Pankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन; अक्षय कुमारचं भावनिक ट्विट

0
15
Pankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन; अक्षय कुमारचं भावनिक ट्विट


अभिनेते पंकज त्रिपाठी हे बिहारच्या गोपालगंजचे रहिवासी आहेत. चित्रपट विश्वात नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले होते. करिअरमध्ये जम बसल्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले होते. परंतु, त्यांचे आई-वडील मात्र बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावातच राहत होते. अनेकदा आपल्या मुलाखतींदरम्यान पंकज त्रिपाठी आपल्या आई-वडिलांबद्दल भरभरून बोलायचे. एका मुलाखतीदरम्यान पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांचा संदर्भ देत म्हटले होते की, त्यांच्या वडिलांना ते फिल्मी दुनियेत काय काम करतात हे देखील माहित नाही.



Source link