Tuesday, August 11, 2026
Homeसाताराफलटण एस.टी. आगाराला 10 नव्या बसची भेट; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर...

फलटण एस.टी. आगाराला 10 नव्या बसची भेट; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण

फलटण, 14 फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) फलटण आगारासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यात 10 नवीन बस उपलब्ध झाल्या असून, आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी या लालभडक एस.टी. बसेसची भेट प्रवाशांना मिळाली आहे.

फलटण आगारातून मुंबई, पुणे, मलकापूर, औरंगाबाद, नाशिक, नगर, कोल्हापूर आदी शहरांसह तालुक्यातील विविध गावांत सुमारे 110 बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, गेल्या 10-12 वर्षांपासून जुन्या बसेस प्रवासी वाहतुकीस अयोग्य ठरत असल्याने अनेक लांब पल्ल्याच्या मार्गांवरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. स्थानिक मार्गांवरील बसफेऱ्याही कमी झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे गतसप्ताहात फलटण आगारासाठी किमान 20 नवीन बसेस मिळाव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात अशोक लेलँड BS-6 मॉडेलच्या 10 नवीन बसेस फलटण आगारात दाखल झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार उर्वरित बसेस लवकरच मिळणार आहेत.

दरम्यान, फलटण बसस्थानक व आगाराची इमारत जुनी झाल्याने आणि प्रवासी संख्या वाढत असल्याने नवीन, अद्ययावत व सुसज्ज इमारतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आज 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत या नव्या बससेवेचे लोकार्पण करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments