
‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ मालिकेत अभिनेत्री नयना आपटे, रेवती लिमये, शर्वनी पिलये, महिमा म्हात्रे, सीमा देशमुख, दुर्वा देवधर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सगळ्या अभिनेत्रींनी साकारलेले प्रत्येक पात्र हे मसाल्यांप्रमाणे तिखट आहे. म्हणजेच जसं की, या मालिकेतील तेंडुलकरांच्या घरातील सानिका जरी शेंडेफळ असली तरी, तिची तऱ्हा ही लाल मिरचीसारखी आहे. तर, चाळिशीतल्या पल्लवी सदावर्ते अगदी लवंगप्रमाणे आहेत. तर, तिशीतल्या दिव्याची काळीमिरीसारखी तऱ्हा आहे. अशा या तिखट तऱ्हा असणाऱ्या महिला त्यांच्या घरी पुरुषांना स्थान मिळू देतील का?, हे पाहणं रंजक ठरेल. मालिकेत अनुज साळुंखे, विनय एडेकर, अमित खेडेकर, अजिंक्य जोशी या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.










