Friday, August 14, 2026
Homeफलटणफ . न . प प्रभाग १२ मधील विद्यार्थ्यांसाठी वही वाटप कार्यक्रमाचा...

फ . न . प प्रभाग १२ मधील विद्यार्थ्यांसाठी वही वाटप कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ

श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम

फलटण | प्रतिनिधी :- फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक १२ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळावा आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा  सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर (महाराज साहेब) यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे नानासाहेब इवरे, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, नगरसेवक विकास वसंतराव काकडे (सर), नगरसेविका स्मिता संगम शहा, पंचायत समिती सदस्य सोनवलकर साहेब, तसेच सुस्मित शहा, ज्ञानेश्वर मोहिते आणि अक्षय मठपती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद असून प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.

उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन करत, भविष्यात समाज व देशाच्या विकासात मोलाचे योगदान देण्याचा संदेश दिला. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

“शिक्षण हीच खरी ताकद – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा सदैव प्रयत्न!” या संदेशासह कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments