[ad_1]
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या वतीनं मुंबईत गांधी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची यात्रा मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटजवळ येताच पोलिसांनी यात्रेला अडवलं. यावेळी पोलीस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली असून काही लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी आमदार अबु आझमी यांना ताब्यात घेतलं असून काँग्रेस, समाजवादी पार्टी, आप आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची मुंबई पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. फॅशन, स्ट्रीटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेट्स आंदोलकांनी तोडून टाकले. यावरूनच पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे.
[ad_2]
Source link
