Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशPadma Bhusham thief arrested | चक्क पद्मभूषण गेला चोरीला; सोनाऱ्याच्या हुशारीमुळे चोर...

Padma Bhusham thief arrested | चक्क पद्मभूषण गेला चोरीला; सोनाऱ्याच्या हुशारीमुळे चोर जेरबंद | Navarashtra (नवराष्ट्र)

Padma Bhusham thief arrested | चक्क पद्मभूषण गेला चोरीला; सोनाऱ्याच्या हुशारीमुळे चोर जेरबंद | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

चक्क पद्मभूषण गेला चोरीला; सोनाऱ्याच्या हुशारीमुळे चोर जेरबंद

पंजाब यूनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरु जीसी चटर्जी यांचे पद्मभूषम पदक चोरीला गेले. मात्र दिल्ली पोलिसांनी लगेचच शोधकार्य सुरु करत चोरट्यांना अटक केली आहे.

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. पंजाब यूनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरु जीसी चटर्जी यांना पद्मभूषम पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मात्र त्यांचे पद्मभूषम पदक चोरीला गेले. मात्र दिल्ली पोलिसांनी लगेचच शोधकार्य सुरु करत चोरट्यांना अटक केली आहे. यामध्ये सोनाऱ्याने दाखवलेल्या हुशारीमुळे चोरांना अटक करण्यास मदत झाली आहे.

दिल्ली पोलिसांनी पद्मभूषण चोऱ्यांना अटक केलेल्यांची नावे, श्रवण कुमार (वय 33 वर्षे), हरि सिंह (वय 45 वर्षे), रिंकी देवी (वय 40 वर्षे), वेद प्रकाश (वय 39 वर्षे) आणि प्रशांत बिस्वास (वय 49 वर्षे) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी मदनपूर खादरचे रहिवासी आहेत. या आरोपींमधील रिंकी देवी, वेद प्रकाश आणि हरि सिंह हे मंगळवारी सोन्याच्या दुकानामध्ये पुरस्कार विकण्यासाठी आले होते. प्रशांत बिस्वास याच्या ज्वेलरी शॉप मध्ये आरोपी लोक पद्मभूषण पुरस्काराचे पदक घेऊन आले होते. मात्र सोनाऱ्याने पद्मभुषण स्वीकारले नाही. आणि याची माहिती पोलिसांना कळवली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments