Sunday, September 13, 2026
Homeसाताराप्रथम दिवशी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल

प्रथम दिवशी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल

फलटण: २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन अर्ज सादर झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

विडणी येथील हरिभाऊ रामचंद्र मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रस्तावकांमध्ये जगन्नाथ जंगल कापसे, संदीप महादेव पवार, प्रीतम विठ्ठल लोंढे, ज्ञानेश्वर रामचंद्र गायकवाड, विशाल रामचंद्र शिंदे, अमोल पोपट सपाटे, तुषार जगदेवराव नाईक निंबाळकर, अमोल रामचंद्र नाळे, काकासो आबाजी जाधव आणि विकास विजयसिंह कदम यांचा समावेश आहे.

यासोबतच सांगवी येथील रवींद्र रामचंद्र लांडगे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रस्तावकांमध्ये सुधीर चिंतामण अहिवळे, नितीन मारुती जगताप, ज्ञानेश्वर राजाराम बोन्द्रे, अभिजित वासुदेव माळवदे, बापू दत्तात्रय सूर्यवंशी, सचिन जगन्नाथ धुमाळ, मनोज दिलीप ढावरे, नितीन व्हिर्से भोसले, दत्तात्रय माणिक मोहिते आणि सुरज भाऊसो खलाटे यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments