Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशIsrael-Hamas War | इस्रायलवर हिजबुल्लाहने केला सर्वात मोठा हल्ला, लेबनानमधून डागले 200...

Israel-Hamas War | इस्रायलवर हिजबुल्लाहने केला सर्वात मोठा हल्ला, लेबनानमधून डागले 200 रॉकेट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायलवर हिजबुल्लाहने केला सर्वात मोठा हल्ला, लेबनानमधून डागले 200 रॉकेट

इस्रायलच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर अबू तालेब मारला गेला होता. याच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाहने हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. हा हल्ला बदला घेण्यासाठी करण्यात आला, असे हिजबुल्लाहनेही म्हटले आहे.

तेल अव्हीव : इस्रायलवर हिजबुल्लाहने सर्वात मोठा हल्ला केला आहे. यामध्ये लेबनानमधून 200 रॉकेट डागल्याची माहिती दिली जात आहे. या हल्ल्यांमुळे चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वी हिजबुल्लाहचा कमांडर अबू तालेब मारला गेला होता. त्याचाच बदला म्हणून आता हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केला आहे.

हिजबुल्लाहने यापूर्वी इस्रायलवर 200 रॉकेट डागले होते. इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाहने गुरुवारी इस्रायलवर 150 पेक्षा अधिक मोठे रॉकेट आणि 30 ड्रोन हल्ले केले. त्यांच्या रॉकेट आणि ड्रोनने इस्रायली सैन्याच्या 9 ठिकाणांना निशाणा बनवले. या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गाझामध्ये हमाससोबत इस्रायलचा संघर्ष आता हिजबुल्लासोबतही वाढू शकतो.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments