Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas war | इस्रायल आणि हमासच्या हल्ल्यात 1100 हून अधिक लोकांचा...

Israel Hamas war | इस्रायल आणि हमासच्या हल्ल्यात 1100 हून अधिक लोकांचा मृत्यू, अमेरिकेसह फ्रान्सच्या नागरिकांचाही समावेश! | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas war | इस्रायल आणि हमासच्या हल्ल्यात 1100 हून अधिक लोकांचा मृत्यू, अमेरिकेसह फ्रान्सच्या नागरिकांचाही समावेश! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये युद्ध सुरू आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जवळपास 1000 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांमध्ये शनिवारपासून जोरदार युद्ध (Israel Hamas war) सुरू आहे. या युद्धातील मृतांची संख्या 1100 च्या वर गेली आहे. मृतांमध्ये अमेरिका आणि फ्रान्सच्या नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी हमासने इस्रायलवर एका पाठोपाठ पाच हजार रॉकेट डागले. तसेच मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून लोकांना ओलीस ठेवले. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायली हवाई दल बॉम्बफेक करून गाझा पट्टीतील हमासची जागा उद्ध्वस्त करत आहे. त्याचवेळी इस्रायली सैनिक दहशतवाद्यांशी आमनेसामने लढत आहेत.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया सुरु असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments