Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशPhoto Viral : अपघातही रोमॅन्टीक; धडक दिलेल्या गाडीवर उमटला असा विचित्र आकार,...

Photo Viral : अपघातही रोमॅन्टीक; धडक दिलेल्या गाडीवर उमटला असा विचित्र आकार, की पाहणारे हैराण…

Photo Viral : अपघातही रोमॅन्टीक; धडक दिलेल्या गाडीवर उमटला असा विचित्र आकार, की पाहणारे हैराण…

[ad_1]

Viral Couple Kissing Face on Car After Accident: आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना या घडत असतात. त्यातून काही अत्यंत भीषण असतात तर काही अत्यंत हास्यास्पद असतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा इन्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. खरंतर या गाडीचा अपघात झाला आहे. परंतु त्यानंतर त्याच्यावर उमटलेले चित्र म्हणजेच अपघातानंतर गाडीवर जे दिसलं त्यानंतर तुम्हालाही पोटभर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

इन्टाग्रामवर अशी एक पोस्ट काही दिवसांपुर्वी शेअर करण्यात आली होती जी अल्पवधीतच प्रचंड व्हायरल झाली आहे. आपल्या कारला जोरात कोणी मागून ठोकले की आपल्याला राग येतो आणि संताप तर अगदी अनावर होतो. त्यातून आपल्या गाडीवर ठोकल्याच्या खूणाही उमटतात. परंतु तुम्ही कधी नीट पाहायलं आहे का की त्यात खूणांतून नक्की काय नक्षी तयार होते? ही पोस्ट पाहिल्यानंतर नक्कीच पाहायला सुरूवात कराल. 

या पोस्टखाली नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. एकानं कमेंट आहे की, ”बघणाऱ्याला नजर हवी ती तुमच्यावरच्या एक्या वाक्यामुळे बरोबर जाते” तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ”भारतीय लोकांमधे खूप कुटून कुटून टॅलेंट भरलेलं आहे फक्त ते नको तिथे दिसून येतं” तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ”आता गाडी नीट करायचं डोक्यात नाही दिसत भावाच्या”. तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ”क्वचित घडणाऱ्या गोष्टी”.

पुढे एकानं भन्नाट कमेंट करत लिहिलंय की, ”हे बघताना माझे डोळे कशे फुटले नाय” तर तिसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ”वाटतच नाही की अपघात आहे.” अशाच एका युझरनं लिहिलंय की, ”पोरं धडकली वाटत”. असंच एकानं लिहिलंय की, ”भाऊ मला अस वाटतं आहे की तो अपघात नाही. कला आहे ती”. तर अशाच एकानं लिहिलंय की, ”वरि किस चालु हाय आनि खाली गेम चालु हाय का”

अपघातातून कारच्या मागे चपलेल्या भागावर एक कपल दिसतो आहे. जोडप्यानं कीस केलं आहे असं यात दिसून येतं आहे. असा हा रोमॅण्टिक आकार तयार झाला आहे. मागील बाजूला असल्यानं सगळेच जणं याचा फोटो काढताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. @marathi_jokes_official या इन्टाग्राम पेजवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘अपघात पण पाहा कसा रोमॅण्टिक झाला आहे’ असं कॅप्शनही या पोस्टसोबत शेअर करण्यात आलं आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments