Sunday, October 18, 2026
Homeफलटणकन्या पूजनातून स्त्री शक्तीचा गौरवमुलींच्या आरोग्याविषयी जागृती

कन्या पूजनातून स्त्री शक्तीचा गौरवमुलींच्या आरोग्याविषयी जागृती

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण येथे अनंतमाला देवी नवरात्र उत्सवाचे प्रथम पुष्प उत्साहात

फलटण प्रतिनिधी :- मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे श्रीमंत अनंतमाला देवी शारदीय नवरात्र उत्सव २०२६–२७ अंतर्गत प्रथम पुष्पाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कन्यापूजन व वाढत्या वयातील मुलींचे आरोग्य या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीच्या चेअरमन माननीय सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सुभद्राराजे नाईक निंबाळकर (माजी नगरसेविका), माननीय डॉ. माननीय डॉक्टर विक्रांत रसाळ, दिव्या रसाळ व माननीय डॉ. श्रुती थिटे उपस्थित होत्या.
माननीय डॉक्टर विक्रांत रसाळ यांनी विद्यार्थ्या ंच्या मानसिक आरोग्य विषयी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे नियोजन, मार्गदर्शन व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. पूनम शिंदे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय श्रीमती जयश्री कदम यांनी करून दिला. श्रीमती रामेश्वरी जाधव यांनी आभार मानले.

कन्यापूजनाच्या माध्यमातून मुलींचा सन्मान, त्यांच्यातील आत्मविश्वास आणि स्त्रीशक्तीचा गौरव अधोरेखित करण्यात आला. वाढत्या वयातील मुलींचे आरोग्य, शारीरिक बदल, स्वच्छता आणि आरोग्यविषयक योग्य सवयी याबाबत मार्गदर्शन केल्यामुळे हा कार्यक्रम मुलींसाठी तसेच उपस्थितांसाठी उपयुक्त ठरला.

अशा उपक्रमांमधून विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच स्त्रीशक्तीचा आदर आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments