Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशNarendra Modi Oath Ceremony | ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ...

Narendra Modi Oath Ceremony | ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ की’; नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ | Navarashtra (नवराष्ट्र)

Narendra Modi Oath Ceremony | ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ की’; नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ की’; नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ

दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यावेळी अनेक खासदारांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हू की’ असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे ठरले आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा यांनी देखील केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या साक्षीने शिवराजसिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर महिला केंद्रीय मंत्री म्हणून पहिल्यांदा निर्मला सीतारमन यांनी देखील शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर सुब्रमण्यम जयशंकर यांनी देखील शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेतली आहे. यापूर्वी त्यांनी मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.  त्याचबरोबर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्याचे एएनआयने फोटो शेअर केले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments