
Nagpur news update : अवघ्या देशात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्व जन दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. काही ठिकाणी साफसफाई सुरू आहे तर काही ठिकाणी दिवाळी फराळ तयार करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या दरम्यान, नागपूरमध्ये एक विपरीत घटना उघडकीस आली आहे. दिवाळी साफ सफाई सुरू असतांना अचानक कपाट पडल्याने एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नागपुरातील इससानी भागात घडली आहे.








