फलटणच्या मलठण येथे वीरशैव लिंगायत समाजाचा भव्य शिवलिंग दीक्षा विधी सोहळा; ५ सप्टेंबर रोजी आयोजन
फलटण प्रतिनिधी : वीरशैव लिंगायत समाज, फलटण यांच्या वतीने शिवलिंग दीक्षा विधी सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा श्री. सद्गुरु हरिबाबा महाराज समाधी मंदिर, मलठण येथे संपन्न होणार आहे.
या शिवलिंग दीक्षा विधी सोहळ्यास श्री.ष.ब्र. १०८ ज्ञानभास्कर सदगुरू महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांचे गुरुसानिध्य लाभणार आहे. वीरशैव लिंगायत समाजातील भाविकांसाठी हा सोहळा श्रद्धा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी दक्षिणा रु. ३०० तसेच शिवलिंग साहित्य निश्चित करण्यात आले आहे. दीक्षा घेण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांनी सोबत ताम्हण, तांब्या आणि पूजेचे आवश्यक साहित्य घेऊन यावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
तसेच शिवलिंग दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी आपली नावनोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणीसाठी श्री. नंदकुमार स्वामी, प्रा. सतीश जंगम, संजय स्वामी, राहुल उदांडे, सतीश स्वामी, संजय मनसुके, चंद्रकांत मेनकुदळे, देवेंद्र जंगम, शिवप्रसाद नडगिरे आणि संतोष महाजन यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
वीरशैव लिंगायत समाजातील जास्तीत जास्त भाविकांनी या पवित्र शिवलिंग दीक्षा विधी सोहळ्यास उपस्थित राहून धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
