Home Blog

फलटणमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा; एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

0
फलटणमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा; एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

फलटण : फलटण शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. परिणामी गृहिणींसमोर स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही नागरिकांकडून गॅस पुरवठादारांकडून मुद्दाम साठेबाजी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही ठिकाणी जादा दराने सिलेंडर विक्री होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात गॅसचा तुटवडा नेमका कशामुळे निर्माण झाला, पुरवठा का कमी झाला आणि साठेबाजी होत आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अमर हबीब यांचा कॉलम: यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?

0
अमर हबीब यांचा कॉलम:  यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?




19 मार्च 26 रोजी (या वर्षीही) मला अन्नत्याग/उपवास करणे भाग पडले आहे. कारण या वर्षीही महाराष्ट्रात दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनां आत्महत्या करणे भाग पडले आहे. त्या थांबविण्यात मी कमी पडलो. सरकारकडून शेतकरीविरोधी कायदे रद्द करून घेणे या वर्षीही जमले नाही. या आत्महत्यांची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारला लाज वाटत नाही. सरकार कोडगे झाले आहे. सरकार मारेकरी असल्यामुळे त्याला शेतकरी मेल्याचे दुःख होत नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. अजुनही माझ्या संवेदना जाग्या आहेत. निरपराध माणसाची पावले मरणाकडे जाताना पाहून माझे मन कासावीस होते. मरणाकडे जाणारी पावले मला थांबावता येत नाहीत, ही जाणीव मला अस्वस्थ करते. असाह्यतेची जाणीव करून देते. या जाणीवतून मला अन्नत्याग / उपवास करावा लागतो. 19 मार्च 2017ला मी असा उपवास करण्याचे ठरवले. त्यास संतोष अरसोड सारख्या अनेक मित्रांनी पाठिंबा दिला. महागावला अनेक मान्यवर माझ्या सोबत उपोषणाला बसले होते. त्यानंतर दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग/उपवास होत आहे. लाखो लोक अन्नत्याग करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात, देशात काही प्रमाणात व अन्य देशातील किसानपुत्र काही प्रमाणात सहभागी होतात. या दिवसाला ‘शेतकरी सहवेदना दिवस’ असे नाव पडले. अन्नत्याग करून दिवस पालणारे हजारो कुटुंबे आहेत. या दहा वर्षात सरकारवर शेतकरी आत्महत्याचा साधा ओरखडा देखील उमटला नाही पण शेतकरी जीवनात मोठी उलथापालथ झाली आहे. मागच्या दहा वर्षाच्या काळात शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. हा एक मोठा बदल आहे. माझ्याकडे अधिकृत आकडेबारी उपलब्ध नाही पण माझा नजरी-अंदाज असा आहे की, आज 85 टक्के ग्रामीण कुटुंबात शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. शेती हे जळते घरी आहे, आपण निखाऱ्यावर चालत आयुष्य काढले असले तरी हे जळते आयुष्य लेकरांच्या वाट्याला येऊ नये याची जाणीव झाल्या बरोबर 1980 पासून शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शेतीतून बाहेर काढायला सुरुवात केली. हे शेतकऱ्यांचे उपजत शहाणपण होते. कोण्या नेत्याने सांगितले म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला नाही तर परिस्थितीने त्यांना हे शहाणपण दिले आहे. शहराच्या जवळच्या खेड्यात सक्तीच्या स्थलांतराचे प्रमाण खूप जास्त आहे. हे केवळ स्थलांतर नसून हे ‘महान व्यवसायांतर’ आहे. शेतीवरील अवलंबन कमी करनारी ही ऐतिहासिक घटना आहे. शेतकरी आत्महत्या कोणत्या कुटुंबात होतात? हे बारकाई ने पाहिले तर दिसून येते की 1) तो अत्यल्प भू धारक असतो 2) त्याचे एकमेव उत्पन्नाचे साधन शेती असते. शेतजमिनीच्या विखंडनाचे मुख्य कारण सीलिंग कायदा आहे. हा कायदा कायदेभंग सत्याग्रह करून मोडता येतो नाही. सरकारी कायद्यामुळे शेतीचे विखंडन शेतकरी थांबवू शकत नाही. तो कायदा सरकारच रद्द करू शकते. या ठिकाणी शेतकरी हतबल आहेत. पण ‘उत्पन्नाचे एकमेव साधन शेती राहता कामा नये’ यासाठी मात्र शेतकरी जीवाचा आटापिटा करू शकतात. तसा त्यांनी केला. 85 टक्के शेतकरी कुटुंबात आज शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. याचा अर्थ त्या कुटुंबातील आत्महत्या टळली आहे. आज फक्त 15 टक्केच शेतकरी कुटुंबावर आत्महत्यांची तलवार लटकती आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटली म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्या प्रमाणात घटली का?तर तसे दिसून येत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तेवढ्या प्रमाणात कमी झालेली दिसत नाही. आजच्या पेक्षा दुप्पट कुटुंबे जेंव्हा शेतीवर अवलंबून होती, तेंव्हा जेवढ्या आत्महत्या होत असत, जवळपास तेवढ्याच आत्महत्या आजही होत आहेत. याचा अर्थ, शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जास्त बिकट झाली आहे. काळोख अधिक गडद झाला आहे. वरील पार्श्वभूमीवर यंदाच्या 19 मार्चला अन्नत्याग करणे संयुक्तिक ठरते म्हणून मी हा उपवास करण्याचे ठरवले आहे. 2017ला पहिला अन्नत्याग / उपवास मी चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) येथे सुरु केला होता. या वर्षी म. फुले यांच्या भावानी पेठ, पुणे येथील वाड्यात असणार आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करून मी 19 मार्चला अन्नत्याग करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांनां श्रद्धां्धांजली अर्पण करणार आहे आणि शेतकरी स्वातंत्र्यासाठी शेतकरीविरिद्धी कायदे रद्द करण्याचा निर्धार करणार आहे. तुमचे तुम्ही ठरवा.



Source link

फलटण नगरपरिषदेकडून सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याच्या कारवाईविरोधात भारतीय युवा पँथरचा इशारा

0
फलटण नगरपरिषदेकडून सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याच्या कारवाईविरोधात भारतीय युवा पँथरचा इशारा

फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक पाणी नळ जोडण्या बंद करण्याचे काम सध्या नगर परिषदेकडून सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील सर्वसामान्य व गरीब नागरिकांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
गरीब, अल्पसंख्याक आणि दलित वस्त्यांमधील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अद्याप सुधारलेली नसल्यामुळे त्यांना नवीन नळ जोडणी घेणे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याची कारवाई तात्काळ स्थगित करून अशा वस्त्यांमध्ये उलट अधिक सार्वजनिक पाणी नळ जोडण्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही कारवाई त्वरित थांबवली नाही तर भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिला.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शुभम गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. मंगलाताई जाधव तसेच सदस्य आकाश शिंदे, निखील सरोदे, हेमंत कांबळे व इतर महिला सदस्य उपस्थित होत्या.

फलटणमध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा

0
फलटणमध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा


फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या अंतर्गत सोमवार पेठ येथे उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखील जाधव, बांधकाम समितीचे सभापती सोमाशेठ जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे, भीमदेव बुरुंगले यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अशा आरोग्यवर्धिनी केंद्रांची आवश्यकता असल्याचे सांगितले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य सेवा मिळाल्यास त्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी प्रभागनिहाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. विशेषतः महिलांसाठी तपासणी शिबिरे घेऊन कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी यांसारख्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोमवार पेठेत सुरु झालेल्या या केंद्राच्या वरच्या मजल्यावर वाचनालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरात लवकरच 50 नवीन स्ट्रीट लॅम्प बसवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
‘500 रुपयांचा खर्च आता शून्य’ — नगराध्यक्ष समशेरसिंह
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, यापूर्वी सोमवार पेठ परिसरातील नागरिकांना साध्या तपासणीसाठी शहरात जावे लागत होते. ओपीडी, औषधे आणि प्रवास खर्च मिळून साधारण 500 रुपये खर्च होत होता. मात्र आता या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा मिळणार आहे.
या केंद्रात रक्त तपासणी, लघवी तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच कॅन्सर तपासणीसारख्या विविध चाचण्या उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा — प्रियदर्शिनी भोसले
उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा केंद्रासाठी जागा उपलब्ध नव्हती. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न सुटला असून नागरिकांनी या केंद्राच्या सेवांचा लाभ घ्यावा.
ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांनी सांगितले की, शहरातील दुर्लक्षित भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. रणजितदादा आणि समशेरदादा यांच्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात चार आरोग्यवर्धिनी केंद्रांची योजना
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. शहरात एकूण चार आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्याची योजना असून जागेअभावी ही योजना अनेक वर्षे प्रलंबित होती. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सोमाशेठ जाधव आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सेवा आता शहरातील नागरिकांना या आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपलब्ध होणार असल्याने उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दत्तनगर येथील जुन्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जागेत तिसरे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साखरवाडी गटाच्या आशा गटप्रवर्तक सारिका घार्गे यांनी केले.

चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ दरम्यान वीरमरण

0


पाटण (सातारा): सातारा जिल्हा हा शौर्य आणि बलिदानाची परंपरा असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच मातीतील आणखी एका सुपुत्राने देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च (Satara News) बलिदान दिले आहे. पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४२) यांना सिक्कीममधील चीन सीमेवर ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ अंतर्गत कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. तब्बल २३ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले.(Satara News)

कर्तव्य बजावताना काळाचा घाला

शहीद बाळकृष्ण निकम हे भारतीय सैन्यदलात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती सिक्कीम येथील अतिदुर्गम आणि उणे तापमानातील चीन सीमेवर होती. ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ सारख्या कठीण मोहिमेवर असताना, निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देताना त्यांना वीरमरण आले. ही बातमी शुक्रवारी लष्करी मुख्यालयातून त्यांच्या गावी कळवण्यात आली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण पाटण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.(Satara News)

पिंपळोशी गावावर शोककळा

“आपला बाळकृष्ण शहीद झाला,” ही बातमी समजताच पिंपळोशी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. निकम कुटुंबीयांच्या घरासमोर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शहीद बाळकृष्ण हे सुट्टीवर आल्यावर गावातील प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत सर्वांशी आपुलकीने आणि मनमोकळेपणाने मिसळायचे. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचा आधार गेला नाही, तर गावाने आपला एक लाडका सुपुत्र गमावला आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

निकम यांच्या निधनामुळे त्यांच्या घरातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. वृद्ध आईचा हंबरडा आणि वडिलांच्या डोळ्यांतील न थांबणारे अश्रू पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. शहीद बाळकृष्ण यांच्या मागे आई, वडील, पत्नी पूनम, भाऊ शिवराज आणि बहीण रूपाली असा परिवार आहे. विशेषतः त्यांची अर्णव आणि प्रणव ही दोन लहान मुले आपल्या वडिलांच्या परतण्याची वाट पाहत होती, हे दृश्य पाहून पिंपळोशी गावातील प्रत्येक डोळा पाणावला होता.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव लष्करी विमानाने पुण्यात आणि तेथून रुग्णवाहिकेने त्यांच्या मूळ गावी पिंपळोशी येथे आणले जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहीद निकम यांना शासकीय इतमामात आणि लष्करी लवाजम्यासह अखेरचा निरोप देण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक या वीरपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये जमीन नोंदींचा गोंधळ; ‘सिटी सर्व्हे’ व ७/१२ दुहेरी नोंदीवरून वाद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

0
फलटणमध्ये जमीन नोंदींचा गोंधळ; ‘सिटी सर्व्हे’ व ७/१२ दुहेरी नोंदीवरून वाद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

फलटण | प्रतिनिधी : जमिनीच्या नोंदींमध्ये पारदर्शकता असावी अशी अपेक्षा असताना फलटण तालुक्यात मात्र ‘सिटी सर्व्हे’ आणि ‘७/१२’ अशा दुहेरी नोंदींचा गंभीर पेच निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महसूल प्रशासनाची कार्यपद्धती संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. विशेषतः प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची तक्रार राज्याचे महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांच्याकडे करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
फलटण शहरातील गट नं. ४९/पै या जमिनीबाबत हा वाद निर्माण झाला आहे. एकाच जमिनीचे ‘सिटी सर्व्हे’ आणि ‘७/१२’ असे दोन स्वतंत्र रेकॉर्ड असणे नियमबाह्य मानले जाते. त्यामुळे १० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदारांनी या जमिनीचा ७/१२ उतारा बंद करण्याचे आदेश दिले होते.
मात्र या आदेशाविरुद्ध प्रांताधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले आणि त्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले.
प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयावर सवाल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि ॲड. सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले.
संघटनेच्या मते —
दोन दिवसांत निर्णय : १६ फेब्रुवारीला अपील दाखल झाले आणि अवघ्या दोन दिवसांत म्हणजे १८ फेब्रुवारीला तहसीलदारांचा आदेश रद्द करून निकाल देण्यात आला.
नैसर्गिक न्यायाचा भंग : मूळ अर्जदारांना नोटीस न देता किंवा त्यांची बाजू ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला.
प्रलंबित प्रकरणे असताना घाई : २०२४ पासून अनेक प्रकरणे प्रलंबित असताना या विशिष्ट प्रकरणात दाखवलेली घाई संशयास्पद असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर म्हणाले,
“प्रांताधिकाऱ्यांचा कारभार अंधाधुंदीचा असून सामान्य नागरिकांशी त्यांची वागणूकही योग्य नाही. या अन्यायाविरोधात आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत.”
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘जैसे थे’ आदेश
प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात बाधितांनी सातारा येथील अप्पर जिल्हाधिकारी न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर १३ मार्च २०२६ रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर ‘जैसे थे’ (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाला तात्पुरता लगाम बसला आहे.
शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच महसूल प्रशासनातील कथित अनियमिततेवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. महसूल विभागातील गोंधळामुळे सामान्य शेतकरी व नागरिक भरडले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला.
या पत्रकार परिषदेला फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, प्रवक्ते प्रमोद गाडे, डॉ. रविंद्र घाडगे, किरण भोसले, बाबा कोकरे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक; गॅस पुरवठा बंदीच्या निषेधार्थ १७ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा

0
फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक; गॅस पुरवठा बंदीच्या निषेधार्थ १७ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा

फलटण: जागतिक स्तरावर इराण-अमेरिका तणावामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध घातल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला असून फलटण तालुका हॉटेल असोसिएशन आक्रमक झाली आहे.

असोसिएशनच्या वतीने या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी फलटण तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्सचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर अनेक हॉटेल्स कायमस्वरूपी बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारकडे मागण्या मांडण्यासाठी १७ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता फलटण तहसील कार्यालय येथे बैठक आणि निवेदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासमोर व्यावसायिक आपली भूमिका मांडणार आहेत.
फलटण तालुका हॉटेल असोसिएशनने तालुक्यातील सर्व हॉटेल मालक आणि संबंधित व्यावसायिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. “सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. न्याय मिळवण्यासाठी आणि आपली बाजू सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे निवेदन महत्त्वाचे आहे,” असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम: ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण

0
वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:  ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण


  • Marathi News
  • Opinion
  • Pulse Medical Conference Boosts Rural Healthcare In Maharashtra; Madhuri Misal Column

49 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित केल्याशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नाही. राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज, संशोधनप्रधान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, परिषदेत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, डीन, विशेषतज्ज्ञ, खाजगी शैक्षणिक संस्था तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत. याचा राज्याच्या मेडिकल टूरिझम आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे यासाठी या परिषदेचे सहकार्य लाभणार आहे.

‘पल्स वैद्यकीय परिषद’ 27 आणि 28 मार्च 2026 रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, औषधनिर्मिती उद्योग, स्टार्टअप, तसेच वेलनेस पर्यटन या सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणून भविष्यासाठी स्पष्ट दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता ठोस निर्णय, गुंतवणूक करार, धोरणात्मक बदल आणि जनतेसाठी प्रत्यक्ष फायदे निर्माण करणारे व्यासपीठ ठरणार आहे.

राज्य आरोग्य क्षेत्रात अग्रगण्य असून देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचारपद्धती आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात येण्यास मदत होईल. याचा थेट फायदा रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यात, डॉक्टरांना नवीन संधी उपलब्ध होण्यात आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधनाचा अनुभव मिळण्यात होणार आहे.

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळावी हा यामागील उद्देश आहे. आयुष क्षेत्रात आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधन, डॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पना यांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे.

या उपक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. परिषद उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. परिषदेत सुमारे 2,900 प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यासाठी क्यूआर कोड आधारित प्रवेश, स्वतंत्र सत्र हॉल, हेल्पडेस्क, स्वयंसेवक आणि लाईव्ह स्क्रीनिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच सुरक्षा, वैद्यकीय आपत्कालीन सेवा, वाहतूक आणि निवास व्यवस्थेसाठी स्वतंत्र समन्वय कक्षही कार्यरत असेल.

परिषदेतील प्रमुख विषयांमध्ये डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा व कौशल्य विकास, संशोधन आणि नवकल्पना, मेडिकल व वेलनेस पर्यटन, गुंतवणूक तसेच ग्रामीण व सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण या विषयांचा समावेश आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या विषयांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे.

परिषदेत ‘डिजी डोम’ आणि ‘टेक टॉक’ या विशेष संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. 360 डिग्री डोममध्ये रोबोटिक सर्जरी, व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे मेडिकल प्रशिक्षण, डिजिटल हॉस्पिटल व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाचे लाईव्ह आणि इमर्सिव्ह प्रेझेंटेशन सादर केले जाणार आहे. टेक टॉक सत्रांमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील नेते आपले अनुभव आणि नवीन कल्पना मांडतील. यामुळे तरुण डॉक्टर, विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योजकांना प्रेरणा आणि दिशा मिळेल.

या परिषदेच्या माध्यमातून राज्यासाठी स्पष्ट कृती आराखडा तयार करण्यात येणार असून संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन भागीदारी करार, वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा, गुंतवणूक आणि स्टार्टअप्ससाठी प्रकल्प घोषणा होण्याची अपेक्षा आहे. रोबोटिक सर्जरी, व्हर्च्युअल रिॲलिटी आधारित शिक्षण आणि तंत्रज्ञानाधारित उपचार प्रणाली यामुळे भविष्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल.

महाराष्ट्र वेलनेस पर्यटनाच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे. सह्याद्री पर्वतरांगा, समुद्रकिनारे, हिल स्टेशन, जंगल परिसर तसेच योग, आयुर्वेद, पंचकर्म आणि निसर्गोपचार केंद्र यामुळे राज्यात वेलनेस पर्यटनाला मोठी संधी उपलब्ध आहे. उत्तम आरोग्य सुविधा आणि नैसर्गिक उपचार पद्धती यांची सांगड घालून राज्याला जागतिक वेलनेस डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे पर्यटन वाढ, रोजगारनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यास मदत होणार आहे. वेलनेस पर्यटनामुळे ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.स्थानिक युवकांना योग प्रशिक्षक, थेरपिस्ट किंवा गाईड म्हणून प्रशिक्षण देता येईल. महिला बचतगटांना हर्बल उत्पादने, स्थानिक आहार आणि होमस्टे सुविधा चालविण्याची संधी मिळेल. औषधी वनस्पतींची लागवड आणि हर्बल फार्मिंगमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल.

आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा विचारही शासन करत आहे. मेडिकल व्हिसा प्रक्रिया सुलभ करणे, प्रमुख शहरांमध्ये इंटरनॅशनल पेशंट हेल्पडेस्क स्थापन करणे, बहुभाषिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, तसेच विमानतळ ते रुग्णालय समन्वय व्यवस्था उभारणे यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

पल्स परिषदेत स्टार्टअप क्षेत्रासाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरुण उद्योजकांना त्यांच्या कल्पना गुंतवणूकदार, उद्योगपती आणि धोरणकर्त्यांसमोर मांडण्याची संधी मिळेल. तसेच बल्क ड्रग पार्कसारख्या प्रकल्पांमुळे औषधनिर्मिती उद्योगाला चालना मिळून औषधांचा खर्च कमी करण्यास मदत होईल.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबूत करणे हा या परिषदेचा महत्त्वाचा उद्देश आहे. टेलिमेडिसिन, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड, मोबाईल हेल्थ अ‍ॅप्स आणि उच्चगती इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था विकसित केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना तंत्रज्ञानाने सक्षम करून उपचार अधिक वेगवान आणि अचूक करण्याचा प्रयत्न आहे.

मानसिक आरोग्य क्षेत्रालाही परिषदेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. टेलि-मेंटल हेल्थ सेवा, विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य कार्यक्रम, 24 तास हेल्पलाईन आणि डॉक्टरांसाठी विशेष प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संशोधन प्रयोगशाळा मजबूत करणे, संशोधन अनुदाने उपलब्ध करून देणे आणि उद्योग-संशोधन संस्था-शासन यांच्यात सहकार्य वाढविणे अशी पावले उचलली जात आहेत. विद्यार्थ्यांना संशोधन पेपर सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन, इंटर्नशिप आणि करिअर नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य व्यवस्थेत महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेणे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात जागतिक दर्जाचे केंद्र निर्माण करणे, ग्रामीण आणि आदिवासी भागात मजबूत प्राथमिक आरोग्य सुविधा उभारणे तसेच मेडिकल आणि वेलनेस पर्यटनाच्या माध्यमातून राज्याला आंतरराष्ट्रीय आरोग्य गंतव्यस्थान म्हणून विकसित करणे हे शासनाचे दीर्घकालीन ध्येय आहे.



Source link

सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यास कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू

0


सातारा: जिल्ह्यातील सुळवस्ती येथे अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती (Satara) येथे आज दुपारी ह्रदयद्रावक घटनेत तिघांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यामध्ये पोहण्यासाठी (Sunk) उतरलेले तीन परप्रांतीय तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 ते 35 वयोगटातील ओडिसा राज्यातील तरुणांचा समावेश आहे. 

कालव्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत ज्योतीराम नाईक, श्रीराम जगाई हेबरम आणि सतीन बीवजी नाईक या तिघांचा पाण्यात बुडून, गुदमरुन मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेतील मृत तिघेही मूळचे ओडीसा राज्यातील असून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही युवकांचे मृतदेह सिमेंटच्या पाईपमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रॅश ड्रायव्हिंगने घेतली बळी

भंडाऱ्यात रॅश ड्रायव्हिंगने स्टील उत्पादक सनफ्लॅग कंपनीत प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असलेल्या तरुणाचा बळी घेतला. ही घटना भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर दोन दिवसांपूर्वी घडली होती. कर्तव्यावर असलेला हा सुरक्षारक्षक प्रवेशद्वार बंद करीत असताना त्याचवेळी भरधाव आणि रॅश ड्रायव्हिंग करून कंपनीत प्रवेश करणाऱ्या एका कार चालकानं त्याला जबर धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. प्रथम भंडाऱ्यात आणि नंतर त्याच्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सितीन रहांगडाले (25) असं मृतकाचं नावं असून तो मुळचा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोड्यातील डव्वेटोला येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी आज त्याचा मृतदेह थेट सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवला. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला आणि मृत्युनंतरचे सर्व आर्थिक लाभ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर सनफ्लॅग कंपनी प्रशासनं आणि सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मोबदला आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळलं. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वरठी आणि भंडारा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार

आणखी वाचा



Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: आपल्यापैकी किती जणांना त्या ‘अदृश्य लोकांना’ पाहण्याची सवय आहे?

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  आपल्यापैकी किती जणांना त्या ‘अदृश्य लोकांना’ पाहण्याची सवय आहे?




बुधवारची सकाळ होती. त्या लोकल ट्रेनच्या खिडकीच्या सीटवर 20-25 वर्षांचा एक तरुण बसला होता. तिसऱ्या सीटवर एक मध्यमवयीन महिला डोळे मिटून बसली होती. एसीचा आवाज येत होता. मी पुढच्या सीटवर होतो. ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती. मी आजूबाजूला पाहत होतो. विचार करत होतो की या एसी लोकल ट्रेनमध्ये गर्दी का नाही? त्या तरुणाचे जग त्याच्या स्मार्टफोन स्क्रीनपुरते मर्यादित होते. त्याच्या मोबाइल फोनवर एक व्हायरल कॉमेडी चालू होती आणि त्याच्याकडे हेडफोन नव्हता. व्हिडिओ खूप जोरदार असल्याने त्याने आवाज वाढवला. कॉमेडीतील मोठे, अतिरंजित हास्य तेथील रिकामी जागा जणू भरून काढत होते. त्यामुळे ट्रॅकचा लयबद्ध आवाज कमी झाला. मध्यमवयीन महिला झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण सीटच्या कडक प्लास्टिकमुळे तिचे डोके स्थिरावत नव्हते. कदाचित ती घरातील कामे पूर्ण करण्यासाठी लवकर उठली असेल. ती ऑफिसमध्ये तिच्या पहिल्या शिफ्टला जात असावी. तरुणाच्या फोनवरील रेकॉर्ड केलेले हास्य जोरात वाढत गेले, तेव्हा तिच्या पापण्या आश्चर्याने फडफडत होत्या. तिचा चेहऱ्यावर सुरकुत्या पडत होत्या. पण त्या तरुणाने काहीच लक्ष दिले नाही. तो त्याच्या “खाजगी साम्राज्यात’ होता. तेथे त्याला मिळणारे मनोरंजन त्याच्यासाठी सर्वस्व होते.
अशा जगात आपले स्वागत आहे. अनेक लोकांनी सार्वजनिक जागा ‘खासगी साम्राज्य’ म्हणून गृहीत धरल्या आहेत. माझ्यासारख्या लोकांसाठी ही नवीन साम्राज्ये आधुनिक जीवनात “सहानुभूतीचा अभाव’ प्रकट करतात – येथे वैयक्तिक सोय अनेकदा सामूहिक प्रतिष्ठेपेक्षा जास्त असते. मी माझा लॅपटॉप उघडला. वरील परिच्छेद टाइप केला आणि त्याला त्याचा फोन शांत करण्यास सांगितले. कारण मला ऑफिसचे काम करायचे होते. कदाचित त्याला राग आला असेल. तो उठला आणि पुढच्या डब्यात गेला. मग ती महिला 20 मिनिटे शांत झोपली. शेवटच्या स्टेशनच्या पाच मिनिटे आधी ती उठली आणि माझ्या मदतीबद्दल माझे आभार मानले. यामुळे मला गेल्या आठवड्यात आलेल्या युनायटेड एअरलाइन्सच्या एका प्रेस रिलीजची आठवण झाली. एअरलाइनने एक नवीन नियम जारी केला आहे. त्यामुळे काही प्रवासी नाराज आहेत. त्यात म्हटले आहे की हेडफोनशिवाय ऑडिओ ऐकल्यास विमानातून उतरावे लागेल. एअरलाइनकडे आधीपासूनच “हेडफोन धोरण’ होते. परंतु आता त्यांनी त्यांच्या “कॅरिज करार’ मध्ये सुधारणा केली आहे – त्यानुसार प्रवाशांनी पाळलेले विमान नियम – स्पष्टपणे नमूद केले आहे की “हेडफोनशिवाय ऑडिओ किंवा व्हिडिओ सामग्री ऐकणाऱ्या प्रवाशांना खाली उतरवले जाईल किंवा चढण्यास नकार दिला जाईल.’ आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांना हेडफोन घालण्यास प्रोत्साहित करतो – आणि आमची वाय-फाय मार्गदर्शक तत्त्वे आम्हाला याची आठवण करून देतात, असे एअरलाइनचे प्रवक्ते जोश फ्रीड यांनी स्पष्ट केले. नर्मदापुरम ते भोपाळ, चंदीगड ते सिमला, जयपूर ते जोधपूर किंवा रायपूर ते भिलाई अशी कोणतीही ट्रेन घ्या आणि तुम्हाला नक्कीच असे काही प्रवासी भेटतील. इतरांच्या शांततेवर आपला हक्क असल्याचे समजतात. त्यांना वाटते की त्यांचा स्वतःचा आनंद इतरांच्या शांतीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. दरम्यान, पूर्वेकडील भागात राऊरकेला ते भुवनेश्वरसारख्या ठिकाणी गेल्यास सहानुभूतीचा अभाव केवळ आवाजांपुरता मर्यादित नाही, तो शारीरिकदृष्ट्यादेखील स्पष्ट आहे. प्रवाशांनी शेंगदाण्यांचे कवच फेकणे सामान्य आहे. यातून घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होते. देशात एलपीजी सिलिंडरच्या संभाव्य कमतरतेमुळे रेल्वे केटरिंग सेवा तात्पुरते अन्न आणि पेये बंद करू शकते. तसे झाले तर आम्हाला स्वतःचे अन्न आणावे लागेल. पण कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आणि आपल्या मागे साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या अदृश्य हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. फंडा असा की- खऱ्या सहानुभूतीसाठी नैतिक कल्पनाशक्तीची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला अदृश्यपणे किंवा पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांना पाहता येते. एखाद्याला आवश्यक असलेल्या शांततेसाठी किंवा आपण फेकलेला कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही स्मरण असू द्यावे.



Source link