
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यतातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक-टँकर चालकांनी संप सुरू केला आहे. यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही, या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे. ट्रक चालकांच्या आंदोलनाचा सोमवारी सायंकाळपासून परिणाम दिसू लागला आहे असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.






