Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar News : गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, पालघरच्या वाडा येथील...

Palghar News : गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, पालघरच्या वाडा येथील दुर्दैवी घटना

Palghar News : गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, पालघरच्या वाडा येथील दुर्दैवी घटना

[ad_1]

Palghar News : दीड दिवसांच्या गणपती विसर्जन (Ganesh Visarjan 2023) करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 
      

दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गो-हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला असून यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य( वय 38)सुरज नंदलाल प्रजापती (25)अशी कोनसई येथील नाल्यात तर प्रकाश नारायण ठाकरे( वय 35)हा गो-हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

 

विसर्जन करताना काळजी घ्या
पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. काही जणांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो. त्यामुळे बुधवारी काहींनी गणेशाचे विसर्जन केले. पण, वाडा येथे दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments