Sunday, September 27, 2026
Homeदेश-विदेशKuwait Fire | कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत अनेक भारतीयांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून आर्थिक...

Kuwait Fire | कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत अनेक भारतीयांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत अनेक भारतीयांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा

कुवेतमध्ये ज्या इमारतीत ही भीषण आग लागली त्या इमारतीत 160 लोक राहत असल्याची माहिती दिली जात आहे. यातील अनेक जण भारतातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

मंगफ : कुवेतमध्ये एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 49 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक भारतीयांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी (दि.12) सकाळी सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात आग लागली. या आगीच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, बाधितांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे.

कुवेतमध्ये ज्या इमारतीत ही भीषण आग लागली त्या इमारतीत 160 लोक राहत असल्याची माहिती दिली जात आहे. यातील अनेक जण भारतातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments