Thursday, October 8, 2026
Homeदेश-विदेशSupreme Court News | प्रेयसीला तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसारच लग्न करण्याचा सल्ला देणं...

Supreme Court News | प्रेयसीला तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसारच लग्न करण्याचा सल्ला देणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे, सर्वोच्च न्यायालयाकडून प्रियकराला दिलासा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

प्रेयसीला तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसारच लग्न करण्याचा सल्ला देणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे, सर्वोच्च न्यायालयाकडून प्रियकराला दिलासा!

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की दोन लोकांमध्ये भांडणादरम्यान उच्चारलेले शब्द सामान्य स्वरूपाचे असतात, अनेकदा ओघाओघात आपण फार कठोर बोलतो पण त्यामुळे काही गंभीर होण्याची अपेक्षा नसते, तर ते आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखे ठरणार नाही.

‘प्रेम प्रकरणात कुणाचं मन दुखावलं जाणं हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि  प्रेयसीला तिच्या पालकांच्या सल्ल्यानुसारच लग्न करण्याचा सल्ला देणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे.’ असं मत सर्वोच्च न्यायलयानं नोंदवत एका प्रकरणात आरोपी प्रियकरावर सुरू असलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला. त्यामुळे आरोपी प्रियकरला दिलासा मिळाला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया.

हे सुद्धा वाचा

नेमंक काय प्रकरण?

सर्वोच्च न्यायालायत आलेल्या एका प्रकरणाबाबत माहिती अशी की, एका तरुणावर प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांमध्ये लग्न करण्याच्या विषयावर बोलणं सुरू होतं मात्र, त्या तरुणाने प्रेयसीला तिच्या कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार लग्न करण्याचा सल्ला दिला. तसेच, दुसरीकडे तरुणाच्या  कुटुंबीयांनी त्याच्यासाठी वधूचा शोध सुरू केल्याने पीडित मुलगी अस्वस्थ झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलं. उच्च न्यायालयानेही हा खटला फेटाळण्यास नकार दिला. त्यावर तरुणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments