासाठी विशेष घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्याच्या विकासासाठी नव्या प्रकल्पांची किंवा निधीच्या घोषणांची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा नियोजनबद्ध दौरा; २२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान बैठका व भूमिपूजनांचे आयोजन

    0
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा नियोजनबद्ध दौरा; २२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान बैठका व भूमिपूजनांचे आयोजन

    फलटण | २१ ऑक्टोबर २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, महायुतीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील हे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झंझावाती दौरा करणार आहेत.

    २२ ते २५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ते जिल्हा परिषद गटनिहाय आणि प्रभागनिहाय बैठका घेणार असून, महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात स्थानिक विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळेही होणार आहेत.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर रोजी कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. त्याआधी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी मतदारसंघातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याचे नियोजन केले आहे.

           दौऱ्याचे तपशीलवार वेळापत्रक:

    🔹 २२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार)

    • ११:०० वा. – कोळकी जि.प. गट (स्थळ: कोळकी रेस्ट हाऊस)
    • १२:०० वा. – दुधेबावी पं.स. गण बैठक (स्थळ: कोळकी रेस्ट हाऊस)
    • ७:०० संध्याकाळ – उ. कोरेगाव (स्थळ: मंगल कार्यालय, पिंपोडे बु.)

    🔹 २३ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार)

    • १०:०० वा. – वा. निंबाळकर पं.स. गण (स्थळ: स्वराज ग्रीन पॉवर, उपळवे)
    • १:०० ते ४:०० दुपारी – कार्यकर्त्यांशी संवाद (स्थळ: निसर्ग हॉटेल, सुरवडी)
    • ४:०० ते ६:०० दुपारी – तरडगाव, आदंर्की, हिंगणगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन
    • ६:२० संध्याकाळ – देशपांडे हॉस्पिटल भूमिपूजन, मालोजी नगर, कोळकी
    • ७:०० वा. – विडणी जि.प. गट – पिंप्रद
    • ७:३० वा. – बरड पं.स. गण – पिंप्रद
    • ३:०० दुपारी – गुणवरे जि.प. गट (स्थळ: गोखळी)

    🔹 २४ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार)फलटण शहरातील प्रभाग बैठका

    • ४:०० वा. – प्रभाग क्र. १ (स्थळ: महादेव मंदिर, सोमवार पेठ)
    • ५:०० वा. – प्रभाग क्र. २ व ३ (स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह)
    • ६:०० वा. – प्रभाग क्र. ४ (स्थळ: भैरवनाथ मंदिर, भैरोबा गल्ली)
    • ७:०० वा. – प्रभाग क्र. ५ (स्थळ: स्वामी मंदिर, मलठण)
    • ८:०० वा. – प्रभाग क्र. ६ (स्थळ: अभिनव चौक, मलठण)
    • ९:०० वा. – प्रभाग क्र. ७ (स्थळ: भोसले वाडा, चिंचेचा झाड)

    🔹 २५ ऑक्टोबर २०२५ (शनिवार)फलटण शहर

    • १०:०० वा. – प्रभाग क्र. ८ व ११ (स्थळ: नवलबाई मंगल कार्यालय)
    • १०:०० वा. – प्रभाग क्र. १० (स्थळ: जलमंदिर)
    • १०:०० वा. – प्रभाग क्र. १२ (स्थळ: फलटण)
    • १०:०० वा. – प्रभाग क्र. १३ (स्थळ: गणपती मंदिर, आर्यमान हॉटेल शेजारी)
    • ११:०० वा. – प्रभाग क्र. ९ (स्थळ: फलटण)

               कार्यकर्त्यांना आवाहन:

    या सर्व बैठकींना संबंधित जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि नगरपालिका प्रभागातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

    फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मधून विकास काकडे नगरसेवकपदासाठी इच्छुक — समाजाभिमुख नेतृत्वासाठी जनतेचा पाठिंबा!

    0
    फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मधून विकास काकडे नगरसेवकपदासाठी इच्छुक — समाजाभिमुख नेतृत्वासाठी जनतेचा पाठिंबा!


    फलटण (प्रतिनिधी): फलटण शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलेले श्री. विकास वसंतराव काकडे हे आता येणाऱ्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून नगरसेवकपदासाठी इच्छुक असल्याची घोषणा केल्यानंतर नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.
    प्रामाणिक, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या काकडे यांच्या उमेदवारीला व्यापक जनसमर्थन लाभत आहे.
    शिक्षणातून समाजनिर्मिती
    फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे उपमुख्याध्यापक म्हणून कार्य करताना काकडे सरांनी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनात मूल्यसंस्कार आणि सामाजिक जाण निर्माण केली.
    त्यांच्या प्रेरणादायी शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले असून समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत.
    समाजकारणाशी घट्ट नातं
    काकडे सर हे सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे नागरिकांशी जोडलेले आहेत.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती अशा प्रसंगी त्यांनी एकत्रित समाजभावनेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले.
    फलटण शहरात बुद्ध जयंती मिरवणूक काढण्याच्या परंपरेची सुरुवात करणाऱ्या समितीत त्यांच्या नेतृत्वाने महत्वाची भूमिका बजावली आहे.
    सर्व घटकांशी स्नेह आणि संवाद
    सर्व समाजघटकांशी स्नेहाने वागणारे, संयमी व विनम्र व्यक्तिमत्व असलेले विकास काकडे हे “कामातून विश्वास” या तत्त्वावर कार्य करतात.
    शिक्षक, युवक, महिला व नागरिक यांच्या प्रश्नांबाबत ते नेहमी तत्पर असतात.
    त्यांच्या सभोवती एक विश्वासाचं वर्तुळ निर्माण झालं आहे — आणि हाच विश्वास आता लोकांना नगरसेवक म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित आहे.
    प्रभाग क्र. १२ मध्ये प्रामाणिक नेतृत्वाची गरज
    फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिक्षण, रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि युवकांसाठी सुविधांचा विकास हा काळाची गरज आहे.
    या प्रभागासाठी अनुभव, विचार आणि कार्यनिष्ठा असलेले नेतृत्व आवश्यक असून विकास काकडे सर हे त्या भूमिकेसाठी योग्य उमेदवार म्हणून नागरिकांनी पुढे केले आहेत.
    नागरिकांचा विश्वास
    प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे —

    “काकडे सर हे सर्वसामान्यांचा आवाज आहेत. शिक्षण, समाजकार्य आणि प्रामाणिकपणाचा उत्तम मिलाफ त्यांच्या कामात दिसतो. प्रभाग क्र.१२ मधून नगरसेवक म्हणून त्यांना उमेदवारी मिळावी, ही आमची एकमुखी मागणी आहे.”
    फलटणसाठी सक्षम नेतृत्वाची नवी दिशा
    फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्र.१२ मधून विकास काकडे हे शिक्षण, संस्कृती आणि समाजकारण यांचा संगम घडवणारे आदर्श उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.
    त्यांचा अनुभव, संघटनकौशल्य आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन फलटणच्या प्रगतीसाठी नवा अध्याय लिहील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.