Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशJharkhand Politics : झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत...

Jharkhand Politics : झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM

[ad_1]

झारखंडमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन बुधवारी आपल्या पदाची राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला.

राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. हेमंत सोरेन परतल्यानंतर आमच्या आघाडीने हा निर्णय घेतला आणि आम्ही हेमंत सोरेन यांची नेतेपदी निवड केली. आता मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक करण्यापूर्वी हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर झामुमोच्या ६७ वर्षीय नेत्याने २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

ट्रेंडिंग न्यूज

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments