Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्रGangster Abu Salem : गँगस्टर अबू सालेम विचारतो ‘मला जेलमधून कधी सोडणार?’...

Gangster Abu Salem : गँगस्टर अबू सालेम विचारतो ‘मला जेलमधून कधी सोडणार?’ टाडा कोर्टने असं खडसावलं…

[ad_1]

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सध्या नाशिकच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर अनेक आरोप असून मार्च १९९३ मध्ये मुंबई शहरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तो आरोपी आहे. भारतातून पळून जाऊन युरोपातील पोर्तुगाल या देशात लपून बसलेल्या अबू सालेमला मुंबई पोलिसांनी २००५ साली काही अटींवर भारतात आणले होते. पोर्तुगालमध्ये एका गुन्ह्यात अबू सालेम जेलमध्ये होता. त्यावेळी भारत-पोर्तुगालदरम्यान गुन्हेगार हस्तांतरण कायद्याद्वारे काही अटींवर मुंबई पोलीस अबू सालेमला भारतात घेऊन आली होती. यातील मुख्य अट म्हणजे अबू सालेमला २५ वर्षापेक्षा जास्त दिवस भारतातील जेलमध्ये ठेवता येणार नाही ही होती. अबू सालेम याने त्याच्या सुटकेची संभाव्य तारीख जाणून घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका विशेष टाडा न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments