Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशNitish Kumar Political Career | मित्रपक्ष बदलत राहिले मात्र खुर्चीवर टाच येऊ...

Nitish Kumar Political Career | मित्रपक्ष बदलत राहिले मात्र खुर्चीवर टाच येऊ दिली नाही.. नितीशकुमार 23 वर्षात 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार | Navarashtra (नवराष्ट्र)

Nitish Kumar Political Career | मित्रपक्ष बदलत राहिले मात्र खुर्चीवर टाच येऊ दिली नाही.. नितीशकुमार 23 वर्षात 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

विद्यार्थीदशेपासून राजकारणात आलेल्या नितीश कुमार यांनी ५ वेळा मित्रपक्ष बदलली. 2005 मध्ये त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांचा राजकीय प्रवास वाचा.

बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय भूमिका बदलली आहे. 2005 पासून ते बिहारमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. दरम्यान, जीतनराम मांझी २० मे २०१४ ते २० फेब्रुवारी २०१५ या काही महिन्यांसाठी स्वतःच्या इच्छेनुसार बिहारचे मुख्यमंत्री बनले. याआधी नितीश कुमार यांनी केंद्र सरकारमधील रेल्वेसह अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. 2000 मध्ये ते पहिल्यांदाच सात दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून 23 वर्षे उलटून गेली आहेत. आतापर्यंत त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज सोमवारी (28 जानेवारी) ते नवव्यांदा शपथ घेणार आहेत.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील मंत्रीपदाच्या कार्यकाळापासून नितीश यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक राजकीय चढउतार आले. या वर्षांत त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मित्रपक्ष बदलत राहिले, पण नितीशकुमार खुर्चीवर कायम राहिले. आज  जाणून घेऊयात नितीश कुमार यांच्या राजकीय प्रवासाविषयी..  ज्यामध्ये त्यांनी बिहारमध्ये कोणाच्याही सोबतीने सरकार बनवले असले तरी मुख्यमंत्री तेच राहिले आहेत. आता ते आज नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments