Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यात रोहित्र चोरी रोखण्यासाठी रामराजेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

फलटण तालुक्यात रोहित्र चोरी रोखण्यासाठी रामराजेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक


फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील वाढत्या वीज वितरण कंपनीच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी माजी विधान परिषदेचे सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठक सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्या उपस्थितीत सातारा सरकारी विश्रामगृहात झाली.

या बैठकीत, रोहित्र चोरी कशी थांबवता येईल यावर सखोल चर्चा झाली. मुख्यत: रात्री शस्त्रधारी पोलीस आणि महावितरणचे कर्मचारी यांची गस्त वाढवणे, शेतकऱ्यांना जागरूक करून रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ पोलिस आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले. आतापर्यंत पकडलेल्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्याची सूचनाही देण्यात आली.

महावितरणच्या नव्या 33/11kv सबस्टेशनच्या उभारणीसह, 22kv लाईन 11kv वर रूपांतरित करून तांब्याच्या रोहित्रांऐवजी अल्युमिनियमचे रोहित्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये घट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

श्रीमंत रामराजेंनी पुढील काळात शक्य तेथे महावितरणचे संपूर्ण नेटवर्क 11kv वोल्टेजवर रूपांतरित करण्याचे आदेश दिले. या बैठकीला फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर, आणि शिवाजी रेड्डी उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments