Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण नगरपरिषदेकडून सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याच्या कारवाईविरोधात भारतीय युवा पँथरचा इशारा

फलटण नगरपरिषदेकडून सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याच्या कारवाईविरोधात भारतीय युवा पँथरचा इशारा

फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक पाणी नळ जोडण्या बंद करण्याचे काम सध्या नगर परिषदेकडून सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील सर्वसामान्य व गरीब नागरिकांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
गरीब, अल्पसंख्याक आणि दलित वस्त्यांमधील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अद्याप सुधारलेली नसल्यामुळे त्यांना नवीन नळ जोडणी घेणे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याची कारवाई तात्काळ स्थगित करून अशा वस्त्यांमध्ये उलट अधिक सार्वजनिक पाणी नळ जोडण्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही कारवाई त्वरित थांबवली नाही तर भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिला.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शुभम गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. मंगलाताई जाधव तसेच सदस्य आकाश शिंदे, निखील सरोदे, हेमंत कांबळे व इतर महिला सदस्य उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments