Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशIndia and Maldives | मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली भारतीयांची माफी; व्यक्त केली...

India and Maldives | मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली भारतीयांची माफी; व्यक्त केली चिंता | Navarashtra (नवराष्ट्र)

India and Maldives | मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली भारतीयांची माफी; व्यक्त केली चिंता | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली भारतीयांची माफी; व्यक्त केली चिंता

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी शुक्रवारी भारताच्या बहिष्काराबाबत चिंता व्यक्त केली. माजी राष्ट्राध्यक्ष नशीद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफीसुद्धा मागितली आहे.

दिल्ली : मागील काही दिवसांपासून भारत आणि मालदीव देशामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम मालदीवच्या पर्यटनावर देखील झाला आहे. मालदीव व पाकिस्तानामध्ये जवळीक वाढली आहे अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. यानंतर मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी शुक्रवारी भारताच्या बहिष्काराबाबत चिंता व्यक्त केली. माजी राष्ट्राध्यक्ष नशीद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफीसुद्धा मागितली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारतीयांची माफी मागत काळजी व्यक्त केली आहे. मोहम्मद नशीद म्हणाले, “मी भारतीय लोकांना त्यांच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटनासाठी मालदीवमध्ये येण्याचे आवाहन करू इच्छितो, आमच्या आदरातिथ्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. भारताच्या बहिष्काराचा मालदीववर मोठा परिणाम झाला आहे, असं म्हणत मला याबद्दल खूप काळजी वाटत असून, मालदीवच्या लोकांनाही याबद्दल खेद वाटतोय, जे घडले याबद्दल आम्हाला खेद वाटत असल्याची भावनाही मोहम्मद नशीद यांनी बोलून दाखवली




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments