
नाशिकमध्ये आज दुपारी चार वाजताच्या सुमारास ढग दाटून आले होते. ज्यामुळे वातावरण अंध:कारमय झाले. यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, मनमाड, निफाड आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, चांदवड, निफाड आणि मनमाडमध्ये गारपीटसह पाऊस झाल्याने कांदा आणि द्राक्षांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.






