Thursday, October 8, 2026
Homeदेश-विदेशFirecracker Factory | केरळमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट; 25 घरांचे नुकसान;...

Firecracker Factory | केरळमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट; 25 घरांचे नुकसान; 16 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

केरळमधील एका फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात १६ जण जखमी झाले असून यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर एकाच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली.

तिरुअनंतपुरम : केरळमधील एका फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात १६ जण जखमी झाले असून यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर एकाच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली. फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट होण्याची घटना केरळमधील त्रिपुनिथुरा येथील रहिवाशी भागात झालीय. यात एकाचा मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळील कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटली असून, त्याचे नाव विष्णू असून तो तिरुवनंतपुरम येथील राहणारा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान फटाका फॅक्टरीत झालेला स्फोट इतका भीषण होता की, या फॅक्टरीच्या आसपासची २५ घरे जमिनदोस्त झालीत. त जोन दोन वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान फॅक्टरीमध्ये स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments