Friday, August 28, 2026
Homeसाताराआगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखती 9 ऑक्टोबरला

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखती 9 ऑक्टोबरला

फलटण :- वंचित बहुजन आघाडीने आगामी 2024 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीच्या मुलाखती 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या मुलाखती सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी घेण्यात येणार असून राज्य निवडणूक समन्वय समितीचे राज्य सदस्य प्रा. सोमनाथ साळुंखे या मुलाखतींचे नेतृत्व करणार आहेत.

मुलाखतीचे सत्र सातारा जिल्ह्यातील विश्रामगृहात पार पडणार असून, सातारा-जावळी, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, आणि पाटण या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

वंचित घटकांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात मोर्चेबांधणी सुरू आहे. पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर मुलाखतीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. ऑनलाईन, ऑफलाईन आणि ईमेलद्वारे अर्ज केलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी विहीत अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि परिचयपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई आणि महासचिव गणेश भिसे यांनी केले आहे.

या मुलाखती 9 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार असून, अधिक माहितीसाठी पक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments