Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशMozambique Boat Sinks | मोझांबिकमध्ये बोट उलटून भीषण अपघात, समुद्राच्या खोल पाण्यात...

Mozambique Boat Sinks | मोझांबिकमध्ये बोट उलटून भीषण अपघात, समुद्राच्या खोल पाण्यात 90 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मोझांबिकमध्ये बोट उलटून भीषण अपघात, समुद्राच्या खोल पाण्यात 90 जणांचा मृत्यू

मोझांबिकच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर बचाव कर्मचाऱ्यांना 5 जण जिवंत सापडले असून अजून अनेकांचा शोध सुरू आहे. मात्र, सागरी परिस्थितीमुळे शोध मोहिमेत अडचणी येत आहेत.

आग्नेय आफ्रिकेतील असलेल्या मोझांबिक देशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोझांबिकच्या उत्तर किनाऱ्यावर गर्दीने भरलेली बोट बुडाल्याने (Mozambique Boat Sinks) 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोझांबिकच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी नामपुला प्रांताजवळील एका बेटावर ही बोट जात होती. यावेळी बोटमध्ये जवळपास 130 लोकं प्रवास करत होते. मात्र, अचानक ही बोट बुडाली आणि 90 लोकांना जलसमाधी मिळाली.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार,रविवारी (७ एप्रिल) ही घटना घडली. नामपुला राज्य सचिव जैमे नेटो यांनी सांगितले की बोट क्षमतेपेक्षा जास्त लोक घेऊन जात होती. ती प्रवाशांना घेऊन जाण्यासही योग्य नव्हती. यामुळे बोट उलटून बुडाली. मृतांमध्ये अनेक मुलेही आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. प्रवाशांचा शोध घेताना मोझांबिकच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर 5 जण जिवंत सापडले असून अजून अनेकांचा शोध सुरू आहे. मात्र, सागरी परिस्थितीमुळे शोध मोहिमेत अडचणी येत आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments