Tuesday, September 15, 2026
Homeसाताराडोळ्यांच्या आरोग्यासाठी फलटण भाजपचा पुढाकार – मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि...

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फलटण भाजपचा पुढाकार – मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि शस्त्रक्रिया शिबिर

फलटण :- शहरातील नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मा. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाने राबवले जात आहे, अशी माहिती युवा नेते अभिजीत भैय्या नाईक निंबाळकर यांनी दिली.

डोळ्यांच्या वाढत्या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावे आणि आवश्यक ती नेत्र तपासणी व्हावी, या उद्देशाने भाजपने फलटण शहरातील १२ प्रभागात हे शिबिर सुरू केले आहे. या शिबिरात नेत्र तपासणीनंतर आवश्यक असणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार, चष्मा वाटप तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास ती देखील मोफत करण्यात येणार आहे.

शहरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर अध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी सामाजिक कार्यांसाठी सातत्याने उपक्रम राबवत असते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण आणि रोजगार मेळावे यांसारख्या उपक्रमांसोबत आता मोफत नेत्र तपासणी शिबिराचा समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments