
भिंवडी येथील ओबीसी मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका करताना त्यांना बेवडा संबोधले. भुजबळ म्हणाले की, आधीच मर्कट त्यात मद्य प्याले. जरांगे मला पाहून घेण्याची भाषा करतो, पण आधी स्वत:ची तब्येत सांभाळा. दारू पिऊन किडन्या खराब झाल्या आहेत. या टीकेनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे.






