Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटणची विद्यार्थीनी अदिती पावने हिची नॅशनल डान्स स्पर्धेसाठी अयोध्या येथे निवड

फलटणची विद्यार्थीनी अदिती पावने हिची नॅशनल डान्स स्पर्धेसाठी अयोध्या येथे निवड

फलटण :- महाराष्ट्र स्टेट डान्स असोसिएशन यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेसाठी मुधोजी हायस्कूल फलटणची विद्यार्थीनी अदिती पावने हिची नॅशनल डान्स स्पर्धेसाठी अयोध्या येथे निवड झाली आहे .

आदिती पावणे हिचे सातारा जिल्ह्यातून 14 वयोगटा खाली गटामध्ये नृत्या साठी निवड झालेली आहे.. ही नृत्य स्पर्धा अयोध्या येथे दिनांक शनिवार 31 ऑगस्ट 2024 रोजी पार पडणार आहे.. अदिती नृत्यकला अकॅडमी येथे नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे, तसेच मा. प्राचार्य श्री. सुधीर अहिवळे सर यांचे तिला मार्गदर्शन लाभलेले आहे, अदितीचा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्या कारणाने या स्पर्धेसाठी मा. श्री. संजीव राजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी विशेष अशी आर्थिक मदत या स्पर्धेला जाण्यासाठी केली आहे.. अदितीला नृत्य स्पर्धे साठी मुधोजी हायस्कूल सर्व शिक्षकांनी, प्राचार्यांनी तसेच मा. आमदार श्री. दीपक राव चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.. नृत्यामध्ये फलटण तालुक्याचे नाव आयोध्या नगरीमध्ये उंचवणार असे आश्वासन अदितीने दिले आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments