Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशHamas Music Festival Attack | इस्रायलमधील म्युझिक फेस्टिवलमध्ये मृत्यूताडंव, हमासच्या केलेल्या नरसंहारात...

Hamas Music Festival Attack | इस्रायलमधील म्युझिक फेस्टिवलमध्ये मृत्यूताडंव, हमासच्या केलेल्या नरसंहारात 260 नागरिकांनी गमावला जीव! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायलमधील म्युझिक फेस्टिवलमध्ये मृत्यूताडंव, हमासच्या केलेल्या नरसंहारात 260 नागरिकांनी गमावला जीव!

हमासच्या आंतकवाद्यांनी इस्रायलमध्ये एका म्युझिक फेस्टिव्हल (Nova Music Festival) वर हल्ला करुन शेकडो लोकांचा जीव घेतला आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना हमास यांच्यामध्ये शनिवारपासून संघर्ष सुरू आहे. आधी हमासने इस्रायलवर रॅाकेट डागले, त्यात अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर संतापलेल्या इस्रायलने प्रत्तुत्तर देत पॅलेस्टिवर हल्ला केला. या हमासच्या आंतकवाद्यांची क्रुरता दाखवणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हमासच्या आंतकवाद्यांनी इस्रायलमध्ये एका म्युझिक फेस्टिव्हल (Nova Music Festival) वर हल्ला करुन शेकडो लोकांचा जीव घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

इस्रायलमध्ये नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हमासने हल्ला (Hamas Music Festival Attack) केला. रविवारी गाझा जवळील किबुट्झ रीइम (Kibbutz Re’im) जवळ हा म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. ज्यूंचा सण सुक्कोट (Sukkot)च्या समाप्तीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सुमारे 3,000 लोक सहभागी झाले होते. ज्यामध्ये बहुतेक तरुण हे इस्रायली होते. या हल्ल्यात 260 लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments