फलटण | प्रतिनिधी : आगामी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, उत्साहात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत पार पडावी, यासाठी फलटण शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील काही वर्षांतील गणेशोत्सव तसेच इतर उत्सवांच्या काळात गुन्हे दाखल असलेल्या इसमांकडून पुन्हा गैरकृत्य घडू नये, या उद्देशाने एकूण ४३ जणांविरुद्ध मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (२) अन्वये संबंधित व्यक्तींना २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच तालुका हद्दीत वावर करण्यास किंवा थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.
या कारवाईत खालील व्यक्तींचा समावेश आहे :
विशाल पांडुरंग माळी, देविदास बापू माळी, संपत भरत माळी, अजय पांडुरंग माळी, रंगराव भरत माळी, अमर राजू माळी, नेताजी प्रकाश माळी, प्रकाश काळुराम माळी, अमोल आकाराम मोरे, रमेश संजय माळी, अजय रघुनाथ माळी (सगुणामाता नगर, मलठण);
करण संजय सरगर, मंगेश किसन बेंद्रे, रोहन महेश सरगर (खाटीक गल्ली); किशोर धनराज पवार, धनराज लक्ष्मण पवार (कसबापेठ); अमित अनिल कदम, राहुल बजरंग पोतेकर, सुरज हिंदुराव कदम, बजरंग राजेंद्र खलाटे (रविवारपेठ);
वरद विद्याधर भोईटे (नरसिंह चौक), प्रविण तुळशीराम नाळे (जाधववाडी), किरण कुमार घोरपडे (ढवळ), अजय संभाजी भोसले (शेलारवस्ती, ठाकुरकी), अभिजित जयवंत खराडे व सचिन जयवंत खराडे (पवार गल्ली), महेश विलास आवारे (मंगळवारपेठ), हेमंत दत्तात्रय शिरतोडे (रविवारपेठ), शिवाजी जगन्नाथ डोईफोटे (नवामळा, ठाकुरकी);
बिलाल रफिक कुरेशी, झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी, आबु ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी, मुबारक हनिफ कुरेशी, शाहरुख जलील कुरेशी, अजिम शब्बीर कुरेशी (कुरेशीनगर); तसेच शंकर रामराव जुवेकर व अजय संजय जाधव (महतपुरापेठ) यांचा समावेश आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
