Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रमाळेगाव साखर कारखाना ठरला राज्यात ऊसाला सर्वोच्च दर देणारा

माळेगाव साखर कारखाना ठरला राज्यात ऊसाला सर्वोच्च दर देणारा

पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं 2022-23 हंगामात गाळप केलेल्या ऊसाला 3,411 रुपयांचा दर जाहीर केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी ही घोषणा केली. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असून, माळेगाव कारखान्याने सोमेश्वर साखर कारखान्यापेक्षा अधिक दर दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती सभेत दिलेला शब्द खरा ठरला आहे.

माळेगावने सोमेश्वर कारखान्याची घेतली आघाडी

काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊसाला 3,350 रुपयांचा दर जाहीर केला होता. मात्र, आता माळेगाव कारखान्यानं अधिक दर जाहीर केला आहे. त्यामुळे माळेगाव हा राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव साखर कारखाना काम करत आहे.

एफआरपीपेक्षा 561 रुपये जादा दर

माळेगाव साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा 561 रुपयांचा अधिकचा दर देणार आहे. गेटकेनधारक शेतकऱ्यांना 3,100 रुपये प्रमाणे ऊसाचे अंतिम बिल दिलं जाणार आहे. माळेगाव साखर कारखान्यानं गेल्या हंगामात 12.57 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून, 13.29 लाख क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

अजित पवारांचा शब्द खरा ठरला.           उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीच्या सभेत माळेगाव कारखाना अधिकचा दर देईल, असे सांगितले होते. अखेर त्यांच्या आश्वासनाची पूर्तता झाली असून, माळेगाव कारखान्याने 3,411 रुपयांचा दर जाहीर केला आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments