Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रअकलूज प्रभाग ९ व १० मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा; पुण्याकडे...

अकलूज प्रभाग ९ व १० मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा; पुण्याकडे रवाना

अकलूज प्रभाग ९ व १० मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा; पुण्याकडे रवाना

अकलूज प्रतिनिधी : अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ व १० मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमांतर्गत लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना पुणे येथील मोहम्मदवाडी परिसरातील रुग्णालयाच्या दिशेने पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे, नगरसेवक विलास क्षिरसागर तसेच अन्नपूर्णा सांस्कृतिक भवनचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोहन तिकोटे यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेविका प्रतिभाताई गायकवाड आणि उद्योजक विलास गायकवाड यांच्या सहकार्याने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनाही या मोफत नेत्रशस्त्रक्रिया सुविधेचा लाभ मिळाला.

आर्थिक परिस्थितीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने लाभार्थी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक ९ व १० मधील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत असून, सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे लाभार्थी नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments