
[ad_1]
बंगालच्या उपसागरात हमून चक्रीवादळ सक्रीय झालं आहे. सध्या हे वादळ बांगलादेशच्या किनारी भागांत असून येत्या काही तासांत भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. परिणामी हवामान खात्याने त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम या पाच राज्यांना अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये पुढील एक ते दोन दिवसांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रकिनाऱ्यावर मोठ-मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं किनारी भागांतील नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
[ad_2]
Source link
