Saturday, September 12, 2026
Homeसातारासायकल रॅलीद्वारे फलटणमध्ये स्वच्छतेचा संदेश, 2 ऑक्टोबरला विशेष आयोजन

सायकल रॅलीद्वारे फलटणमध्ये स्वच्छतेचा संदेश, 2 ऑक्टोबरला विशेष आयोजन

फलटण : महात्मा गांधी जयंती निमित्त फलटण नगरपरिषद आणि फलटण सायकल असोसिएशनच्या संयुक्त पुढाकाराने ‘स्वच्छता ही सेवा-2024’ उपक्रमांतर्गत दि. 2 ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीतून स्वच्छतेविषयी जागरूकता, पर्यावरणपूरक संसाधनांच्या वापराबाबत कटिबद्धता आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला जाणार आहे.

फलटण नगरपरिषद प्रशासक निखील मोरे यांनी नागरिकांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 7.15 वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरातून रॅलीची सुरुवात होईल आणि फलटण नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या प्रांगणात समाप्ती होईल.

रॅलीचा मार्ग:
महात्मा गांधी चौक (पुतळा परिसर) – महात्मा फुले चौक – श्रीमंत मालोजीराजे पुतळा – गिरवी नाका – लाकडी चौक – डी.एड. कॉलेज – पृथ्वी चौक – नाना पाटील चौक – पुणे रोड – पालखी रोड – उम्ब्रेश्वर चौक – हरिबुवा मंदिर – सिमेंट रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक – भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक – फलटण नगरपरिषद जुनी इमारत प्रांगण.

सर्व स्थानिक पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments