Saturday, September 12, 2026
Homeक्रीडामुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

फलटणः मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी मधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. २३ ऑगस्ट व शनिवार दि.२४ ऑगस्ट २०२४ या दोन दिवशी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारे खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा घेण्याचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.३०. वा. मुधोजी

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.पी.एच. कदम यांच्या शुभहस्ते होणार आहे. व डी. एम. देशमुख उपप्राचार्य कनिष्ठ विभाग हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत.

या स्पर्धेमध्ये खो-खो (मुले, मुली), कबड्डी, (मुले, मुली), थलेटिक्स (१०० मीटर व ४०० मीटर धावणे), गोळाफेक (मुले-मुली) इत्यादी सांधिक व वैयक्तिक खेळ प्रकारांचा समावेश

करण्यात आला आहे. या क्रीडा स्पर्धेतील सांधिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडू यांना प्राविण्य प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे. सदरच्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी कनिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख शेंडगे टी. एम. व खेळ समन्वयक शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कनिष्ठ जिमखाना विभाग समितीने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments